एक्स्प्लोर

Donald Trump  : डोनाल्ड ट्रम्प यांनी कॅनडासह मेक्सिकोवर टॅरिफ लादले, अमेरिकेचे नागरिकचं संकटात, महागाईचा भडका उडणार?

Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांनी टॅरिफ लादताच कॅनडानं देखील पलटवार केला आहे.  कॅनडानं अमेरिकेतून आयात होणाऱ्या 1256 उत्पादनांवर टॅरिफ लावत असल्याचं जाहीर केलं आहे.

नवी दिल्ली : अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड  ट्रम्प यांनी  कार्यभार स्वीकारताच इतर देशांना इशारे देण्यास सुरुवात केली. टॅरिफ लादत एक प्रकारे डोनाल्ड ट्रम्प यांनी टॅरिफ वॉर सुरु केलं आहे.टॅरिफ लादून अमेरिकेला पुन्हा मजबूत बनवणार असल्याचं डोनाल्ड ट्रम्प म्हणतात. जगातील जाणकारांच्या मते टॅरिफ लादून डोनाल्ड ट्रम्प दुसऱ्या देशांसह अमेरिकन नागरिकांना देखील अडचणीत आणत आहेत.  

अमेरिकेच्या नव्या टॅरिफ वॉरमुळं अमेरिकन ग्राहकांना त्यांच्या आवडीच्या वस्तू ज्यामध्ये टोमॅटो, एवोकाडे आणि टकीला यासाठी अधिक रक्कम द्यावी लागेल. कारण, डोनाल्ड ट्रम्प यांनी चीन, मेक्सिको आणि कॅनडामधून आयात केल्या जाणाऱ्या वस्तूंवर नव्यानं टॅरिफ लावणं हे आहे. सध्या अमेरिकन जनता पहिल्यापासून महागाईनं त्रस्त आहे, निवडणुकीच्या काळात त्यांनी यासंदर्भात नाराजी व्यक्त केली होती.  

फायनान्शिअल टाइम्सच्या रिपोर्टनुसार अमेरिकेचे तीन प्रमुख व्यापारी भागीदार चीन, मेक्सिको आणि कॅनडा आहे. या तीन देशांसोबत अमेरिकेचा 40 टक्के व्यापार होतो. अमेरिकेत टकीला या पेयाला मोठी मागणी असते. मेक्सिको आणि कॅनडा टोमॅटो, एवोकाडो सह इतर  उत्पादनं पुरवतात. 2019 ते 2021 मध्ये अमेरिकेत 90 टक्के एवोकाडो मेक्सिकोतून आयात झालं होतं. ट्रम्प यांनी या देशातून आयात होणाऱ्या वस्तूंवर टॅरिफ लावल्यास त्याचा थेट भार अमेरिकन नागरिकांवर होणार आहे.  

या वस्तूंच्या किमती वाढणार

अमेरिका चीनमधून दरवर्षी अब्जावधी डॉलर रकमेची उपकरणं आणि मशिनरींची आयात करते. ज्याचा वापर टीव्ही, स्मार्टफोन आणि दुसऱ्या इलेक्ट्रॉनिक वस्तूमध्ये केला जातो. अमेरिकेनं टॅरिफ लादल्यास चीनकडून देखील पलटवार केला जाऊ शकतो. मेक्सिको आणि कॅनडानं पलटवार केला आहे.   कॅनडानं अमेरिकेतून आयात केल्या जाणाऱ्या 1256 वस्तूंवर टॅरिफ लावण्याची घोषणा केलीय. त्यामध्ये पोल्ट्री, डेअरी उत्पादक, ताजी फळं, भाषा, लाकूड, पेपर  उत्पादन, इलेक्ट्रॉनिक साहित्याचा समावेश आहे.टॅरिफ वॉरमुळं दुसऱ्या देशांसोबत अमेरिकेच्या नागरिकांना त्रास सहन करावा लागू शकतो.

डोनाल्ड ट्रम्प यांनी अध्यक्ष झाल्यानंतर टॅरिफ लावत अमेरिकेला मजबूत करण्याचा मार्ग स्वीकारल्यानं जगभरातील गुंतवणूक अमेरिकेकडे आकर्षित होऊन डॉलर मजबूत झाला. याचा परिणाम इतर देशांवर देखील होत आहे. जगभरातील इतर चलनांमध्ये घसरण  झाल्यानं त्यांना अमेरिकेशी व्यापार करताना अधिक रक्कम मोजावी लागेल. त्यामुळं येत्या काळात अमेरिकेच्या व्यापारावर डोनाल्ड ट्रम्प यांच्या निर्णयाचा परिणाम कसा होतो ते पाहावं लागेल.

इतर बातम्या : 

Gold Rate : बजेटनंतर सोन्याच्या दरात वाढ की घसरण? चांदीनं 1 लाखांचा टप्पा ओलांडला, मुंबईसह विविध शहरात दर किती रुपयांवर?

एबीपी माझा वेब टीममध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत | राजकारण,क्रीडा, राष्ट्रीय, आंतराराष्ट्रीय ते गाव खेड्यातल्या शेती क्षेत्रातल्या बातम्यांची आवड | यापूर्वी महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन | टीव्ही 9 मराठी डिजीटल | ईटीव्ही भारत महाराष्ट्र मध्ये काम 
Read More

महत्त्वाच्या बातम्या

ऑटोचालकाच्या घरात सापडले 3 कोटी रुपये, दोन दिवस झाले तरी कोणीच केला नाही दावा, नेमके पैसे कोणाचे?  
ऑटोचालकाच्या घरात सापडले 3 कोटी रुपये, दोन दिवस झाले तरी कोणीच केला नाही दावा, नेमके पैसे कोणाचे?  
Mobile Recharge Price Hike : मोबाईल रिचार्ज पुन्हा महागणार! जिओ आणि एअरटेलच्या ग्राहकांना धक्का बसण्याची शक्यता
मोबाईल रिचार्ज पुन्हा महागणार! जिओ आणि एअरटेलच्या ग्राहकांना धक्का बसण्याची शक्यता
देशातील 'या' बँकेचा मोठा निर्णय, नियमांमध्ये केला बदल, ग्राहकांच्या खिशाला लागणार कात्री? तुमच खातं कोणत्या बँकेत?
देशातील 'या' बँकेचा मोठा निर्णय, नियमांमध्ये केला बदल, ग्राहकांच्या खिशाला लागणार कात्री? तुमच खातं कोणत्या बँकेत?
सणासुदीच्या काळात ग्राहकांना झटका! साखरेच्या दरात मोठी उसळी! 18 दिवसात 18 रुपयांची वाढ, दर वाढण्याचं नेमकं कारण काय? 
सणासुदीच्या काळात ग्राहकांना झटका! साखरेच्या दरात मोठी उसळी! 18 दिवसात 18 रुपयांची वाढ, दर वाढण्याचं नेमकं कारण काय? 

व्हिडीओ

Sinhagad Fort 'किल्ले सिंहगड' ॲप नोंदणी द्वारेच मिळणार गडावर प्रवेश; एआय कॅमेऱ्यांची राहणार करडी नजर
Pawar Family Special Report : बारामतीकडे लक्ष द्या, बारामतीकरांनी थेट लिहलं पवार कुटुंबाला पत्र
Shiv Sena Hearing Special Report : राहुल नार्वेकरांच्या निर्णयावर आक्षेप, ठाकरेंच्या नेत्यांचा हल्लाबोल
Shiv Sena Hearing : तर धनुष्यबाण चिन्ह गोठवा, ठाकरेंची मागणी | Special Report ABP Majha
Vidit Gujrathi Arjuna Award : अर्जुन पुरस्कार जाहीर झाल्यानंतर बुद्धिबळपटू विदित गुजरातीची 'माझा'वर मुलाखत

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ashok Saraf andn Devendra Fadnavis: अशोक सराफ एक उत्तम माणूस, मराठी माणसाला त्यांच्या भूमिकांमध्ये स्वत:चे अस्तित्त्व दिसायचे: देवेंद्र फडणवीस
अशोक सराफ एक उत्तम माणूस, मराठी माणसाला त्यांच्या भूमिकांमध्ये स्वत:चे अस्तित्त्व दिसायचे: देवेंद्र फडणवीस
Free School Bag: आनंदवार्ता! पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना मोफत दप्तर मिळणार, राज्य सरकारची मोठी घोषणा, 165 कोटींचा निधी मंजूर
आनंदवार्ता! पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना मोफत दप्तर मिळणार, राज्य सरकारची मोठी घोषणा, 165 कोटींचा निधी मंजूर
Mobile Recharge Price Hike : मोबाईल रिचार्ज पुन्हा महागणार! जिओ आणि एअरटेलच्या ग्राहकांना धक्का बसण्याची शक्यता
मोबाईल रिचार्ज पुन्हा महागणार! जिओ आणि एअरटेलच्या ग्राहकांना धक्का बसण्याची शक्यता
Maharashtra Live blog updates: ठाण्यात शिधावाटप विभागाची मोठी कारवाई, 11 हजार लिटर पेट्रोल जप्त
Maharashtra Live blog updates: ठाण्यात शिधावाटप विभागाची मोठी कारवाई, 11 हजार लिटर पेट्रोल जप्त
Ravindra Jadeja : 'या' नको असलेल्या रेकॉर्डसह रवींद्र जडेजा निवृत्त, कधीच हा सोपा टप्पा गाठू शकला नाही
'या' नको असलेल्या रेकॉर्डसह रवींद्र जडेजा निवृत्त, कधीच हा सोपा टप्पा गाठू शकला नाही
Dharashiv Thackeray Camp Nagarsevak will join BJP: ज्याची भीती होती तेच झालं, धाराशिवमधील 'ते' 10 नगरसेवक मातोश्रीवरच्या बैठकीला गेले नाहीतच अन् आता मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत
ज्याची भीती होती तेच झालं, धाराशिवमधील 'ते' 10 नगरसेवक मातोश्रीवरच्या बैठकीला गेले नाहीत अन् आता मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत
Dharashiv School : म्हशीच्या गोठ्यात मुलांचं अन्न अन् दुर्गंधीचं साम्राज्य; धाराशिवमधील दिव्यांग निवासी शाळेचे विदारक वास्तव उघड
म्हशीच्या गोठ्यात मुलांचं अन्न अन् दुर्गंधीचं साम्राज्य; धाराशिवमधील दिव्यांग निवासी शाळेचे विदारक वास्तव उघड
तीन तासांचे प्रयत्न, दोन जेसीबींचे खोदकाम; बोअरवेलमध्ये पडलेला अदनान बाहेर येताच ग्रामस्थांचा जल्लोष
तीन तासांचे प्रयत्न, दोन जेसीबींचे खोदकाम; बोअरवेलमध्ये पडलेला अदनान बाहेर येताच ग्रामस्थांचा जल्लोष
Embed widget