एक्स्प्लोर

Donald Trump : अमेरिकेसोबत खेळ खेळू नका, मोठी हानी करेन, BRICS देशांना ट्रम्प यांच्याकडून नवी धमकी, कारण काय?

Donald Trump : ब्रिक्स देशांना अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा इशारा दिला आहे. अमेरिकेसोबत खेळणाऱ्या देशांचं मोठं नुकसान करु असं ट्रम्प यांनी म्हटलं आहे.

नवी दिल्ली : अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ब्रिक्स देशांना पुन्हा इशारा दिला आहे. ट्रम्प म्हणाले की अमेरिकेविरुद्धच्या धोरणांवर जे देश सहमत होतील त्यांच्यावर अधिकचं 10 टक्के टॅरिफ लादलं जाईल आणि त्या देशांवर कठोर प्राहर केला जाईल. डोनाल्ड ट्रम्प यांनी ब्रिक्स समुहातील सहभागी देशांचं नाव न घेता इशारा दिला आहे. त्या देशांचा समुह मजबूत झाला तरी लवकर संपून जाईल असा इशारा दिला.

ट्रम्प यांचा नाव न घेता इशारा

डोनाल्ड ट्रम्प यांनी शुक्रवारी व्हाइट हाऊसमध्ये एका कार्यक्रमात ब्रिक्स आर्थिक समुहासोबत जोडलेल्या देशांना इशारा दिला आहे. या देशांनी डॉलरवरील त्यांचं अवलंबित्व कमी केल्यास त्यांच्यावर 10 टक्के अतिरिक्त टॅरिफ लादलं जाईल, असा इशारा दिला. ट्रम्प म्हणाले ते डॉलरचं वर्चस्व कमी करण्याचा प्रयत्न करत होते, आम्ही असं होऊ देणार नाही. ट्रम्प यांनी ही प्रतिक्रिया क्रिप्टोकरन्सी कायद्याला मंजुरी दिल्यानंतर दिली आहे.

ब्राझील, रशिया, भारत, चीन आणि दक्षिण आफ्रिका यांनी ब्रिक्सची स्थापना केली आहे. यामध्ये आता मिस्त्र, इथियोपिया, इंडोनेशिया, इराण, सौदी अरेबिया आणि संयुक्त अरब अमिरात हे देश देखील सहभागी झाले आहेत. या समुहात अमेरिकेच्या डॉलरवरचं अवलंबित्व कमी करण्यासाठी व्यापाराच्या करारात स्थानिक चलनांचा वापर करण्यासंदर्भात चर्चा सुरु होत्या, असा दावा होता.

डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलं की माझ्या इशाऱ्यानंतर त्यांच्या पुढच्या बैठकीतील उपस्थिती कमी झाली, कारण त्यांना टॅरिफ नको होतं. ट्रम्प म्हणाले 1 ऑगस्ट पर्यंत कोणताही व्यापारी करार झाला नाही तर ते ब्रिक्स देशांसाठी नव्या टॅरिफ व्यवस्थांसंदर्भात सविस्तर माहिती देत अधिकृत पत्र पाठवणं महत्त्वाचं आहे.

ब्रिक्सचा संस्थापक देश असलेल्या भारतानं डी डॉलरायझेशच्या संकल्पनेपासून दूर राहणं पसंत कंल आहे. 17 जुलै रोजी विदेश मंत्रालयानं  स्पष्ट केलं की  ब्रिक्सनं सक्रियपणे अमेरिकेच्या डॉलरला कमजोर करण्याचा प्रयत्न केलेला नाही. विदेश मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी म्हटलं की सीमापार व्यवहार, ब्रिक्सनं स्थानिक चलनांवर चर्चा केली मात्र, डी डॉलरायझेशन अजेंड्यात नव्हतं, असं म्हटलं. 

ब्रिक्स समुहानं देखील अमेरिकेच्या विरोधात असल्याच्या चर्चेला नाकारलं आहे. बहुपक्षीय राजनैतिक मंच म्हणून ब्रिक्सची स्थापना झाली आहे. जी 7 आणि जी 20 या सारख आंतरराष्ट्रीय मंच अंतर्गत मतभेद आणि ट्रम्प यांच्या अमेरिका प्रथम या अजेंड्याचा सामना करत आहेत. ब्राझीलनं देखील बिक्सच्या चलनाबाबतचा प्रस्ताव मागं ठेवण्याचा निर्णय घेतला होता.  दरम्यान, डोनाल्ड ट्रम्प यांनी ब्रिक्स समूह अमेरिकेचा शत्रू समजून डॉलरला कमजोर करण्याचा आरोप केला अशला तरी पुरावा दिलेला नाही.

एबीपी माझा वेब टीममध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत | राजकारण,क्रीडा, राष्ट्रीय, आंतराराष्ट्रीय ते गाव खेड्यातल्या शेती क्षेत्रातल्या बातम्यांची आवड | यापूर्वी महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन | टीव्ही 9 मराठी डिजीटल | ईटीव्ही भारत महाराष्ट्र मध्ये काम 
Read More

महत्त्वाच्या बातम्या

Share Market : ICICI बँकेचा पहिल्या तिमाही नफा 16 टक्क्यांनी वाढला, नफा 14,805 कोटींवर पोहोचला
ICICI बँकेचा पहिल्या तिमाही नफा 16 टक्क्यांनी वाढला, नफा 14,805 कोटींवर पोहोचला
पाण्यापेक्षाही स्वस्त पेट्रोल! जगातील सर्वात स्वस्त इंधन असलेले देश कोणते? अव्वल स्थानी कोण?
पाण्यापेक्षाही स्वस्त पेट्रोल! जगातील सर्वात स्वस्त इंधन असलेले देश कोणते? अव्वल स्थानी कोण?
RBI : रिझर्व्ह बँकेकडून कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला 13 लाखांचा दंड, राज्यातील आणखी एका बँकेला ठोठवला दंड 
आरबीआयकडून कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला 13 लाखांचा दंड, राज्यातील आणखी एका बँकेला ठोठवला दंड 
Gold-Silver Price Today: सोन्याच्या दरात पुन्हा वाढ, चांदीचे दर 'जैसे थे'च; सोने खरेदीची ही योग्य वेळ आहे का? जाणून घ्या आजचे नवे दर
सोन्याच्या दरात पुन्हा वाढ, चांदीचे दर 'जैसे थे'च; सोने खरेदीची ही योग्य वेळ आहे का? जाणून घ्या आजचे नवे दर

व्हिडीओ

Delhi CJP Protest | जंतर-मंतर ते सफदरजंग, वांगचुक-दिपके आंदोलनाचा निर्णायक दिवस | Special Report
J P Nadda Meeting With CJP : सरकार-आंदोलक पहिली बैठक, नड्डांकडे मागण्यांचं निवेदन | Special Report
NEET Result 2026 Pune Krushna Hundekari : नीट परिक्षेच्या निकालात गडबड; पुण्यातील विद्यार्थिनीचे आरोप
Tear bomb attack on CJP Protest : आंदोलकांना पांगवण्यासाठी पोलिसांकडून अश्रू धुराचा वापर
Gunaratna Sadavarte PC : कायदा तोडल्यास गुन्हा दाखल करा, ठाकरेंच्या आंदोलनावर सदावर्तेंचा हल्लाबोल!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Abhijeet Dipke : जे.पी. नड्डांनी आशुतोष रांका-सौरभ दासला घरी बोलावून घेतलं, मोबाईल काढून हाऊस अरेस्ट, जंतरमंतरवर गोंधळ माजवण्याचा डाव; अभिजीत दिपकेंचा गंभीर आरोप
जे.पी. नड्डांनी आशुतोष रांका-सौरभ दासला घरी बोलावून घेतलं, मोबाईल काढून हाऊस अरेस्ट, जंतरमंतरवर गोंधळ माजवण्याचा डाव; अभिजीत दिपकेंचा गंभीर आरोप
Maharashtra Rain Updates: पंचगंगेचे पाणी पुन्हा पात्राबाहेर, पुण्यात धरणांचा साठा वाढला, अलमट्टी धरणाबाबत पाटबंधारे विभागाचे कर्नाटक सरकारला तातडीचे पत्र
पंचगंगेचे पाणी पुन्हा पात्राबाहेर, पुण्यात धरणांचा साठा वाढला, अलमट्टी धरणाबाबत पाटबंधारे विभागाचे कर्नाटक सरकारला तातडीचे पत्र
Maharashtra Government: राज्यातील 6 प्रमुख रुग्णालयांत आता गुजराती संस्थेच्या धर्मशाळा; 1 रुपया भाड्याने कोट्यावधींच्या जमिनी 49 वर्षांसाठी आंदण!
राज्यातील 6 प्रमुख रुग्णालयांत आता गुजराती संस्थेच्या धर्मशाळा; 1 रुपया भाड्याने कोट्यावधींच्या जमिनी 49 वर्षांसाठी आंदण!
Jantar Mantar Delhi Protest LIVE: दिल्लीच्या जंंतरमंतरवर कॉकरोच जनता पार्टीच्या आंदोलनाचा 32 वा दिवस, कालच्या लाठीमारानंतर काय घडणार?
Jantar Mantar Delhi Protest LIVE: दिल्लीच्या जंंतरमंतरवर कॉकरोच जनता पार्टीच्या आंदोलनाचा 32 वा दिवस, कालच्या लाठीमारानंतर काय घडणार?
गल्लीपासून ते दिल्लीपर्यंत ते संसदेच्या चौकटीपर्यंत विद्यार्थ्यांचा देशव्यापी रस्त्यावर आक्रोश; दिल्लीत पोलिसांनी डोकीच्या डोकी फोडली, करंट दिला, तरुणी सुद्धा रक्तबंबाळ, राज्यातही एकच आक्रोश
गल्लीपासून ते दिल्लीपर्यंत ते संसदेच्या चौकटीपर्यंत विद्यार्थ्यांचा देशव्यापी रस्त्यावर आक्रोश; दिल्लीत पोलिसांनी डोकीच्या डोकी फोडली, करंट दिला, तरुणी सुद्धा रक्तबंबाळ, राज्यातही एकच आक्रोश
CJP Protest : विद्यार्थी सोडाच... तीन टर्मच्या आमदाराला उचलून फेकून दिलं; दिल्ली पोलिसांकडून आंदोलकांवर जनावरांसारखा अत्याचार
विद्यार्थी सोडाच... तीन टर्मच्या आमदाराला उचलून फेकून दिलं; दिल्ली पोलिसांकडून आंदोलकांवर जनावरांसारखा अत्याचार
Chandrashekhar Azad Jantar Mantar Protest CJP: दिल्लीत विद्यार्थ्यांवर पोलिसांचा बेछूट लाठीमार, चंद्रशेखर आझाद भर पावसात बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याखाली आंदोलनाला बसले
दिल्लीत पोलिसांचा बेछूट लाठीमार, चंद्रशेखर आझाद भर पावसात बाबासाहेबांच्या पुतळ्याखाली आंदोलनाला बसले
Jantar Mantar Delhi CJP Protest: दिल्ली पोलिसांनी मागचापुढचा विचार न करता सपासप काठ्या चालवल्या, घाव वर्मी बसल्याने तरुणी गंभीर जखमी, मृत्यूशी झुंज
दिल्ली पोलिसांनी मागचापुढचा विचार न करता सपासप काठ्या चालवल्या, घाव वर्मी बसल्याने तरुणी गंभीर जखमी, मृत्यूशी झुंज
Embed widget