एक्स्प्लोर

Gold Silver Rates Today: सोन्याच्या दरात पुन्हा पडझड; आजचा 24 कॅरेटचा भाव किती? सोने-चांदी का स्वस्त होतंय?

विविध देशांच्या मध्यवर्ती बँकांच्या व्याजदर धोरणांमुळे सोन्याच्या दरात सातत्याने अस्थिरता दिसून येत आहे.

Gold Silver Rates Today:  सोन्या चांदीच्या बाजारावर सध्या जागतिक आर्थिक आणि भू-राजकीय घडामोडींचा मोठा परिणाम होताना दिसतोय. कच्च्या तेलाच्या किमतीतील चढ-उतार, महागाईची चिंता, अमेरिकन डॉलरच्या होणाऱ्या हालचाली आणि विविध देशांच्या मध्यवर्ती बँकांच्या व्याजदर धोरणांमुळे सोन्याच्या दरात सातत्याने अस्थिरता दिसून येत आहे. गेल्या काही दिवसांपासून सोन्या चांदीच्या किमतीत घसरणीचा ट्रेंड कायम दिसतोय. (Gold Silver Rates)

सोन्या-चांदीचे आजचे दर किती ?

बुलियन्स असोसिएशनच्या ताज्या दरानुसार, आज ( 24 जुलै) सोन्याच्या दरात पुन्हा एकदा घसरण झाली असून 24 कॅरेट सोन्याचा प्रति 10 ग्रॅम दर 1 लाख 43 हजार 410 रुपयांवर स्थिरावलाय. 22 कॅरेट सोन्यासाठी सोने खरेदीदारांना आज 1 लाख 31 हजार 459 रुपये द्यावे लागतील. चांदीचा किलोमागे दर 2 लाख 22 हजार 80 रुपये आहे.

सोन्या चांदीच्या किमतींमध्ये घसरण कशामुळे?

  • मध्यपूर्वेतील वाढत्या भूराजकीय तणावामुळे महागाईची चिंता वाढली आहे. तसेच अमेरिकेच्या कठोर चलनविषयक धोरणांमुळे सुरक्षित गुंतवणुकीकडे गुंतवणूकदारांचा कल वाढत आहे. 
  • व्याजदर वाढण्याची शक्यता असल्याने गुंतवणूकदारांनी सोन्यातील गुंतवणूक कमी करण्यास सुरुवात केली. अनेकांनी नफा मिळताच सोन्याची विक्री केली. त्यामुळे सोन्याच्या दरावर दबाव आला. याचाच परिणाम चांदीच्या किमतींवरही झाला आणि तिचे दरही घसरले.
  • इराणवरील अमेरिकेच्या सुरू असलेल्या हल्ल्यांमुळे आणि त्यानंतर होणाऱ्या चर्चांमुळे आखाती देशांच्या ऊर्जापुरवठ्यात दीर्घकाळ व्यत्यय येण्याची चिंता वाढली आहे. परिणामी कच्च्या तेलाच्या किमतींवरही परिणाम होतेय.
  • आंतरराष्ट्रीय बाजारातील दर तसेच देशांतर्गत सराफा बाजारातील भाव, तज्ञांच्या मते जागतिक आर्थिक घडामोडी यांचा एकत्रित परिणाम सध्या सोने-चांदीच्या बाजारावर होतोय.  महागाई व्याजदर कच्च्या तेलाच्या किमती आणि भूराजकीय तणाव याचा सोन्या-चांदीच्या दरांवर पुढील काही काळातही प्रभाव राहण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

22 आणि 24 कॅरेट सोनं म्हणजे नेमकं काय?

वजन मोजण्यासाठी किलो हे एकक आहे. पाणी मोजण्यासाठी लीटर या एककाचा वापर केला जातो. त्याच पद्धतीने सोन्याची शुद्धता मोजायची असेल तर कॅरेट या एककाचा वापर केला जातो. जेव्हे कॅरेट जास्त तेवढेच सोने शुद्ध असे मानले जाते. 24 कॅरेट सोने हे सर्वांत शुद्ध असल्याचे बोलले जाते. 24 कॅरेट सोनेच्या शुद्धता ही 99.9 टक्के असते. त्यामुळे या सोन्याचा भावही इतर सोन्याच्या तुलनेत अधिक असतो. 24, 22, 18, 14  अशा वेगवेगळ्या प्रकारचे सोने असते. 24 कॅरेट सोने वगळता इतर सर्व प्रकारच्या सोन्यात तांबे, चांदी असे इतर धातू मिसळले जातात. सोन्याच्या आभूषणांना मजबुती यावी म्हणून हे धातू सोन्यात मिसळले जातात. सोन्याची गुववत्ता ही बीआयएस या संस्थेतर्फे ठरली जाते. त्यामुळे हॉलमार्क असलेले सोनेच खरेदी करायला हवे, असा सल्ला दिला जातो.  

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Share Market: निफ्टी 50 सलग तिसऱ्या सत्रात घसरला; सेन्सेक्स 0.15 टक्के वाढीसह बंद
Share Market: निफ्टी 50 सलग तिसऱ्या सत्रात घसरला; सेन्सेक्स 0.15 टक्के वाढीसह बंद
शेतकऱ्यांसाठी तमिळनाडू सरकारचा मोठा निर्णय, उसाला प्रति टन 4 हजार रुपयांचा दर जाहीर, महाराष्ट्रात किती? 
शेतकऱ्यांसाठी तमिळनाडू सरकारचा मोठा निर्णय, उसाला प्रति टन 4 हजार रुपयांचा दर जाहीर, महाराष्ट्रात किती? 
महाराष्ट्रातील युवकांसाठी नोकरीची मोठी संधी! SBI मध्ये तब्बल 9 हजार 766 पदांसाठी भरती सुरु, कसा कुठे कराल अर्ज?
महाराष्ट्रातील युवकांसाठी नोकरीची मोठी संधी! SBI मध्ये तब्बल 9 हजार 766 पदांसाठी भरती सुरु, कसा कुठे कराल अर्ज?
ना कोचिंग ना क्लास, एकाच वर्षात मिळवल्या तब्बल 13 सरकारी नोकऱ्या, वाचा 21 वर्षाच्या शेतकरी पुत्राची यशोगाथा 
ना कोचिंग ना क्लास, एकाच वर्षात मिळवल्या तब्बल 13 सरकारी नोकऱ्या, वाचा 21 वर्षाच्या शेतकरी पुत्राची यशोगाथा 
Advertisement

व्हिडीओ

Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : महिला पाय धुवून पाणी पितात, पुण्याच्या बाबाचं वास्तव
Shiv Sena SC Hearing Special Report : निवडणूक आयोगावर गंभीर आरोप..शिवसेनेच्या सुनावणीत काय घडलं?
Majha Vishesh:व्हेज-नॉनव्हेजचा ते शुद्धीकरणावरुन काँग्रेस विरुद्ध भाजप,माझा विशेषमध्ये आज काय विशेष?
Buldhana Khamgaon Ajji on FDA : तुकाराम मुंढेंना विनंती करणाऱ्या खामगावातील व्हायरल आजी 'माझा'वर
Sanjay Raut on Amit Shah: अमित शाहांना तातडीने उपपंतप्रधान व्हायचंय, पण मोदींनी नकार दिलाय
Advertisement

फोटो गॅलरी

Advertisement

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Asim Sarode On Shivsena Name And Symbol Hearing Supreme Court: तोच कागदोपत्री पुरावा आता एकनाथ शिंदेंसाठी अडचण ठरणार; शिवसेना सुनावणीवर असीम सरोदे यांचं मोठं विधान, सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडलं?
तोच कागदोपत्री पुरावा आता एकनाथ शिंदेंसाठी अडचण ठरणार; शिवसेना सुनावणीवर असीम सरोदे यांचं मोठं विधान, सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडलं?
Pune Chakan MIDC: पुण्याच्या चाकण MIDC तील रस्त्यांच्या दुरवस्थेचे आणखी दोन बळी, चिखलामुळे बाईक स्लीप होऊन कंटेनरच्या चाकाखाली आली, दोघांचा जागीच दुर्दैवी अंत
पुण्याच्या चाकण MIDC तील रस्त्यांच्या दुरवस्थेचे आणखी दोन बळी, चिखलामुळे बाईक स्लीप होऊन कंटेनरच्या चाकाखाली आली, दोघांचा जागीच दुर्दैवी अंत
Sri Lankan Coach News : श्रीलंकेच्या खेळाडूने संघाच्या कोचला संपवलं; पोलिसांकडून क्रिकेटपटूला अटक, टीम इंडियाच्या कसोटी सामन्याआधी खळबळ, नेमकं काय घडलं?
श्रीलंकेच्या खेळाडूने संघाच्या कोचला संपवलं; पोलिसांकडून क्रिकेटपटूला अटक, टीम इंडियाच्या कसोटी सामन्याआधी खळबळ, नेमकं काय घडलं?
Nagpur SIR News: सव्वादोन लाख मतदार मृत, साडेचार लाख कायमस्वरूपी स्थलांतरित; नागपुरमध्ये मतदार यादीच्या SIR प्रक्रियेत धक्कादायक माहिती
सव्वादोन लाख मतदार मृत, साडेचार लाख कायमस्वरूपी स्थलांतरित; नागपुरमध्ये मतदार यादीच्या SIR प्रक्रियेत धक्कादायक माहिती
Share Market: निफ्टी 50 सलग तिसऱ्या सत्रात घसरला; सेन्सेक्स 0.15 टक्के वाढीसह बंद
Share Market: निफ्टी 50 सलग तिसऱ्या सत्रात घसरला; सेन्सेक्स 0.15 टक्के वाढीसह बंद
Junior Amitabh Bachchan In Deewaar Movie: 'दीवार'चा ज्युनियर अमिताभ सध्या करतो तरी काय? भारत सोडून अमेरिकेत थाटलाय कोट्यवधींचा व्यवसाय, टेक इंडस्ट्रीत कमावलं मोठं नाव; मुली हॉलिवूड स्टार्स, ओळखलं का कोण?
'दीवार'चा ज्युनियर अमिताभ, भारत सोडून अमेरिकेत थाटलाय कोट्यवधींचा व्यवसाय, टेक इंडस्ट्रीत कमावलं मोठं नाव; मुली हॉलिवूड स्टार्स, ओळखलं का कोण?
Solapur Crime News : झोपेतून उठवल्याचा राग, बिहारी साथिदाराला हातोड्याने वार करुन संपवलं, करमाळ्यातील धक्कादायक घटना
झोपेतून उठवल्याचा राग, बिहारी साथिदाराला हातोड्याने वार करुन संपवलं, करमाळ्यातील धक्कादायक घटना
BAN vs AUS : बांगलादेशचा बलाढ्य ऑस्ट्रेलियाला दणका,  पहिल्या डावात 200 धावांच्या आत गुंडाळलं, कसोटीचा पहिला दिवस गाजवला 
बांगलादेशचा बलाढ्य ऑस्ट्रेलियाला दणका, पहिल्या डावात 200 धावांच्या आत गुंडाळलं, कसोटीचा पहिला दिवस गाजवला
Embed widget