...तर अमेरिकेची अर्थव्यवस्था उद्ध्वस्त होईल, टॅरिफवरुन डोनाल्ड ट्रम्र यांचा न्यायालयाला इशारा, म्हणाले, 1929 सारखी महामंदी येआल?
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी टॅरिफच्या अमेरिकन न्यायालयांना आंतरराष्ट्रीय आपत्कालीन आर्थिक शक्ती कायदा (IEEPA) कमकुवत करु नका असा इशारा दिला.
Donald Trump : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी टॅरिफच्या अमेरिकन न्यायालयांना आंतरराष्ट्रीय आपत्कालीन आर्थिक शक्ती कायदा (IEEPA) कमकुवत करु नका असा इशारा दिला. अमेरिकेच्या निर्बंध धोरणात IEEPA चा वापर अनेकदा केला जातो. हा कायदा अमेरिकन राष्ट्राध्यक्षांना आर्थिक व्यवहारांवर अतिरिक्त अधिकार देतो. याचा वापर करुन ट्रम्प यांनी भारतावर 50 टक्के कर लादला आहे.
अमेरिकेला आर्थिक फायदे होतोय
ट्रम्प यांनी ट्रुथ सोशलवर पोस्ट केली आहे. अमेरिकेला या करामुळे खूप आर्थिक फायदे मिळत असल्याचा दावा ट्रम्प यांनी केला आहे. या कराचा शेअर बाजारावर मोठा सकारात्मक परिणाम होत आहे. जवळजवळ दररोज नवीन विक्रम होत आहेत. याशिवाय, आपल्या देशाच्या तिजोरीत शेकडो अब्ज डॉलर्स येत आहेत.
ट्रम्प यांनी दिला अमेरिकन न्यायालयाला इशारा
ट्रम्प यांनी न्यायालयाला इशारा दिला आहे की जर IEEPA च्या वापराबद्दल कोणताही निर्णय दिला गेला तर अमेरिकेची अर्थव्यवस्था उद्ध्वस्त होईल. जर असे झाले तर 1929 सारखी महामंदी येईल. मग अमेरिका अशा न्यायालयीन दुर्घटनेतून सावरू शकणार नाही. मला अमेरिकन न्यायव्यवस्थेवर विश्वास आहे. हा निर्णय खूप आधीच घ्यायला हवा होता, जेणेकरून देशाची आर्थिक गती चांगली झाली असती असे ट्रम्प यांनी म्हटलं आहे.
डोनाल्ड ट्रम्प का घाबरले आहेत?
राष्ट्रीय सुरक्षेच्या चिंतेचा हवाला देत ट्रम्प यांनी वारंवार व्यापार निर्बंध लादण्यासाठी IEEPA चा आधार घेतला आहे. IEEPA अंतर्गत राष्ट्रपतींच्या अधिकारांच्या मर्यादांबद्दल वाढती कायदेशीर तपासणी दरम्यान त्यांचे हे वक्तव्य आले आहे. अनेक कायदेतज्ज्ञांचा असा युक्तिवाद आहे की व्यापार धोरणात या कायद्याचा वापर त्याच्या मूळ उद्देशाशी विश्वासघात आहे. जर अमेरिकन न्यायालयाने जगातील अनेक देशांवर शुल्क लादण्याचा निर्णय रद्द केला तर तो डोनाल्ड ट्रम्पसाठी मोठा धक्का असेल.
1929 मध्ये नेमकं काय झालं होतं?
1929 मध्ये अमेरिकन शेअर बाजारातील घसरणीनंतर सुरू झालेला महामंदी ही आधुनिक इतिहासातील सर्वात गंभीर आर्थिक मंदींपैकी एक होती. यामुळं बँका मोठ्या प्रमाणात दिवाळखोर झाल्या होत्या. लोक बेरोजगार झाले होते. औद्योगिक उत्पादन आणि जागतिक व्यापारात मोठी घट झाली होती. याचा परिणाम अमेरिका आणि जगाच्या अर्थव्यवस्थेवर बराच काळ झाला होता.
महत्वाच्या बातम्या:























