दारु विक्रीतून दिल्ली सरकारला दररोज किती कोटींचा महसूल मिळतो? दिल्लीत दारुची दुकानं किती?
दिल्लीत दारुचा मोठ्या प्रमाणात व्यवसाय चालतो. ज्यामुळं सरकारला मोठा महसूल देखील मिळतो. दरम्यान, दिल्लीत दारुची नेमकी किती दुकाने आहेत? तिथं दारुचा व्यवसाय किती होतो? याबाबतची माहिती पाहुयात.
Delhi Liquor Scam: दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांना ईडीकडून (ED) अटक करण्यात आलीय. दिल्ली दारू घोटाळा प्रकरणी ही अटक करण्यात आलीय. दरम्यान, अरविंद केजरीवाल यांना ईडीकडून अटक झाल्यानंतर दिल्लीतील दारु घोटाळा प्रकरणाची पुन्हा एकदा चर्चा सुरु झालीय. दिल्लीत दारुचा मोठ्या प्रमाणात व्यवसाय चालतो. ज्यामुळं सरकारला मोठा महसूल देखील मिळतो. दरम्यान, दिल्लीत दारुची नेमकी किती दुकाने आहेत? तिथं दारुचा व्यवसाय किती होतो? पाहुयात याबद्दल सविस्तर माहिती.
दिल्लीत दारुची 584 दुकाने
दारु घोटाळा प्रकरणी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना ईडीकडून अटक करण्यात आलीय. दरम्यान, केजरीवाल यांच्या अटकेला स्थगिती द्यावी अशा प्रकारची याचिका दिल्ली उच्च न्यायालयात करण्यात आली होती. मात्र, ही याचिका न्यायालयानं फोटाळली आहे. अलिडच्या काळात दिल्लीत दारुच्या दुकानांची संख्या वाढल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. मिळालेल्या माहितीनुसार दिल्लीत दारुची 584 दुकाने आहेत. 2022 साली दिल्लीत दारुची 350 दुकाने होती, मात्र, 2023 मध्ये ही संख्या 584 झाली आहे. दरम्यान, दिल्लीत नवीन अबकारी धोरण आलं आहे. हे धोरण आल्यानंतर दिल्लीत 849 दारुची दुकाने उघडण्याचे सरकारचे धोरण होते.
दररोज दारु विक्रीतून सरकारला मिळतो 19 कोटींचा महसूल
मिळालेल्या माहितीनुसार, दिल्ली सरकारला दारु विक्रीच्या माध्यमातून दररोज सरासरी 19 कोटी रुपयांचा महसूल मिळतो. उत्पादन शुल्क अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, दिल्ली बाजारात 1000 ब्रँड बाजारात नोंदणीकृत आहेत. 2022 मध्ये मोठ्या प्रमाणात दारुचा व्यवसाय झाला होता. गेल्या चार वर्षाचा विचार केला तर ही विक्री सर्वाधिक होती. 2022-23 मध्ये 62 कोटींहून अधिक दारुच्या बाटल्यांची विक्री झाली होती. या माध्यमातून सरकारसा 6821 कोटी रुपयांचा महसूल मिळाला होता. डिसेंबर 2022 मध्ये दररोज सरासरी 13.77 लाख दारूच्या बाटल्यांची विक्री झाली होती. 2021-22 मध्ये मद्यविक्रीतून दिल्ली सरकारने 6762 कोटी रुपयांचा महसूल गोळा केला होता. तर 2023 मध्ये सरकारला 6100 कोटी रुपयांचा महसूल मिळाला होता.
केजरीवालांना अटक, आपचे कार्यकर्ते आक्रमक
अरविंद केजरीवाल यांना मद्य घोटाळा प्रकरणात नऊवेळा समन्स बजावण्यात आले होते. मात्र, अरविंद केजरीवाल एकदाही ईडीच्या चौकशीला हजर राहिले नव्हते. अखेर गुरुवारी संध्याकाळी ईडीचे अधिकारी त्यांच्या घरी पोहोचले. सुरुवातीला त्यांची चौकशी होईल, असे सांगण्यात आले होते. मात्र, दोन तासांच्या चौकशीनंतर ईडीने अरविंद केजरीवाल यांना ताब्यात घेतले. ईडीच्या या कारवाईमुळे आम आदमी पक्षाला मोठा धक्का बसला आहे. ईडीच्या कारवाईनंतर आपचे कार्यकर्ते प्रचंड आक्रमक झाले आहेत.
महत्वाच्या बातम्या: