एक्स्प्लोर

Currency notes RBI: 10 आणि 20 रुपयांच्या प्लॅस्टिक नोटा येणार; RBI जुन्या, खराब नोटांच काय करते? नोटा जाळत का नाही?

Currency notes RBI: रिझर्व्ह बँक जुन्या कागदी नोटांची विल्हेवाट कशी लावते? भविष्यात कोणालाही त्याचा गैरवापर करता येणार नाही, याची काळजी घेतली जाते.

Currency notes RBI: भारतीय रिझर्व्ह बँकेकडून लवकरच  10 आणि 20 रुपयांच्या प्लॅस्टिक(पॉलिमर) च्या नोटा चलनात आणल्या जाणार आहेत. केंद्र सरकारने या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे. त्यामुळे या नव्या प्लॅस्टिकच्या नोटा चलनात आल्यानंतर सध्याच्या कागदी नोटांचं रिझर्व्ह बँक (RBI) काय करणार, हा प्रश्न अनेकांना पडला आहे. या जुन्या कागदी नोटा चलनात कायम राहणार आहेत. मात्र, रिझर्व्ह बँकेच्या क्लीन नोट धोरणानुसार कागदाच्या खराब झालेल्या आणि फाटलेल्या नोटांना (Currency notes) यांत्रिक पद्धतीने नष्ट केले जाते. जेणेकरुन भविष्यात कोणालाही त्याचा गैरवापर करता येणार नाही. (RBI news)

RBI news: रिझर्व्ह बँक कोणत्या नोटा नष्ट करते?

रिझर्व्ह बँक सर्वप्रथम इतर बँकांकडून आलेल्या फाटलेल्या आणि खराब झालेल्या नोटा जमा करते. या नोटा आरबीआयच्या करन्सी चेस्टमध्ये पाठवल्या जातात. त्याठिकाणी या सर्व नोटा पुन्हा तपासल्या जातात. या नोटा एका मशीनमध्ये टाकल्या जातात. ही मशीन एका सेकंदात 50 ते 60 नोटा तपासू शकते. ही मशीन संबंधित नोटांचा दर्जा, वॉटरमार्क आणि इतर गोष्टी काटेकोरपणे तपासते. यामध्ये एखादी बनावट नोट आढळल्यास ती नष्ट केली जाते. त्यानंतर खराब नोटांची लगेच विल्हेवाट लावली जाते. 

रिझर्व्ह बँक कोणत्याही नोटांची विल्हेवाट लावताना त्या जाळत नाही. हा सर्वात सोपा पर्याय असला तरी त्यामुळे प्रदूषण होते. त्यामुळे RBI ने आता नोटा जाळणे बंद केले आहे. याऐवजी खराब नोटा एका श्रेडर मशीनमध्ये टाकून त्याचे तुकडे केले जातात. हे तुकडे वेडेवाकडे असल्याने परत त्यांची जुळणी करणे शक्य नसते. नोटांचे हे तुकडे न्युमेटिक ट्युबमध्ये भरुन हायड्रोलिक प्रेस मशीनमध्ये टाकले जातात. ही मशीन कागदाच्या या तुकड्यांचे ठोकळे किंवा मोठे ब्लॉक तयार करते. हे कागदाचे ब्लॉक फाईल्स, क्लीपबोर्ड, कॅलेंडर, डायरी अशा वस्तू बनवण्यासाठी वापरल्या जातात.  

RBI: आरबीआय प्लॅस्टिकच्या नोटा का चलनात आणत आहे?

आरबीआयच्या मते पॉलिमर नोटा सध्या चलनात असलेल्या कागदी नोटांच्या तुलनेत अधिक मजबूत आणि दीर्घकाळ टिकतात. काही देशांमध्ये प्लास्टिकच्या नोटांचा वापर सुरु आहे, त्याचे चांगले परिणाम पाहायला मिळाले आहेत, भारतात त्याचा प्रायोगिक पातळीवर वापर सुरु होईल. प्लास्टिक नोटांच्या पायलट प्रोजेक्टला मंजुरी देताना कागदाच्या नोटा बंद होणार नाहीत, असे सरकारने स्पष्ट केले आहे.

आणखी वाचा

RBI: मोठी बातमी, 10 आणि 20 रुपयांच्या प्लास्टिक नोटा येणार, केंद्र सरकारची आरबीआयच्या प्रस्तावाला मंजुरी

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

म्हशी चारल्या, पैशासाठी छोटी मोठी कामही केली, पण जिद्द नाही सोडली, टॅक्सी चालकाची मुलगी झाली जिल्ह्याधिकारी 
म्हशी चारल्या, पैशासाठी छोटी मोठी कामही केली, पण शिक्षणाची जिद्द नाही सोडली, टॅक्सी चालकाची मुलगी झाली जिल्ह्याधिकारी 
एका सामन्यासाठी 4 कोटी 85 लाख रुपये! भारतीय क्रिकेट संघाची मोठी कमाई, BCCI ला मजबूत प्रायोजक मिळाला
एका सामन्यासाठी 4 कोटी 85 लाख रुपये! भारतीय क्रिकेट संघाची मोठी कमाई, BCCI ला मजबूत प्रायोजक मिळाला
SBI ATM Rules : 1 ऑक्टोबरपासून ATM मधून पैसे काढण्यासाठी शुल्क लागणार; बँकेची मोठी घोषणा
1 ऑक्टोबरपासून ATM मधून पैसे काढण्यासाठी शुल्क लागणार; बँकेची मोठी घोषणा
Sugar Price : साखरेची किंमत नेमकी कशी ठरवली जाते? दरावर सरकराचं नियंत्रण असतं का?
साखरेची किंमत नेमकी कशी ठरवली जाते? दरावर सरकराचं नियंत्रण असतं का?
Advertisement

व्हिडीओ

Fadnavis Meets Marathwada Farmers : दृष्काळाशी दोन हात, कधी मदतीची बरसात? | Special Report ABP Majha
Vidyanand Bapat Pune Graduate constituency Election 2026: निवडणुकीचा प्रस्ताव बापटांना किती वाव?
Maharashtra Leader On Gyanesh Kumar : राज्यातील नेत्यांचे निवडणूक आयोगाच्या ज्ञानेश कुमारांवर तोशेर; कोण काय बोललं? Special Report
Uddhav Thackeray on Drought : 31 हजार कोटींमधली किती मदत शेतकऱ्यांना पोहोचली?
Baramati Robot : शरद पवारांच्या स्वागतासाठी रोबोट, चला म्हणताच रोबोट चालू लागला Special Report
Advertisement

फोटो गॅलरी

Advertisement

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sahil Wakode : साहिलचा 'आयफोन' ठरतोय कोडं; 47 मिनिटांचा 'तो' घटनाक्रम उलगडणार कसा? एका 'पॅटर्न लॉक'मध्ये अडकलं सगळं, पोलिस घेणार हायटेक मदत
साहिलचा 'आयफोन' ठरतोय कोडं; 47 मिनिटांचा 'तो' घटनाक्रम उलगडणार कसा? एका 'पॅटर्न लॉक'मध्ये अडकलं सगळं, पोलिस घेणार हायटेक मदत
Video: 'हो, तुझीच आहे, घेऊन जा ना!’ बाईक चोरून पळत होता भामटा, मालकाने असा डायलॉग मारला की चोरही गोंधळला; नेमकं काय घडलं?
'हो, तुझीच आहे, घेऊन जा ना!’ बाईक चोरून पळत होता भामटा, मालकाने असा डायलॉग मारला की चोरही गोंधळला; नेमकं काय घडलं?
SIR प्रक्रियेत महाराष्ट्रात ज्या मतदारांची नावे वगळली ती नावे पूर्ववत करा...' राज्यातील SIR प्रक्रियेला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान, दोन निवडणूक आयुक्तांच्या विरोधाचा दिला दाखला!
SIR प्रक्रियेत महाराष्ट्रात ज्या मतदारांची नावे वगळली ती नावे पूर्ववत करा...' राज्यातील SIR प्रक्रियेला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान, दोन निवडणूक आयुक्तांच्या विरोधाचा दिला दाखला!
Vidyanand Bapat Pune : राजकारणात जाणार का? पुढची भूमिका काय? विद्यानंद बापट स्पष्टच बोलले; म्हणाले, 'उतावळा नवरा अन् गुडघ्याला बाशिंग...'
राजकारणात जाणार का? पुढची भूमिका काय? विद्यानंद बापट स्पष्टच बोलले; म्हणाले, 'उतावळा नवरा अन् गुडघ्याला बाशिंग...'
Video: ‘जल्दी बोल, सुबह पनवेल निकलना है’ म्हणताच प्राध्यापक संतापले; विद्यार्थ्याची स्टेजवरच कॉलर पकडली अन्...; नेमकं काय घडलं?
‘जल्दी बोल, सुबह पनवेल निकलना है’ म्हणताच प्राध्यापक संतापले; विद्यार्थ्याची स्टेजवरच कॉलर पकडली अन्...; नेमकं काय घडलं?
Pune Traffic Update : पुणेकरांनो लक्ष द्या! विसर्जन मिरवणुकीसाठी आज 17 प्रमुख रस्ते बंद; कोणते मार्ग बंद अन् कुठले रस्ते सुरु राहणार? जाणून घ्या सविस्तर
पुणेकरांनो लक्ष द्या! विसर्जन मिरवणुकीसाठी आज 17 प्रमुख रस्ते बंद; कोणते मार्ग बंद अन् कुठले रस्ते सुरु राहणार? जाणून घ्या सविस्तर
Student Elections: मोठी बातमी! महाराष्ट्रातील महाविद्यालयांत पुन्हा विद्यार्थी निवडणुकांचे वारे घुमणार; सरकारचा मोठा अ‍ॅक्शन प्लॅन तयार, आराखडा तयार करण्यासाठी 12 सदस्यांच्या समिती
मोठी बातमी! महाराष्ट्रातील महाविद्यालयांत पुन्हा विद्यार्थी निवडणुकांचे वारे घुमणार; सरकारचा मोठा अ‍ॅक्शन प्लॅन तयार, आराखडा तयार करण्यासाठी समितीला एका महिन्याची मुदत
Mumbaicha Raja Visarjan Miravnuk 2026: मुंबईचा राजा विसर्जनासाठी मार्गस्थ, परळचा राजाही निघाला; पाहा 10 फोटो
मुंबईचा राजा विसर्जनासाठी मार्गस्थ, परळचा राजाही निघाला; पाहा 10 फोटो
Embed widget