मुंबई: गेल्या वर्षी जवळपास 18 टक्के अतिश्रीमंत भारतीय म्हणजे अल्ट्रा हाय नेटवर्थ इंडिव्हिज्युअल्स (UHNWI) लोकांनी  क्रिप्टोकरन्सीमध्ये (Cryptocurrency) आपली गुंतवणूक केली असल्याची माहिती नाईट फ्रॅन्कच्या (Knight Frank) अहवालातून समोर आली आहे. भारतात गेल्या काही वर्षांपासून क्रिप्टोकरन्सीची लोकप्रियता वाढत असल्याचं यातून स्पष्ट होतंय. 


नाईट फ्रॅन्कने यासंबंधीचा एक अहवाल मंगळवारी जाहीर केला. त्यामध्ये सांगण्यात आलं आहे की जगभरातील 18 टक्के अल्ट्रा हाय नेटवर्थ इंडिव्हिज्युअल्सनी क्रिप्टोकरन्सीमध्ये आपली गुंतवणूक केली आहे. तर भारतात ही संख्या त्याच प्रमाणात आहे. तर 11 टक्के लोकांनी नॉन-फंजिबल टोकन्समध्ये (NFT) गुंतवणूक केली आहे.


अल्ट्रा हाय नेटवर्थ इंडिव्हिज्युअल्स म्हणजे कोण?
ज्या लोकांची संपत्ती ही 226 कोटी किंवा त्यापेक्षा जास्त असते त्यांना अल्ट्रा हाय नेटवर्थ इंडिव्हिज्युअल्स असं म्हटलं जातं. भारतात अशा अतिश्रीमंत लोकांची संख्या मोठी असल्याचं सांगितलं जातंय. 


नाईट फ्रॅन्कच्या या अहवालात सांगण्यात आलं आहे की, 2021 साली भारतामध्ये क्रिप्टोकरन्सीची लोकप्रियता वाढत असून 18 टक्के अतिश्रीमंत लोकांनी क्रिप्टोकरन्सीमध्ये गुंतवणूक केली आहे. 


रशिया-युक्रेन युद्धामुळे क्रिप्टोकरन्सीमध्ये घसरण
रशिया- युक्रेन युद्धाचा फटका जगातल्या सर्वच क्षेत्रांना बसत असून त्यामध्ये क्रिप्टोकरन्सीचाही समावेश आहे. गेल्या 24 तासांमध्ये क्रिप्टोच्या मार्केटमध्ये पाच टक्क्यांची घसरण झाली आहे. डाऊ जोन्स इंडस्ट्रियल अॅव्हरेज 1.38 टक्क्यांनी घसरल्याने यूएस स्टॉक मार्केटमध्ये पडझड झाली. बिटकॉइनची किंमत गेल्या 12 तासांमध्ये 7 टक्क्यांनी घसरून ती 35,000 डॉलर्सच्या खाली आली. रशिया-युक्रेन हल्ल्यांनतर सर्व पाच क्रिप्टोकरन्सी सर्व घसरत आहेत. बिटकॉइन दोन तासांपेक्षा कमी कालावधीत 5.6 टक्के घसरून 34,958 डॉरर्सवर आले.


संबंधित बातम्या: