Indian Premier League 2022: इंडियन प्रीमियर लीगच्या (आयपीएल) 15व्या हंगामाचा बिगुल वाजला आहे. सर्व 10 संघांचे चित्रही स्पष्ट झाले आहे. 26 मार्चपासून या स्पर्धेला सुरुवात होणार आहे. याआधी जाणून घ्या IPL 2022 मध्ये विराट कोहलीपासून केएल राहुलपर्यंत, कोणत्या खेळाडूला किती रक्कम मिळणार आहे. 


लिलावात या संघानी खर्च केली सर्वाधिक रक्कम 


आयपीएल 2022 च्या मेगा लिलावात पंजाब किंग्जने अनेक खेळाडूंसाठी मोठी रक्कम खर्च केली आहे. पंजाब किंग्सने इंग्लंडच्या लियाम लिव्हिंगस्टोनला 11.50 कोटींना खरेदी केले. तर दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज कागिसो रबाडासाठी 9.25 कोटी, अनकॅप्ड भारतीय खेळाडू शाहरुख खानसाठी 9 कोटी, शिखर धवनसाठी 8.25 कोटी, जॉनी बेअरस्टोसाठी 6.75 कोटी आणि राहुल चहरसाठी 5.25 कोटी रुपये खर्च केले आहेत. 


लखनौ सुपर जायंट्सनेही खेळाडूंसाठी मोजले इतके पैसे   
 
आयपीएल 2022 च्या या लिलावापूर्वी के एल राहुलला लखनौ सुपर जायंट्सने 17 कोटींमध्ये खरेदी करत संघात कायम ठेवले आहे. यानंतर फ्रँचायझीने युवा वेगवान गोलंदाज आवेश खानसाठी 10 कोटी रुपये, जेसन होल्डरसाठी 8.75 कोटी रुपये, क्रुणाल पांड्यासाठी 8.25 कोटी रुपये, मार्क वुडसाठी 7.50 कोटी रुपये, क्विंटन डी कॉकसाठी 6.75 कोटी रुपये लिलावात खर्च केले. तसेच ऑस्ट्रेलियाच्या मार्कस स्टॉइनिसला 9.20 कोटी रुपयांमध्ये आपल्या संघात समाविष्ट केले आहे. 


आयपीएल 2022 मध्ये खेळाडूंना मिळणार इतकी रक्कम 



  • केएल राहुल - 17 कोटी, लखनौ सुपर जायंट्स

  • रोहित शर्मा - 16 कोटी रुपये, मुंबई इंडियन्स

  • रवींद्र जाडेजा - 16 कोटी, चेन्नई सुपर किंग्ज

  • ऋषभ पंत – 16 कोटी रुपये, दिल्ली कॅपिटल्स

  • हार्दिक पांड्या - 15 कोटी रुपये, गुजरात टायटन्स

  • विराट कोहली - 15 कोटी, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू

  • एमएस धोनी - 12 कोटी रुपये, चेन्नई सुपर किंग्स


हे देखील वाचा-