Russia Ukraine War : रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन (Vladimir Putin) यांनी युक्रेनवर (Ukaraine) युद्धाची घोषणा केल्यामुळे बिटकॉइनची (Bitcoin) किंमत कोसळली. युक्रेनची राजधानी कीवमध्ये (Kyiv explosion) स्फोटांचे आवाज ऐकू आल्याचे अनेक माध्यमांनी सांगितले. दरम्यान युनायटेड स्टेट्समधील स्टॉक मार्केटच्या (stock market) अनुषंगाने बिटकॉइनची किंमत $35,000 च्या खाली गेली आहे. जाणून घ्या सविस्तर
तणाव वाढल्याने बिटकॉइनची किंमत घसरली
रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी "विशेष लष्करी ऑपरेशन" जाहीर केल्यानंतर बिटकॉइनच्या किमतीत मोठी घसरण झाली. पुतीन यांनी युक्रेनवर युद्ध घोषित केल्यानंतर मीडिया आउटलेट्सने राजधानी कीवमध्ये स्फोट झाल्याचे वृत्त दिले आहे. युक्रेनमधील खार्किव शहरात स्फोटांच्या मालिका ऐकू आल्याचेही वृत्त आहे. एकूण क्रिप्टोकरन्सी मार्केट कॅपिटलायझेशन गेल्या 24 तासांमध्ये जवळपास 5% घसरले आहे. डाऊ जोन्स इंडस्ट्रियल अॅव्हरेज 1.38% घसरल्याने यूएस स्टॉक मार्केट घसरले आहे.बिटकॉइनची किंमत मागील 12 तासांमध्ये 7% घसरून $35,000 च्या खाली आली, रशिया-युक्रेन हल्ल्यांनतर सर्व पाच क्रिप्टोकरन्सी सर्व घसरत आहेत, बिटकॉइन दोन तासांपेक्षा कमी कालावधीत 5.6% घसरून US$34,958 वर आले, तर CoinGecko च्या मते, Ethereum 7.7% ने US$2,382 वर घसरले.
युक्रेनमधील 7 जणांचा मृत्यू
रशियाने केलेल्या हल्ल्यात युक्रेनमधील 7 लोकांचा मृत्यू झाल्याची बातमी आहे. अहवालानुसार, रशियाच्या हल्ल्यात 7 लोकांचा मृत्यू झाला आहे, तर 9 लोक जखमी झाले आहेत. क्षेपणास्त्र हल्ल्यानंतर रशियाचे सैन्यदल आता युक्रेनमध्ये घुसले असून रणगाड्यांसह हल्ले करण्यास सुरुवात केली आहे. अहवालानुसार, युक्रेनमधील मारियुपोल शहरात अनेक रणगाडे घुसले आहेत. विमानतळाजवळून धूर निघत असल्याचेही वृत्त आहे. युक्रेनच्या इतर शहरांमध्येही विमानतळावर हल्ले झाल्याच्या बातम्या समोर येत आहेत.
रशियाच्या हल्ल्यानंतर युक्रेनमध्ये खळबळ
रशियाने युक्रेनची राजधानी कीववरदेखील हल्ला केला. डोन्बास प्रांतावर हल्ला करण्यासह युक्रेनच्या राजधानीवर हल्ला केल्याने मोठी खळबळ उडाली. रशियाच्या हल्ल्याचा युक्रेनच्या सैन्याने प्रतिकार सुरू केला आहे. दरम्यान, युक्रेनच्या सैन्यानेही रशियन हवाई दलाला झटका दिला आहे. रशियाची पाच विमाने पाडली असल्याचा दावा युक्रेनच्या सैन्याने केला आहे. युक्रेनने नागरी विमानांसाठी हवाई वाहतूक बंद केली आहे. रशियाने हल्ला केल्यानंतर कीवमध्ये गोंधळाची स्थिती आहे. शहर सोडून जाण्यासाठी नागरिकांची धावपळ सुरू आहे. रस्त्यांवर वाहनांच्या लांबच लांग रांगासह मोठी वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
- Russia Ukraine War : रशियाच्या युक्रेनवरील हल्ल्याचे कारण काय? जाणून घ्या पाच महत्त्वाचे मुद्दे
- Russia Ukraine Conflict : युक्रेनमध्ये अडकलेले 242 भारतीय मायदेशी परतले
- Russia Ukraine War : युक्रेनची राजधानी कीवमध्ये अनागोंदी; शहर सोडण्यासाठी नागरिकांची धावपळ, मोठी वाहतूक कोंडी
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha