Crypto Fever : गेल्या एका वर्षात भारतात क्रिप्टोकरन्सीचं क्रेझ वाढताना दिसत आहे. या वर्च्युअल करंन्सीमध्ये गुंतवणूक करण्यासाठी जगभरातील अनेक गुंतवणूकदार उत्सुक असतात. देशात क्रिप्टोकरन्सीबाबत कोणतंही नियमन करण्यात आलेलं नसतानाही दररोज नवनवीन लोक क्रिप्टो बाजारात सामील होत आहेत. हीच बाब लक्षात घेत दिल्लीतील काही उद्योजकांनी क्रिप्टोकरंसीमध्ये गुंतवणूक करण्यास सुरुवात केली आहे. आता तुम्ही जेवणाच्या थाळीसाठी आपल्या क्रेडिट/डेबिट कार्ड, रोख रक्कम किंवा डिजिटल पेमेंटऐवजी बिटकॉइन, इथीरियम, डॅश, डोजेकॉइन, लाइटकॉइन यांसारख्या वर्च्युअल करंन्सीद्वारे पेमेंट करु शकता. 


दिल्लीतील कनॉट प्लेसमध्ये Ardor 2.1 रेस्टोरेंटने 'क्रिप्टो थाली' लॉन्च केली आहे. रेस्टॉरंटच्या मालकीण मेघा कालरा यांनी दावा केला आहे की, "देशात त्यांचं रेस्टॉरंट असं पहिलं रेस्टॉरंट आहे, ज्यांनी क्रिप्टोकरेंसी स्विकारण्यास सुरु केलं आहे. या रेस्टॉरंटमधील थाळीची किंमत 1,999 रुपये (कर वगळता)  इतकी ठेवण्यात आली आहे.", पुढे बोलताना कारला यांनी सांगितलं की, "ऑर्डर देण्यासाठी पूर्णपणे डिजिटल प्रक्रिया राबवण्यात येते. मेन्यूही ग्राहकांसमोर एका व्हिडीओ माध्यमातून वर्च्युअली प्ले होतो. ऑर्डर देताना आपली आवडती डिश निवडण्यासाठी एक क्यूआर कोड देण्यात येतो. त्यामुळे या रेस्टॉरंटमध्ये ऑर्डर देताना कोणत्याही व्यक्तीशी कोणत्याही प्रकारचा संवाद साधण्याची गरज भासत नाही. ही एक आगळी-वेगळी पद्धत आहे." दरम्यान, या रेस्टॉरंट्समध्ये 100 हून अधिक डिजिटल थाळी विकल्या गेल्यानंतरही बिल भरण्यासाठी क्रिप्टो करंन्सीची निवड करणारा पहिला ग्राहक मात्र अद्याप मिळालेला नाही. 


"क्रिप्टो हा मुख्य प्रवाहातील विषय आहे. म्हणून आम्हालाही त्याचा वापर करायचा होता आणि जाणून घ्यायचं होतं की, प्रयोगाच्या दृष्टीनं ते कसं कार्य करतं. आम्ही क्रिप्टोद्वारे पेमेंट करणाऱ्यांना 20 टक्के सूट देत आहोत, तर वापरकर्ते कोणत्याही सवलतीशिवाय रोख, कार्ड किंवा पेटीएमद्वारे पैसे देऊ शकतात. आमच्याकडे  बिटकॉइन टिक्का, सोलाना चोले भटुरे, पॉलीगॉन पिटा ब्रेड फलाफेल, इथेरियम बटर चिकन आणि बरेच काही पर्याय ग्राहकांसाठी उपलब्ध आहेत.", असं कालरा यांनी फायनान्शियल एक्सप्रेस या वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत म्हटलं आहे. 


महत्त्वाच्या इतर बातम्या : 


Petrol-Diesel Price Today : देशात इंधनाच्या दरांचा उच्चांक; आज पुन्हा पेट्रोल-डिझेलचा 'भडका', मुंबईत 'रेकॉर्ड ब्रेक' दर