मुंबई:आर्थिक वर्ष 2025-26 च्या पहिल्या तिमाहीचे निकाल झोमॅटो आणि ब्लिंकीटचीपेरेंट कंपनी असलेल्या इटरनलकडूनन जाहीर करण्यात आल्यानंतरस्टॉकतेजीत आहे. सलग दुसऱ्या दिवशी इटरनलच्यास्टॉकमध्ये तेजी पाहायला मिळाली. दोन दिवसांमध्ये इटरनलच्याशेअरमध्ये20 टक्क्यांची वाढ झाली आहे. मंगळवारी बाजार सुरु झाला तेव्हा इटरनलच्याशेअरमध्येगुंतवणूकदारांनी जोरदार गुंतवणूक केली. इटरनलचास्टॉक311.60रुपयांवर म्हणजेच आतापर्यंतच्याउच्चांकावर पोहोचला होता. इंट्रा डे मध्ये तेजी आल्यानंइटरनलचंबाजारमूल्य3 लाख कोटी रुपयांच्यापुढं गेलं आहे. इटरनलने कालच पहिल्या तिमाहीचे निकाल जाहीर केले होते. त्यानंतर स्टॉकमध्ये5 टक्के वाढ झाली होती. तर, मंगळवारी म्हणजे स्टॉकमध्ये15 टक्के वाढ झाल्याचं पाहायला मिळालं.
पहिल्या तिमाहीच्या निकालानंतर गुंतवणूकादरांनीइटरनलच्यास्टॉक खरेदीसाठी उत्साह दाखवला आहे. हे पाहता ब्रोकरेज फर्मीकडून बायरेटिंग देण्यात आलं आहे. या स्टॉकचं टारगेट प्राइस 400 रुपये करण्यात आलं आहे. ब्रोकरेज हाऊस मोतीलाल ओसवालकडूनइटरनलचं टारगेट प्राइस 310 रुपयांवरुन330रुपये केलं आहे. ब्रोकरेजफर्मनंब्लिंकीटलाकंपनीचंग्रोथइंजिनमम्हटलं आहे. जागतिक फर्मजेफरीजनंइटरनलचंरेटिंगहोल्डवरुनबाय केलं आहे. टारगेट प्राईस250 रुपयांवरुन400 रुपये केलं आहे. इटरनल झोमॅटोचा स्टॉक आज 28 रुपयांनी वाढून 299.80 रुपयांवर बंद झाला.
विशेष बाब म्हणजे इटरनलचा नफा आर्थिक वर्ष 2025-26 च्या पहिल्या तिमाहीत25 कोटी राहिला आहे. पहिल्या तिमाहीतील नफ्यात 90.11 टक्क्यांनी घसरण झाली होती. गेल्या वर्षी पहिल्या तिमाहीत कंपनीचा नफा 253 कोटी रुपये होता. मात्र, कंपनीचं उत्पन्न गतवर्षीच्या तुलनेत 70.3 टक्क्यांनी जास्त आहे. इटरनलचं गेल्या वर्षीच्या पहिल्या तिमाहीत4206 कोटी रुपये उत्पन्न होतं ते वाढून 7167 कोटी रुपये झालं आहे. इटरनलचीक्विक कॉमर्स कंपनी ब्लिंकीटचा महसूल या वर्षीत154.7 टक्क्यांनी वाढला आहे. जो वाढून 2400 कोटी रुपयांवर पोहोचला आहे.
दरम्यान, शेअर बाजारातील सकाळच्या तेजीनंतर आज घसरण पाहायला मिळाली. सेन्सेक्स आणि निफ्टी 50 मध्ये किरकोळ घसरण पाहायला मिळाली. सेन्सेक्समध्ये 13.53 अंकांची घसरण होऊन तो 82186.81 अंकांवर बंद झाला. निफ्टी 50 मध्ये 29.80 अंकांची घसरण झाली असून 25060.90 अंकांवर पोहोचला.
(टीप- शेअर बाजार, म्यूच्यूअल फंड हे जोखमीच्या अधीन असतात. या लेखात दिलेली माहिती ही प्राथमिक स्वरुपाची असून आम्ही कोणताही दावा करत नाही. या लेखामागचागुंतवणुकीसाठी शिफारस, सल्ला देण्याचा उद्देश नाही. तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)
