एक्स्प्लोर

Coronavirus | कच्च्या तेलाच्या किमतीत ऐतिहासिक घसरण; भारताला 'हे' फायदे होऊ शकतात

कच्च्या तेलाच्या किमतीत इतिहासातील सर्वात मोठी घसरण नोंदवण्यात आली आहे. अमेरिकेमध्ये कच्च्या तेलाची किंमत बाटलीबंद पाण्यापेक्षाही कमी झाली आहे. कच्च्या तेलाची किंमत शून्य डॉलरपेक्षा कमी झाली आहे.

नवी दिल्ली : कोरोना व्हायरससारख्या जीवघेण्या रोगाशी अख्खं जग लढत आहे. जगभरातील अनेक देशांमध्ये लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. यामुळे अनेक लोक आपल्या घरांमध्ये बंद आहेत. अशातच कोरोनानंतर संपूर्ण जगावर मंदीच सावट येणार असल्याचा अंदाज अनेक अर्थतज्ज्ञांनी व्यक्त केला आहे. यामध्येच कच्च्या तेलाच्या किमतीत इतिहासातील सर्वात मोठी घसरण नोंदवण्यात आली आहे. अमेरिकेमध्ये कच्च्या तेलाची किंमत बाटलीबंद पाण्यापेक्षाही कमी झाली आहे. कच्च्या तेलाची किंमत शून्य डॉलरपेक्षा कमी झाली आहे. वायदा बाजारात कच्च्या तेलाची किंमत -37.56 डॉलर प्रति बॅरल नोंदवण्यात आली आहे. फक्त तीन महिन्यांमध्ये कच्च्या तेलांच्या किमतीमध्ये मोठ्याप्रमाणावर घट झाल्याची नोंद करण्यात आली आहे.

कच्च्या तेलांच्या किमतीत घट का?

आता सर्वांच्याच मनात एकाच प्रश्नाने घर केलं आहे. ते म्हणजे, कच्च्या तेलांच्या किमतीत एवढ्या मोठ्या प्रमाणावर घट का होत आहे? दरम्यान, कोरोना व्हायरसमुळे जगभरात लॉकडाऊन जारी करण्यात आला आहे. तसेच हवाई वाहतूकही बंद ठेवण्यात आली आहे. सौदी अरब आणि रूस यांच्यामधीस प्राइज वॉरमुळेही मागणीत घट झाल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे.

जगभरात तेलाचं उत्पादन वाढत आहे. परंतु, मागणीत घट झाल्यामुळे कच्च्या तेलाच्या किमतीत घसरण झाली आहे. जगभरातील औद्यागिकीकरण बंद आहे. ज्याचा प्रभाव कच्च्या तेलाच्या किमतींवर पडला आहे.

कच्च्या तेलांच्या किमतींमध्ये झालेली पडझड भारतातील डगमगणाऱ्या अर्थव्यवस्थेला सांभाळू शकते. भारत जवळपास 80 टक्क्यांहून जास्त तेल आयात करतं. त्यासाठी भारताला आंतराष्ट्रीय मुद्रेत म्हणजेच, डॉलर्समध्ये किंमत मोजावी लागते. कच्च्या तेलांच्या किमतीत आलेल्या कमतरतेमुळे भारताला जास्त किंमत मोजावी लागणार नाही.

तेलाच्या किंमतीतील घसरणीचा भारतावर काय परिणाम ?

कच्च्या तेलाची साठवणूक करून भविष्यात लोकांना त्याचा फायदा मिळू शकतो. पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत कमतरता येऊ शकते. महागाईच्या दरातही कमतरता येऊ शकते. कच्च्या तेलाच्या किमती घटल्यामुळे भारताचा विकास दर वाढण्याचीही शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे भविष्यात सरकार व्याजदरात घट करू शकते.

अमेरिका कॅनडा, साऊथ कोरिया आणि भारतासह 44 देशांमध्ये कच्च्या तेलाची निर्यात करते. आकड्यांनुसार, 2018मध्ये कच्चं तेल आणि गॅसमुळे अमेरिकेने 181 बिलियन डॉलर इतका महसूल गोळा केला. तेलाच्या मागणीत घट आल्यामुळे अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेवर गंभीर परिणाम झाल्याचं पाहायला मिळत आहे. अमेरिकेतील तेल कंपन्यांवर असलेल्या कर्जाच्या ओझ्यामुळे बँकिंग आणि फायनांशिअल सेक्टर्ससाठीही धोक्याची घंटा आहे.

संबंधित बातम्या : 

RBI कडून मोठा दिलासा, रिव्हर्स रेपो रेटमध्ये कपातीसह अनेक महत्त्वाच्या घोषणा

Coronavirus : अर्थव्यवस्थेला आधार देण्यासाठी RBI च्या महत्त्वाच्या घोषणा, शेअर बाजारात सावध प्रतिक्रिया

महत्त्वाच्या बातम्या

फक्त 5 लाख रुपये गुंतवा, सव्वा सात लाख रुपये मिळवा, 'ही' आहे पोस्ट ऑफिसची भन्नाट योजना
फक्त 5 लाख रुपये गुंतवा, सव्वा सात लाख रुपये मिळवा, 'ही' आहे पोस्ट ऑफिसची भन्नाट योजना
नोकरीच्या शोधात असणाऱ्या युवकांसाठी मोठी बातमी, रेल्वेमध्ये 1 हजार 421 पदांसाठी भरती सुरु, कसा कुठे कराल अर्ज?
नोकरीच्या शोधात असणाऱ्या युवकांसाठी मोठी बातमी, रेल्वेमध्ये 1 हजार 421 पदांसाठी भरती सुरु, कसा कुठे कराल अर्ज?
Life Insurance : स्वातंत्र्यदिनी भारतीयांचा जीवन विम्यावर विश्वास वाढला; मोठ्या पॉलिसी घेण्याकडे ग्राहकांचा कल,सरासरी प्रीमियममध्ये 42 टक्के वाढ
स्वातंत्र्यदिनी भारतीयांचा जीवन विम्यावर विश्वास वाढला; मोठ्या पॉलिसी घेण्याकडे ग्राहकांचा कल
देशाला स्वातंत्र्य मिळालं त्यावेळी सोन्याला किती होता दर? आजचे दर काय? 80 वर्षात नेमकी किती झाली वाढ?
देशाला स्वातंत्र्य मिळालं त्यावेळी सोन्याला किती होता दर? आजचे दर काय? 80 वर्षात नेमकी किती झाली वाढ?

व्हिडीओ

Sunil Kendrekar Majha Katta : आएएस अधिकारी सुनील केंद्रेकर शेतीकडे कसे वळवले?
Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी
Pm Modi Speech Highlites : मोदींच्या लाल किल्ल्यावरील भाषणातले टॉप 10 मुद्दे
Sanjay Raut Mumbai : १५०० रुपये देऊन मते विकत घेतली अन् ईव्हीएमचा घोटाळा केला- संजय राऊत
Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Hasan Mushrif : रस्त्यांची अवस्था पाहून मला आज लाज वाटली; नंदुरबारमधील रस्त्यांच्या परिस्थितीवरुन पालकमंत्री हसन मुश्रीफ नाराज
रस्त्यांची अवस्था पाहून मला आज लाज वाटली; नंदुरबारमधील रस्त्यांच्या स्थितीवरुन हसन मुश्रीफ नाराज
Maharashtra live blog updates: अकोल्यात वेगवान राजकीय घडामोडी, एकनाथ शिंदेंचा खास माणूस अभय पाटील यांच्या भेटीला
Maharashtra live blog updates: अकोल्यात वेगवान राजकीय घडामोडी, एकनाथ शिंदेंचा खास माणूस अभय पाटील यांच्या भेटीला
Bar Council : बार काऊन्सिल ऑफ इंडियाच्या अध्यक्षांनी NALSAR प्रकरणी विद्यार्थ्यांची माफी मागितली, वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न
बार काऊन्सिलच्या अध्यक्षांनी विद्यार्थ्यांची माफी मागितली,वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न 
Akola Abhay Patil and Shinde Camp: एकनाथ शिंदेंचा खास माणूस रात्री अकोल्यात पोहोचला, अभय पाटलांसोबत दोन तास गुप्त खलबतं, महत्त्वाच्या घडामोडींचे संकेत
एकनाथ शिंदेंचा खास माणूस रात्री अकोल्यात पोहोचला, अभय पाटलांसोबत दोन तास गुप्त खलबतं, महत्त्वाच्या घडामोडींचे संकेत
प्रेरणादायी... पोलीस शिपाई ते सहाय्यक आयुक्त; ACP अशोक होनमाने 'अतिउत्कृष्ट सेवा पदकाने' सन्मानित
प्रेरणादायी... पोलीस शिपाई ते सहाय्यक आयुक्त; ACP अशोक होनमाने 'अतिउत्कृष्ट सेवा पदकाने' सन्मानित
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते, सगळं ठरलं होतं; पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते, सगळं ठरलं होतं; पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया
बीडमध्ये धनंजय मुंडेंच्या दोन मागण्या, पंकजा मुंडेंकडून एक लगेच मान्य; सुनेत्रा पवार म्हणाल्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवते
बीडमध्ये धनंजय मुंडेंच्या दोन मागण्या, पंकजा मुंडेंकडून एक लगेच मान्य; सुनेत्रा पवार म्हणाल्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवते
Rohit Pawar : तलाठी भरतीत भ्रष्टाचार झाल्याचं सिद्ध झालंय, तत्कालीन महसूलमंत्री म्हणून जबाबदारी स्वीकारुन राजीनामा द्या, रोहित पवार यांचं राधाकृष्ण विखे पाटील यांना आव्हान
मुख्यमंत्र्यांनी मंत्रिमंडळ खातेवाटपात आपलं स्थान कुठं ठेवलं, कधीतरी आत्मपरिक्षण करा, रोहित पवार यांचा विखे पाटलांना टोला
Embed widget