Real Estate News: रिअल इस्टेट क्षेत्रात पुन्हा एकदा तेजी आली आहे. कोरोना कालावधीनंतर 2022 मध्ये रिअल इस्टेट क्रियाकलापांच्या तीव्रतेचा फायदा गृहनिर्माण बाजारांना निश्चितपणे होताना दिसतो आहे. पण कोरोनाच्या काळातही मोठ्या शहरांमध्ये मालमत्तेला मागणी वाढलेली दिसते आहे. अॅनारॉक प्रॉपर्टी कन्सल्टंटच्या यांच्या अहवालानुसार 2021 मध्ये पहिल्या सात शहरांमध्ये 2.37 लाख घरे विकली गेली आहेत.
पीटीआयनं दिलेल्या वृत्तानुसार, देशातील मुख्य मालमत्ता बाजारपेठ मुंबईत मागणी, पुरवठा आणि किमतीच्या आघाडीवर अभूतपूर्व वाढ अपेक्षित आहे. 2021 मध्ये कोविड-19 महामारीमुळे अडचणी असतानाही 38,000 युनिट्सची विक्री झाली. यूबीएस सिक्युरिटीज इंडियाच्या अहवालातून ही माहिती पुढे आली आहे . अहवालानुसार, मुंबईची शहरी संस्था बीएमसीने 2021 मध्ये बिल्डिंग क्लिअरन्स फी म्हणून सुमारे 14,200 कोटी रुपये कमावले आहेत, जे मागील वर्षाच्या तुलनेत पाचपट जास्त आहे.
मुंबईसाठी रिअल इस्टेट कंपन्यांच्या योजनांत वाढ
मुंबई आगामी काळात सर्वात फायदेशीर प्रॉपर्टी मार्केट बनू शकते, असे या अहवालात म्हटले आहे. यूबीएस सिक्युरिटीजने सांगितले की, नियामक उपक्रमांमुळे मागणी आणि पुरवठ्यात झपाट्याने वाढ होत आहे. मुंबईत मध्यम कालावधीत पुरवठा वाढेल. बहुतांश रिअल इस्टेट कंपन्यांनी मुंबईसाठी त्यांच्या योजना अधिक तीव्र केल्या आहेत, असे अहवालात म्हटले आहे.
कोरोनाच्या काळात विक्री वाढली
याशिवाय,नियामक उपायांप्रमाणे क्लिअरन्स फीमध्ये 50 टक्के माफी, झोपडपट्टी पुनर्वसन आणि किनारी नियमांसह पुनर्विकास धोरणांचे उदारीकरण यामुळे मध्यम कालावधीत येथे मागणी वाढेल असा अंदाज आहे. कारण कोरोनाच्या काळात दिल्ली-एनसीआर, मुंबई महानगर प्रदेश, पुणे, कोलकाता, बेंगळुरू, चेन्नई आणि हैदराबादसारख्या मोठ्या शहरांमध्ये मालमत्ता खरेदी-विक्री सुरूच होती.
संबंधित बातमी:
Knight Frank Index: मुंबईत सरासरी 350 घरांच्या खरेदीसाठी नोंदणी; नाईट फ्रॅन्क इंडियाचा अहवाल
Knight Frank Index : जगभरातील 150 शहरांमधील घरांच्या किंमतीत सरासरी 10.6 टक्क्यांची वाढ