Who Is Sandeep Nangal Ambian: पंजाबमधील (Panjab) जालंधरमध्ये (Jalandhar) सोमवारी सायंकाळी आंतरराष्ट्रीय कबड्डीपटू संदीप नांगल अंबिया  (Sandeep Singh Ambiya) यांची हत्या करण्यात आली. एका कबड्डी सामन्यादरम्यान अज्ञातांनी संदीप नांगल अंबिया याच्यावर गोळ्या झाडल्या. या हल्ल्यात संदीप गंभीर जखमी झाला. जखमी अवस्थेत त्याला जवळच्या रुग्णालयात नेण्यात आले. परंतु, डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं. संदीप नांगल अंबियाच्या हत्येनं कबड्डी विश्वात एकच खळबळ उडाली आहे. तर, संदीप नांगल अंबिया कोण आहे? त्यानं कशाप्रकारे कबड्डी विश्वावर आपली छाप सोडली? याबाबत जाणून घेऊयात. 


मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी सायंकाळी पंजाबमधील जालंधरमध्ये स्टेडियममध्ये खेळल्या जात असलेल्या कबड्डी स्पर्धेच्या सामन्यादरम्यान अज्ञात लोकांनी संदीप नांगल आंबिया याच्यावर गोळ्या झाडल्या. त्यानंतर मैदानात एकच खळबळ माजली.  कोणाला काही समजण्यापूर्वीच गोळीबार करणारे हल्लेखोरांनी घटनास्थळावरून पळ काढला. त्यानंतर जखमी संदीप नागंल आंबियाला जवळच्या रुग्णालयात घेऊन जाण्यात आलं. परंतु, जास्त रक्तस्त्राव झाल्यानं वाटेतच त्याचा मृत्यू झाला. संदीप नांगल अंबियाची कोणी हत्या केली? त्यामागे काय कारणं आहेत, ते अजून स्पष्ट झालेलं नाही.


कोण आहेत संदीप नांगल अंबिया?
संदीप नांगल अंबिया हे एक प्रतिभावान कबड्डीपटू होता. कबड्डी विश्वामध्ये त्यानं स्वत:ची एक वेगळीच ओळख निर्माण केली होती. आपल्या खेळानं त्यांनं प्रेक्षकांची मन जिंकून घेतली होती. त्यांनी दहा वर्षांहून अधिक काळ कबड्डीच्या स्पर्धा गाजवल्या होत्या. केवळ पंजाबमध्येच नव्हेतर तर, संदीपनं जागतिक कबड्डी स्पर्धांमध्येही आपली छाप सोडली आहे. त्यानं कॅनडा, अमेरिका, यूकेमधल्या कबड्डी स्पर्धेत उत्तम प्रदर्शन केलं. व्यावसायिक कबड्डी खेळताना तो स्टॉपर पोजिशनवर खेळला. राज्यस्तरीय सामन्यांमधून त्यानं आपल्या कारकिर्दीची सुरूवात केली होती. त्याला ‘ग्लॅडिएटर’ म्हणून ओळखले जात होते.


हे देखील वाचा- 



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha