मुंबई : जगभरातील 150 शहरांमध्ये राहत्या घरांच्या किंमतीमध्ये सरासरी 10.6 टक्क्यांची वाढ झाली आहे. नाइट फ्रँक या प्रमुख आंतरराष्ट्रीय मालमत्ता सल्लागार संस्थेने त्यांचा या वर्षातील तिमाहीचा ग्लोबल रेसिडेन्शियल सिटीज इंडेक्स 2021 जाहीर केला आहे. त्यामध्ये ही माहिती दिली आहे. सन 2005 नंतर घरांच्या किंमतीत एवढ्या जलग गतीने वाढल्या आहेत. 


नाईट फ्रँकच्या ग्लोबल रेसिडेन्शियल सिटीज इंडेक्समध्ये असं म्हटलं आहे की गेल्या वर्षभराच्या कालावधीत 93 टक्के शहरांतील घरांच्या किमती वाढल्या आहेत. एकूण 44 टक्के शहरांनी वर्षात दोन अंकी दर वाढ नोंदविली आहे यामध्ये भारतातील या शहरांचा समावेश आहे.


भारताचा विचार करता हैदराबादने घरांच्या किंमतीत सर्वाधिक वाढ नोंदवली. या शहरात 2.5 टक्क्यांची वाढ नोंदवली आहे. त्यानंतर चेन्नईचा क्रमांक लागत असून या शहरात 2.2 टक्क्यांची वाढ नोंदवण्यात आली आहे. या यादीत कोलकाता 035 व्या आणि अहमदाबाद 139 व्या क्रमांकावर आहे. घरांच्या किमतींमध्ये 1.8 टक्क्यांची घट नोंदवत मुंबई हे 146 व्या क्रमांकावर असलेले भारतीय शहर  आहे.


नाइट फ्रँक काय आहे? 
नाइट फ्रँक (Knight Frank) ही एक जागतिक स्तरावरील आघाडीची मालमत्ता सल्लागार कंपनी आहे. लंडनमध्ये मुख्यालय असलेल्या नाइट फ्रँकचे 20 हजार कर्मचारी जगातील 60 बाजारपेठांतील 488 हून अधिक कार्यालयांमधून काम करत आहेत. हा समूह व्यक्तीगत मालक व ग्राहक ते प्रमुख विकासक, गुंतवणूकदार आणि कॉर्पोरेट भाडेकरु यांना सल्ला देता.


भारतात नाइट फ्रँकचे मुख्यालय मुंबईमध्ये आहे आणि बंगळुरु, दिल्ली, पुणे, हैदराबाद, चेन्‍नई, कोलकाता आणि अहमदाबाद या शहरांमध्ये 1400 हून अधिक तज्ज्ञ कर्मचारी या कंपनीसाठी काम करत आहेत. बळकट संशोधन आणि विश्लेषणाचे पाठबळ असलेले हे तज्ज्ञ विविध विभागांत (निवासी, व्यावसायिक, रिटेल, हॉस्पिटॅलिटी, जमीन व भांडवल) सल्ला, मूल्यांकन आणि कन्सल्टन्सी सेवा पुरवतात. त्याचप्रमाणे फॅसिलिटी व्यवस्थापन व प्रकल्प व्यवस्थापनाच्या सेवाही पुरवतात.


महत्त्वाच्या बातम्या :