मुंबई: गेल्या वर्षीच्या तुलनेत या वर्षी मुंबईतील घरे खरेदी करणाऱ्यांच्या संख्येत वाढ झाली आहे. फेब्रुवारी 2022 मध्ये मुंबईमध्ये 9,805 लोकांनी घरांच्या खरेदीसाठी नोंदणी केली आहे. गेल्या वर्षीच्या म्हणजे फेब्रुवारी 2021 च्या तुलनेत ही 4 टक्क्यांची घसरण झाली आहे. या घरांच्या नोंदणीतून सरकारला 549 कोटींचा महसूल मिळाला आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत या या वर्षी 56 टक्के महसूल वाढला असून तो 549 कोटीपर्यंत पोहोचला आहे. देशातील अग्रगण्य रिअल इस्टेट कन्सलटंन्सी कंपनी असलेल्या नाईट फ्रॅन्क इंडियाच्या (Knight Frank India) अहवालातून ही बाब समोर आली आहे. 


घरे नोंदणींच्या संख्येत 4 टक्क्यांची घसरण जरी झाली असली तरी त्यातून मिळणाऱ्या महसूलामध्ये वाढ झाली आहे. गेल्या 11 महिन्यामध्ये रोज सरासरी 350 घरांची नोंदणी झाली आहे. गेल्या दोन वर्षांमध्ये देशात असलेल्या कोरोनाच्या परिस्थितीमुळे रिअल इस्टेट क्षेत्रात मंदी आली होती. त्यातून देश बाहेर पडत असून त्याचा सकारात्मक परिणाम हा या क्षेत्रावर झाला आहे, त्यामुळेच या क्षेत्रातील व्यवहारांमध्ये वाढ झाल्याचं दिसून येतंय. 


वेस्टर्न मुंबईत 55 टक्के घरांची नोंदणी
मुंबईतील एकूण नोंद करण्यात आलेल्या घरांपैकी 55 टक्के घरं ही वेस्टर्न मुंबईतील आहेत. त्यानंतर सेंट्रल मुंबईत 33 टक्के घरांची नोंदणी झाली आहे. दक्षिण मुंबईतील घरांच्या नोंदणीत गेल्या वर्षीच्या तुलनेत या वर्षी घसरण झाली असून ती 6 टक्क्यांपर्यंत पोहोचली आहे. 


83 टक्के घरं ही 1000 स्केअर फूटांच्या आतील
मुंबईत 500 ते 1000 स्केअर फूटांपर्यंतच्या घरांच्या नोंदणीत यावेळीही वाढ झाली असून एकूण नोंदणीच्या 83स टक्के घरं ही 1000 स्केअर फूटाच्या आतील आहेत. त्याच्यावरील म्हणजे 1000 ते 2000 स्के. फूटांच्या घरांची एकूण नोंदणी ही 15 टक्के इतकी आहे. 


संबंधित बातम्या: