(Source: Poll of Polls)
केंद्र सरकारचा दुहेरी दिलासा; घरगुती सिलेंडरपाठोपाठ व्यावसायिक सिलेंडरच्या किमतीतही कपात, दर 158 रुपयांनी घटले
Commercial LPG Gas Cylinder Price: घरगुती स्वयंपाकाच्या गॅसनंतर आता सरकारने व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या दरात कपात केली आहे. व्यावसायिक एलपीजी सिलेंडर 158 रुपयांनी स्वस्त झाला आहे.
Commercial LPG Gas Cylinder Price: एलपीजी सिलेंडरच्या (LPG Gas Cylinder) किमतींमध्ये केंद्र सरकारनं दुहेरी दिलासा दिला आहे. तीन दिवसांपूर्वी सरकारनं घरगुती गॅस सिलेंडरच्या किमतींमध्ये 200 रुपयांची कपात केली होती. अशातच आज केंद्र सरकारनं व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या किमतीतही कपात केली आहे. एलपीजी सिलेंडरचे नवे दर आजपासून लागू करण्यात आले आहेत. आजपासून म्हणजेच 1 सप्टेंबर 2023 पासून व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या किमतींत मोठी कपात करण्यात आली आहे. 19 किलोग्रॅम व्यावसायिक गॅस सिलेंडरची किंमत 158 रुपयांनी कमी झाली आहे.
तेल कंपन्यांनी दिलेल्या माहितीनुसार, आता LPG ग्राहकांना नवी दिल्लीत 19 किलोच्या व्यावसायिक LPG गॅस सिलेंडरसाठी 1,522 रुपये मोजावे लागणार आहेत. कोलकात्यात 19 किलो एलपीजी सिलेंडरची किंमत 1636 रुपये, मुंबईत व्यावसायिक गॅस सिलेंडरची किंमत 1482 रुपये आणि चेन्नईमध्ये 19 किलो एलपीजी गॅस सिलेंडरची किंमत 1695 रुपये झाली आहे.
घरगुती गॅस सिलेंडरच्या किमती काय?
नवी दिल्लीमध्ये घरगुती सिलेंडरची किंमत 903 रुपये आहे.
कोलकातामध्ये 14.2 किलो सिलेंडरची किंमत 929 रुपयांनी विकला जातोय.
मुंबईत घरगुती सिलेंडरची किंमत 902.50 रुपये प्रति सिलेंडर आहे.
चेन्नईमध्ये घरगुती सिलेंडरची किंमत 918.50 रुपये झाली आहे.
घरगुती सिलेंडरच्या किमती उद्यापासून 200 रुपयांनी कमी
देशभरातील महिलांना मोदी सरकारनं राखी पौर्णिमेच्या एक दिवस आधीच मोठं गिफ्ट दिलं. मोदी सरकारनं घरगुती गॅस सिलेंडरच्या किमतींमध्ये 200 रुपयांची कपात केली आहे. तसेच, उज्ज्वला गॅस योजनेअंतर्गत 75 लाख भगिनींना मोफत गॅस कनेक्शन मिळणार आहे. त्यासाठी त्यांना एक रुपयाही द्यावा लागणार नाही. पाईप, स्टोव्ह आणि सिलेंडरही मोफत मिळेल. जगभरात गॅसच्या किमती वाढल्या आहेत, मात्र भारतात त्याचा परिणाम कमी आहे, असंही घोषणा करताना केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर म्हणाले.
व्यावसायिक सिलेंडरच्या दरांत दर महिन्याला बदल
जुलैपूर्वी, व्यावसायिक एलपीजी सिलेंडरच्या किमती यावर्षी मे आणि जूनमध्ये सलग दोनदा कमी करण्यात आल्या होत्या. मे महिन्यात तेल कंपन्यांनी व्यावसायिक एलपीजी सिलेंडरची किंमत 172 रुपयांनी कमी केली होती. जूनमध्ये 83 रुपयांची घट करण्यात आली होती. याशिवाय या वर्षी एप्रिलमध्येही त्यांच्या किमती 91.50 रुपये प्रति युनिटनं कमी करण्यात आल्या होत्या.
मार्चमध्ये घरगुती गॅसच्या किमती वाढल्या
पेट्रोलियम आणि तेल कंपन्यांनी याचवर्षी 1 मार्च रोजी व्यावसायिक एलपीजी सिलेंडरच्या किमती 350.50 रुपयांनी कमी केल्या होत्या. यासोबतच एलपीजी सिलेंडरच्या दरांत प्रति युनिट 50 रुपयांनी वाढ करण्यात आली आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :