Share Market: सकाळच्या दबावानंतर शेअर बाजार दुपारी सावरला, Sensex 249 अंकांनी वधारला
Stock Market Updates: ऑटो, ऑईल अॅंड गॅस आणि बँकिंग क्षेत्रातल्या शेअर्समध्ये आज 0.5 टक्क्यांची वाढ झाली.
मुंबई: सकाळी दिसत असलेल्या विक्रीच्या दबावानंतर आता शेअर बाजार (Closing Bell Share Market Updates) त्यातून सावरल्याचं दिसून येतंय. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्समध्ये (Sensex) आज 248 अंकांची वाढ झाली. तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टीमध्ये (Nifty) 74 अंकांची वाढ झाली. सेन्सेक्समध्ये आज 0.40 टक्क्यांची वाढ होऊन तो 61,872 अंकांवर स्थिरावला. तर निफ्टीमध्येही आज 0.40 टक्क्यांची वाढ होऊन तो 18,403 अंकांवर पोहोचला. निफ्टी बँकमध्ये आज 295 अंकांची वाढ होऊन तो 42,372 अंकांवर पोहोचला.
आज शेअर बाजार बंद होताना 1582 शेअर्समध्ये वाढ झाली. तर 1814 शेअर्समध्ये घसरण झाली. आज एकून 120 शेअर्समध्ये कोणताही बदल झालेला नाही. आज शेअर बाजार बंद होताना Power Grid Corporation, ONGC, ICICI Bank, Bharti Airtel आणि Dr Reddy's Laboratories या कंपन्यांच्या निफ्टीमध्ये वाढ झाली. तर Coal India, HDFC Life, Grasim Industries, Cipla आणि Bajaj Finserv या कंपन्याच्या निफ्टीमध्ये घट झाली.
आज बाजार बंद होताना ऑटो, ऑईल अॅंड गॅस आणि बँकिंग क्षेत्रातल्या शेअर्समध्ये आज 0.5 टक्क्यांची वाढ झाली.
रुपया 16 पैशांनी वधारला
आज डॉलरच्या तुलनेत रुपयाची किंमत 16 पैशांनी वधारली. आज रुपयाची किंमत 81.10 इतकी आहे.
आज सकाळी बाजारातील व्यवहाराला सुरुवात झाली तेव्हा मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स (Sensex) 5.90 अंकांच्या किंचीत तेजीसह 61,630.05 अंकांवर खुला झाला. तर, राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी (Nifty) 33.60 अंकांनी वधारत 18,362.75 अंकांवर खुला झाला. सकाळी 10.15 वाजण्याच्या सुमारास सेन्सेक्स 72.87 अंकांच्या घसरणीसह 61,551.28 अंकांवर व्यवहार करत होता. तर, निफ्टी निर्देशांक 21.20 अंकांच्या घसरणीसह 18,307.95 अंकांवर व्यवहार करत होता.
या शेअर्समध्ये वाढ झाली
- ONGC- 2.23 टक्के
- Power Grid Corp- 2.20 टक्के
- ICICI Bank- 1.87 टक्के
- Bharti Airtel- 1.62 टक्के
- UltraTechCement- 1.61 टक्के
या शेअर्समध्ये घसरण झाली
- Coal India- 6.09 टक्के
- HDFC Life- 1.10 टक्के
- Cipla- 0.95 टक्के
- Grasim- 0.86 टक्के
- Bajaj Finserv- 0.57 टक्के