(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Share Market : दिवाळीपूर्वी शेअर बाजारात बहार, Sensex 549 अंकांनी वधारला
Stock Market Updates : एफएमसीजी, ऑटो, कॅपिटल गुड्स, उर्जा आणि सार्वजनिक बँकांच्या शेअर्समध्ये एक ते चार टक्क्यांची वाढ झाल्याचं दिसून येतंय.
मुंबई : दिवाळीपूर्वी शेअर बाजारात सकारात्मक स्थिती असल्याचं दिसून येत असून सलग तिसऱ्या दिवशी प्रमुख निर्देशांकात वाढ झाली आहे. आज शेअर बाजार (Closing Bell Share Market Updates) बंद होताना मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्समध्ये 549 अंकाची वाढ झाली. तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टीमध्ये 175 अंकांची वाढ झाली आहे. सेन्सेक्समध्ये आज 0.94 टक्क्यांची वाढ होऊन तो 58,960 अंकांवर पोहोचला. तर निफ्टीमध्ये 1.01 टक्क्यांची वाढ होऊन तो 17,487 अंकांवर पोहोचला. निफ्टी बँकमध्येही 398 अंकांची वाढ होऊन तो 40,318 अंकांवर पोहोचला.
आज शेअर बाजार बंद होताना 2007 कंपन्यांच्या शेअर्समध्ये वाढ झाली, तर 1332 कंपन्यांच्या शेअर्समध्ये घट झाली. आज 119 कंपन्यांच्या शेअर्समध्ये कोणताही बदल झालेला नाही. आज SBI, Adani Ports, Eicher Motors, Nestle India आणि SBI Life Insurance या कंपन्यांच्या निफ्टीमध्ये वाढ झाली. तर NTPC, HDFC, Bajaj Auto, Tech Mahindra आणि Britannia Industries या कंपन्यांच्या निफ्टीमध्ये घसरण झाली.
आज बाजार बंद होताना एफएमसीजी, ऑटो, कॅपिटल गुड्स, उर्जा आणि सार्वजनिक बँकांच्या शेअर्समध्ये एक ते चार टक्क्यांची वाढ झाल्याचं दिसून येतंय. बीएसई मिडकॅप आणि स्मॉलकॅपमध्येही 0.7 ते 1 टक्क्यांपर्यंत वाढ झाली.
शेअर बाजाराची सुरुवात तेजीने
आज शेअर बाजारातील व्यवहाराची सकारात्मक सुरुवात झाली. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक असलेला सेन्सेक्स 333.15 अंकांनी वधारत 58,744 अंकांवर खुला झाला. तर, राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी 126.95 अंकांनी वधारत 17,438 अंकांवर खुला झाला. सकाळी 9.35 वाजण्याच्या सुमारास सेन्सेक्स 584 अंकांच्या तेजीसह 58,995.29 अंकांवर व्यवहार करत होता. तर, निफ्टी 168 अंकांच्या तेजीसह 17,480.00 अंकांवर व्यवहार करत होता.
या कंपन्यांच्या शेअर्समध्ये वाढ झाली
- SBI- 3.46 टक्के
- Adani Ports- 3.02 टक्के
- Eicher Motors- 2.78 टक्के
- Nestle- 2.47 टक्के
- SBI Life Insura- 2.46 टक्के
या कंपन्यांच्या शेअर्समध्ये घसरण झाली
- NTPC- 0.89 टक्के
- HDFC- 0.75 टक्के
- Bajaj Auto- 0.49 टक्के
- Tech Mahindra- 0.38 टक्के
- Britannia- 0.29 टक्के