(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Share Market : शेअर बाजारात तेजी कायम, Sensex 212 अंकांनी वधारला
Stock Market Updates : शेअर बाजारातील मेटल, उर्जा आणि रिअॅलिटी क्षेत्रातल्या शेअर्समध्ये दोन ते तीन टक्क्यांची वाढ झाली.
मुंबई: आंतरराष्ट्रीय स्तरावरील सकारात्मक संकेतांचा परिणाम भारतीय शेअर बाजारावर (Stock Market Updates) झाल्याचा दिसून आला. आज बाजार बंद होताना मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्समध्ये (Sensex) 212 अंकाची वाढ झाली तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशाक निफ्टीमध्ये ( Nifty) 80 अंकांची वाढ झाली. सेन्सेक्समध्ये आज 0.36 टक्क्यांची वाढ होऊन तो 59,756 अंकावर पोहोचला. तर निफ्टीमध्ये 0.46 टक्क्यांची वाढ होऊन तो 17,737 वर पोहोचला. निफ्टी बँकमध्येही आज 176 अंकांची वाढ होऊन तो 41,299 अंकावर पोहोचला.
आज शेअर बाजारात 1770 शेअर्समध्ये वाढ झाली, तर 1548 शेअर्समध्ये घट झाली. आज 125 कंपन्यांच्या शेअर्समध्ये कोणताही बदल झालेला नाही.
आज JSW Steel, Hindalco Industries, Tata Steel, Adani Ports आणि Power Grid Corporation या कंपन्यांच्या निफ्टीमध्ये वाढ झाली. तर Bajaj Finance, Bajaj Finserv, Asian Paints, Bajaj Auto आणि Nestle India कंपन्यांच्या निफ्टीमध्ये घसरण झाली.
मेटल, उर्जा आणि रिअॅलिटी क्षेत्रातल्या शेअर्समध्ये दोन ते तीन टक्क्यांची वाढ झाली. तर बीएसई मिडकॅप आणि स्मॉलकॅपमध्ये 0.4 टक्क्यांची वाढ झाली.
या कंपन्यांचे शेअर्स वाढले
- JSW Steel- 5.47 टक्के
- Hindalco- 3.51 टक्के
- Tata Steel- 2.96 टक्के
- Adani Ports- 2.61 टक्के
- Power Grid Corp- 2.47 टक्के
या कंपन्यांचे शेअर्स घसरले
- Bajaj Finance- 1.86 टक्के
- Bajaj Finserv- 1.66 टक्के
- Asian Paints- 1.34 टक्के
- Bajaj Auto- 0.87 टक्के
- Nestle- 0.74 टक्के
शेअर बाजाराची सुरुवात
बुधवारी, पाडवा आणि नवीन वर्षानिमित्त शेअर बाजारातील व्यवहार बंद होते. मंगळवारी गुंतवणूकदारांकडून नफावसुली दिसून आली. त्यानंतर आज गुरुवारी शेअर बाजारात खरेदीचा संकेत दिसून येत आहेत. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स 59,792.32 अंकांवर खुला झाला. तर, राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी 17,771.40 अंकांवर खुला झाला. सकाळी 9.45 वाजण्याच्या सुमारास निफ्टी 115.65 अंकांनी वधारत 17,771.40 अंकांवर व्यवहार करत होता. तर, सेन्सेक्स 382.72 अंकांनी वधारत 59,926.68 अंकांवर व्यवहार करत होता.
महत्त्वाची बातमी: