Share Market : शेअर बाजारातील घसरणीला ब्रेक, Sensex मध्ये 300 अंकांची वाढ
Stock Market Updates : मेटल क्षेत्रातल्या कंपन्यांच्या शेअर्समध्ये एक टक्क्याची घट झाली आहे. तर एफएमसीजी आणि सार्वजनिक बँकांच्या शेअर्समध्ये एक ते दोन टक्क्यांची वाढ झाली आहे.
मुंबई: शेअर बाजारातील (Stock Market Updates) सलग तीन दिवसांच्या घसरणीला ब्रेक लागला असून आज शेअर बाजार काही अंशी वधारला आहे. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्समध्ये 300 अंकांची वाढ झाली आहे. तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टीमध्ये 91 अंकांची वाढ झाली आहे. सेन्सेक्समध्ये आज 0.51 टक्क्यांची वाढ होऊन तो 59,141 अंकांवर स्थिरावला. तर निफ्टीमध्ये 0.52 अंकांची वाढ होऊन तो 17,622 अंकावर स्थिरावला. आज शेअर बाजारातील 1665 कंपन्यांच्या शेअर्समध्ये वाढ झाली, तर 1852 कंपन्यांच्या शेअर्समध्ये घट झाली. तसेच 127 कंपन्यांच्या शेअर्समध्ये कोणताही बदल झालेला नाही.
आज बाजार बंद होताना M&M, Bajaj Finance, SBI Life Insurance, Adani Ports आणि HUL या कंपन्यांच्या निफ्टीमध्ये वाढ झाली. तर Tata Steel, Tata Motors, Britannia Industries, Power Grid Corporation आणि ICICI Bank या कंपन्यांच्या निफ्टीमध्ये घट झाली.
आज मेटल क्षेत्रातल्या कंपन्यांच्या शेअर्समध्ये एक टक्क्याची घट झाली आहे. तर एफएमसीजी आणि सार्वजनिक बँकांच्या शेअर्समध्ये एक ते दोन टक्क्यांची वाढ झाली आहे.
रुपयामध्ये घसरण
आज शेअर बाजार बंद होताना डॉलरच्या तुनलेत रुपयाची तीन पैशांनी घसरण झाली आहे. डॉलरच्या तुलनेत आज रुपयाची किंमत ही 79.77 इतकी आहे.
शेअर बाजाराची सुरुवात घसरणीने
आज शेअर बाजारातील व्यवहार सुरू झाले तेव्हा सेन्सेक्स 93.48 अंकांच्या घसरणीसह 58,747 अंकांवर खुला झाला. तर, एनएसई निफ्टी 9.80 अंकांच्या तेजीसह 17,540 अंकांवर खुला झाला. निफ्टी मिडकॅप इंडेक्स 0.50 टक्क्यांच्या घसरणीसह व्यवहार करत होते. सकाळी 9.40 वाजण्याच्या सुमारास सेन्सेक्स 0.54 टक्क्यांच्या तेजीसह 58,841.33 अंकावर व्यवहार करत होता. तर निफ्टी 10 अंकांच्या तेजीसह 17,541.10 अंकांवर व्यवहार करत होता.
एकूणच आज शेअर बाजाराची सुरुवात काहीशी अस्थिरतेने झाली असली तरी बाजार बंद होताना मात्र तो सावरल्याचं दिसून आलं.
या कंपन्यांच्या शेअर्समध्ये वाढ झाली
- M&M- 3.08 टक्के
- Bajaj Finance- 3.05 टक्के
- SBI Life Insura- 2.44 टक्के
- Adani Ports- 2.28 टक्के
- HUL- 2.02 टक्के
या कंपन्यांच्या शेअर्समध्ये घट झाली
- Tata Steel- 2.46 टक्के
- Tata Motors- 1.63 टक्के
- Britannia - 1.30 टक्के
- ICICI Bank- 1.09 टक्के
- Power Grid Corp- 1.06 टक्के