Share Market: दोन दिवसांच्या घसरणीनंतर शेअर बाजार सावरला, Sensex 1736 अंकांनी वधारला तर Nifty 17,352 वर
Share Market: ऑटो, बँक, रिअॅलिटी, सार्वजनिक बँकांचे शेअर्समध्ये वाढ झाल्याचं दिसून आलं आहे.

Share Market: दोन दिवसांच्या घसरणीनंतर शेअर बाजार आज सावरल्याचं दिसून आला. आज शेअर मार्केट बंद होताना सेन्सेक्स 1,736 अंकांनी वधारला आहे तर निफ्टीही 509 अंकानी वधारला आहे. सेन्सेक्समध्ये 3.08 टक्क्यांची वाढ होऊन तो 58,142.05 वर पोहोचला आहे तर निफ्टीमध्ये 3.03 टक्क्यांची वाढ होऊन तो 17,352.50 वर पोहोचला आहे.
आज 1996 कंपन्यांच्या शेअर्समध्ये वाढ झाली आहे तर 1286 शेअर्समध्ये घसरण झाली आहे. 90 कंपन्यांच्या शेअर्सच्या किंमतीत कोणताही बदल झाला नाही.
आज बाजार बंद होताना ऑटो,बँक आयटी, फार्मा, रिअॅलिटी सेक्टरच्या, मेटल, उर्जा, ऑईल अॅन्ड गॅस या क्षेत्रातल्या शेअर्समध्ये वाढ झाली. BSE मिडकॅप आणि स्मॉलकॅपमध्येही 2 टक्क्यांची वाढ झाली आहे.
मंगळवारी शेअर बाजारात Tata Motors, Eicher Motors, Bajaj Finance, Shree Cements आणि Hero MotoCorp या कंपन्यांच्या निफ्टीमध्ये मोठी वाढ झाली असून Cipla आणि ONGCL या कंपन्यांच्या निफ्टीमध्ये घट झाली आहे.
आंतरराष्ट्रीय पातळीवर रशिया आणि युक्रेनच्या सीमेवर तणाव सुरू आहे. त्यामुळे आंतरराष्ट्रीय पातळीवर कच्च्या तेलाच्या किंमतीमध्ये मोठी वाढ झाली असून ती 94 डॉलर प्रति बॅरेल इतकी झाली आहे. त्याचा परिणाम भारतीय शेअर मार्केटवर झाल्याचं दिसून आलं होतं. ABG शिपयार्डने तब्बल 28 बँकांना 22,842 कोटी रुपयांचा चुना लावल्याचे समोर आले आहे. हा इतिहासातील सर्वात मोठा घोटाळा असल्याचं समोर आलं आहे. या दोन्ही घटनांचा परिणाम हा भारतीय शेअर बाजारावर होत आहे. पण आज शेअर बाजार सावरला.
रशिया आणि युक्रेनमध्ये सुरू असलेल्या तणावाचा परिणाम हा शॉर्ट टर्मसाठी असेल असं मत अनेक अर्थतज्ज्ञांनी व्यक्त केलं आहे. अमेरिकेतील विक्रमी महागाई, युक्रेन तणाव, अनिल अंबानी यांच्यासह इतर चार जणांवर सेबीने शेअर बाजारात व्यवहार करण्यास मनाई केली आहे.
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha























