एक्स्प्लोर

Share Market : शेअर बाजारातील चढ-उतार सुरूच, Nifty 15,500  वर तर  Sensex 488 अंकांनी वधारला

Stock Market : ऑटो इंडेक्समध्ये आज चार टक्क्यांची वाढ झाली तर कॅपिटल गुड्स, बँक, आयटी, फार्मा आणि रिअॅलिटी या क्षेत्रातल्या शेअर्समध्ये एक टक्क्याची वाढ झाली. 

मुंबई: शेअर बाजारातील चढ-उतारीचा खेळ सुरूच असून बुधवारच्या घसरणीनंतर आज पुन्हा एकदा शेअर बाजार वधारला आहे. आज शेअर बाजार बंद होताना मुंबई शेअर बाजारातील निर्देशांक सेन्सेक्समध्ये 488 अंकांची वाढ झाली तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी 162 अंकांनी वधारला. सेन्सेक्समध्ये आज 0.94 टक्क्याची वाढ होऊन तो 52,311 अंकावर स्थिरावला. तर निफ्टीमध्ये 1.06 टक्क्यांची वाढ होऊन तो 15,576 अंकावर पोहोचला. 

आज मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स 150 अंकांनी वधारत 51,972.75 अंकांवर खुला झाला. तर, राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टीमध्ये 38 अंकांची उसळण दिसून आली. निफ्टी 15,451.55 च्या पातळीवर खुला झाला होता. बुधवारी शेअर बाजारात घसरण असल्याचे दिसून आले होते. त्यानंतर आज सेन्सेक्स आणि निफ्टीमध्ये तेजी दिसून आली आहे.

आज शेअर बाजार बंद होताना 2037 कंपन्यांच्या शेअर्समध्ये वाढ झाली आहे तर 1188 कंपन्यांच्या शेअर्समध्ये घसरण झाली. आज 123 कंपन्यांच्या शेअर्समध्ये कोणताही बदल झालेला नाही. 

Maruti Suzuki, Hero MotoCorp, Eicher Motors, M&M आणि Bajaj Auto या कंपन्यांच्या निफ्टीमध्ये वाढ झाली आहे. तर  Reliance Industries, Coal India, NTPC, Power Grid Corporation आणि Grasim Industries या कंपन्याच्या निफ्टीमध्ये घसरण झाली आहे. ऑटो इंडेक्समध्ये आज चार टक्क्यांची वाढ झाली तर कॅपिटल गुड्स, बँक, आयटी, फार्मा आणि रिअॅलिटी या क्षेत्रातल्या शेअर्समध्ये एक टक्क्याची वाढ झाली. 

डॉलरच्या तुलनेत रुपया काहीसा वधारला
आज डॉलरच्या तुलनेत रुपया काहीसा वधारला असून रुपयाची आजची किंमत ही 78.31 इतकी आहे. बुधवारी रुपयाची किंमत ही 78.38 इतकी होती. 

या कंपन्यांचे शेअर्स वधारले

  • Maruti Suzuki- 6.27 टक्के
  • Hero Motocorp- 5.93 टक्के
  • Eicher Motors- 5.87 टक्के
  • M&M- 4.46 टक्के
  • Bajaj Auto- 4.10 टक्के

या कंपन्यांचे शेअर्स घसरले

  • Reliance- 1.62 टक्के
  • Coal India- 1.23 टक्के
  • Power Grid Corp- 1.00 टक्के
  • NTPC- 0.84 टक्के
  • Grasim- 0.67 टक्के

महत्त्वाच्या बातम्या

Dabur Products Ban : 'डाबर'च्या अनेक उत्पादनांवर FSSAI च्या कारवाईची टाच, 100 टक्के शुद्धतेच्या दाव्यावर आक्षेप; थेट विक्रीवर घातली बंदी, नेमकं कारण काय?
'डाबर'च्या अनेक उत्पादनांवर FSSAI च्या कारवाईची टाच, 100 टक्के शुद्धतेच्या दाव्यावर आक्षेप; थेट विक्रीवर घातली बंदी, नेमकं कारण काय?
Liquor Brands Banned Marathi News: Old Monk, RC पासून Bagpiper, McDowell's पर्यंत..., भारतात 5 मद्यांच्या ब्रँडवर बंदी, हादरवणारी 6 कारणं समोर!
Old Monk, RC पासून Bagpiper, McDowell's पर्यंत..., भारतात 5 मद्यांच्या ब्रँडवर बंदी, हादरवणारी 6 कारणं समोर!
पितांबरीने लाँच केली नैसर्गिक सुगंधाची देवभक्ती अगरबत्ती !
पितांबरीने लाँच केली नैसर्गिक सुगंधाची देवभक्ती अगरबत्ती !
प्रत्येक महाविद्यालयाच्या अभ्यासक्रमात आर्थिक साक्षरता अनिवार्य का असावी?
प्रत्येक महाविद्यालयाच्या अभ्यासक्रमात आर्थिक साक्षरता अनिवार्य का असावी?

व्हिडीओ

Congress On Sunetra Pawar : गूंगी गुडियाचा टोला, वाद विकोपाला | Special Report ABP Majha
Ketan Agarwal Case Update : सियाचं कांड, लग्नाआधीच गुप्तहेरांना डिमांड | Special Report ABP Majha
Sanjay Raut Delhi PC : बिहारमधील निकालावरून संजय राऊतांचा भाजपवर हल्लाबोल
Prashant Kishor Bankipur Bypoll Election : बांकीपूर पोटनिवडणुकीत भाजपचा पराभव अहंकारामुळे झाला
Tukaram Mundhe News: तुकाराम मुंढेंच्या FDA ला मुंबई हायकोर्टाचा दणका; नेमकं काय घडलं?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
काँग्रेसकडून गुंगी गुडिया म्हणत टीका, पृथ्वीराज चव्हाणांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, अर्थातच सुनेत्रा पवारांकडून कृतीतून उत्तर मिळेल
काँग्रेसकडून गुंगी गुडिया म्हणत टीका, पृथ्वीराज चव्हाणांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, अर्थातच सुनेत्रा पवारांकडून कृतीतून उत्तर मिळेल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 04 ऑगस्ट 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 04 ऑगस्ट 2026 | मंगळवार
अहिल्यानगरच्या शेवगावमध्ये बिबट्याची दहशत; नर-मादीसह पिल्लांचा वावर, शेतात जायचं कसं? ग्रामस्थ काळजीत
अहिल्यानगरच्या शेवगावमध्ये बिबट्याची दहशत; नर-मादीसह पिल्लांचा वावर, शेतात जायचं कसं? ग्रामस्थ काळजीत
ट्विटरवरुन पोस्ट हटवा, माफी मागा; सुनेत्रा पवारांवरील टीकेनंतर राष्ट्रवादी आक्रमक, तटकरे-पटेलांचा काँग्रेसला इशारा
ट्विटरवरुन पोस्ट हटवा, माफी मागा; सुनेत्रा पवारांवरील टीकेनंतर राष्ट्रवादी आक्रमक, तटकरे-पटेलांचा काँग्रेसला इशारा
लोकलमध्ये हरवलेली बॅग परत; पोलिसांची कामगिरी, तीन वर्षांनी तपास, प्रवाशाला मिळालं 271 ग्रॅम सोनं
लोकलमध्ये हरवलेली बॅग परत; पोलिसांची कामगिरी, तीन वर्षांनी तपास, प्रवाशाला मिळालं 271 ग्रॅम सोनं
BLOG : खड्डेमुक्त रस्त्यांची उद्दिष्टपूर्ती होत नाही तोपर्यंत वाहनांवरील दंडात्मक कारवाई ला स्थगिती द्या !
BLOG : खड्डेमुक्त रस्त्यांची उद्दिष्टपूर्ती होत नाही तोपर्यंत वाहनांवरील दंडात्मक कारवाई ला स्थगिती द्या !
तानाजी सावंत अन् मोटेंचे समर्थक भिडले; धाराशिवमध्ये महायुतीत राडा, शिवसेना-राष्ट्रवादी भिडले, 10 गाड्या फोडल्या
तानाजी सावंत अन् मोटेंचे समर्थक भिडले; धाराशिवमध्ये महायुतीत राडा, शिवसेना-राष्ट्रवादी भिडले, 10 गाड्या फोडल्या
तरणाबांड मुलगा जिवानीशी गेला, ठेकेदारावर गुन्हा दाखल करण्याची कुटुंबीयांची मागणी; पोलिसांची पीडित काकालाच धमकी
तरणाबांड मुलगा जिवानीशी गेला, ठेकेदारावर गुन्हा दाखल करण्याची कुटुंबीयांची मागणी; पोलिसांची पीडित काकालाच धमकी
Embed widget