मोठ्या अस्थिरतेनंतर शेअर बाजारात घसरण, Sensex मध्ये 48 अंकांची घट, Nifty 17,655 अंकांवर स्थिरावला
Stock Market Updates : आयटी, मेटल, एफएमसीजी, बँक आणि रिअॅलिटी या क्षेत्रातल्या शेअर्समध्ये मोठी विक्री झाल्याचं दिसून आलं आहे.
मुंबई: शेअर बाजारात (Stock Market Updates) आज मोठ्या प्रमाणात अस्थिरता दिसून आली. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्समध्ये 48 आज अंकांची घसरण झाली, तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टीमध्ये 10 अंकांची घसरण झाली. सेन्सेक्समध्ये आज 0.08 टक्क्यांची घसरण होऊन तो 59,196 अंकांवर स्थिरावला. तर निफ्टीमध्ये 0.06 टक्क्यांची घसरण होऊन तो 17,655 अंकांवर पोहोचला. बँक निफ्टीमध्येही आज 139 अंकाची घसरण होऊन तो 39,666 अंकावर स्थिरावला.
आज सकाळपासूनच शेअर बाजारात मोठी अस्थिरता दिसून आली. दुपारी दोन वाजताच्या सुमारास सेन्सेक्स 88 अंकांनी वधारला होता. तर निफ्टीमध्ये 26 अंकानी वाढ झाली होती. त्यानंतर बाजार बंद होताना शेअर बाजारामध्ये घसरण झाली.
आज शेअर बाजारात आयटी, मेटल, एफएमसीजी, बँक आणि रिअॅलिटी या क्षेत्रातल्या शेअर्समध्ये मोठी विक्री झाल्याचं दिसून आलं आहे. तर उर्जा आणि आरोग्य क्षेत्रातल्या शेअर्समध्ये खरेदी झाल्याचं दिसून आलं.
शेअर बाजारात सुरुवातीपासूनच अस्थिरता
शेअर बाजारातील व्यवहार सुरू झाला तेव्हा सेन्सेक्सने 59,566 चा टप्पा गाठला. तर, निफ्टीने 17700 अंकांचा टप्पा गाठला. सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास सेन्सेक्स निर्देशांक 12.40 अंकांनी वधारत 59,258.38 अंकांवर व्यवहार करत होता. निफ्टी निर्देशांक 4 अंकांच्या तेजीसह 17,670.55 अंकांवर व्यवहार करत होता.
सुरुवातीच्या व्यवहारात सेन्सेक्समधील 30 पैकी फक्त 3 कंपन्यांच्या शेअर दरात घसरण झाली होती. त्यानंतर निफ्टी 50 मधील एक कंपनीच्या शेअर दरात घसरण दिसून आली. बँक निफ्टीतही 164 अंकांची तेजी दिसून आली.
या कंपन्यांच्या शेअर्समध्ये वाढ झाली
- Apollo Hospital- 3.10 टक्के
- Bharti Airtel- 2.82 टक्के
- NTPC- 2.40 टक्के
- Shree Cements- 1.69 टक्के
- Tata Steel- 1.59 टक्के
या कंपन्यांच्या शेअर्समध्ये घसरण झाली
- Bajaj Finserv- 2.34 टक्के
- TATA Cons. Prod- 2.29 टक्के
- Britannia- 1.47 टक्के
- UPL- 1.17 टक्के
- Kotak Mahindra- 1.15 टक्के
महत्त्वाच्या बातम्या: