Share Market : शेअर मार्केटमध्ये मोठे चढ-उतार; मेटल, फार्मा कंपन्यांचे शेअर्स वधारले तर रिअॅलिटी आणि बँकेचे घसरले
Share Market : शेअर बाजार बंद होताना मेटल, फार्मा, उर्जा, ऑईल अॅन्ड गॅस कंपन्यांच्या शेअर्समध्ये एक ते तीन टक्क्यांची वाढ झाली आहे.
मुंबई : आज शेअर बाजारमध्ये मोठ्या प्रमाणावर अस्थिरता दिसून आली. अशातही बाजार बंद होताना सेन्सेक्स 85.26 अंकांनी तर निफ्टी 45.50 अंकांनी वधारला. सेन्सेक्समध्ये 0.14 टक्क्यांनी वाढ होऊन तो 61,235.30 वर पोहोचला आहे तर निफ्टीमध्ये 0.25 टक्क्यांची वाढ होऊन तो 18,257.30 वर पोहोचला आहे. आज 1630 कंपन्यांच्या शेअर्समध्ये वाढ झाली आहे तर 1609 शेअर्समध्ये घसरण झाली आहे. 62 कंपन्यांच्या शेअर्सच्या किंमतीत कोणताही बदल झाला नाही.
आज बाजार बंद होताना मेटल, फार्मा, उर्जा, ऑईल अॅन्ड गॅस कंपन्यांच्या शेअर्समध्ये एक ते तीन टक्क्यांची वाढ झाल्याचं दिसून आलं आहे तर रिअॅलिटी आणि बँक सेक्टरच्या शेअर्समध्ये 0.5 टक्क्यांची घसरण झाल्याचं दिसून आले आहे.
गुरुवारी शेअर बाजारात Tata Steel, JSW Steel, Sun Pharma, Coal India आणि UPL या कंपन्यांच्या निफ्टीमध्ये मोठी वाढ झाली असून Wipro, Asian Paints, HDFC Bank, Kotak Mahindra Bank आणि IndusInd Bank या कंपन्यांच्या निफ्टीमध्ये घसरण झाली आहे.
या कंपन्यांचे शेअर्स वधारले
Tata Steel- 6.45 टक्के
JSW Steel- 4.69 टक्के
Sun Pharma- 3.50 टक्के
Coal India- 3.39 टक्के
UPL- 2.26 टक्के
या कंपन्यांचे शेअर्स घसरले
Wipro- 6.02 टक्के
Asian Paints- 2.47 टक्के
HDFC Bank- 1.84 टक्के
Kotak Mahindra- 1.55 टक्के
IndusInd Bank- 1.53 टक्के