एक्स्प्लोर

Cidco Lottery 2025 : रेल्वे स्थानक, बसस्थानक जवळ असूनही सिडकोच्या घरांना नापसंती का? अपेक्षेपेक्षा कमी प्रतिसाद का? प्रमुख कारण...

Cidco Lottery 2025 : शहर व औद्योगिक विकास महामंडळ म्हणजेच सिडकोनं नवी मुंबईतील घरांच्या विक्रीसाठी माझे पसंतीचे सिडकोचे घर ही योजना आणली होती.

नवी मुंबई : शहर व औद्योगिक विकास महामंडळ अर्थात सिडकोनं नवी मुंबईतील 26500 घरांच्या विक्रीसाठी माझे पसंतीचे सिडकोचे घर ही योजना आणली होती. या योजनेसाठी बुकिंग शुल्क भरणाऱ्यांची संख्या देखील 26000 हा आकडा पार करु शकला नाही. म्हणजेच सिडकोनं जितक्या घरांच्या विक्रीसाठी मागवले तितके देखील अर्ज आले नाहीत. प्रत्यक्ष बुकिंग शुल्क भरणाऱ्या अर्जदारांची संख्या 21399 इतकी होती. 19 फेब्रुवारी 2025 ला मुंबईतील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमध्ये सोडतीचा कार्यक्रम पार पडला. यामध्ये 19518 अर्जदारांना घरं लागली. सिडकोनं उरलेल्या 1881 अर्जदारांना देखील घरं देण्याचा निर्णय घेतला. मात्र, त्यातील काही जणांनी घरं नाकारण्याची भूमिका घेतल्याचं समोर आलं होतं. सिडकोनं इतकी प्रसिद्धी करुन देखील कमी प्रतिसाद का मिळाला हे जाणून घेणं महत्त्वाचं आहे. 

सिडकोच्या घरांच्या किमती 

सिडकोनं सुरुवातीला घरांसाठी नोंदणी प्रक्रिया सुरु केली तेव्हा 236 रुपये भरुन नोंदणी करण्यास सांगितलं. सिडकोच्या घरांसाठी वेबसाईटवर नोंदणी करणाऱ्यांची संख्या दीड लाखांच्या पार गेली होती. मात्र, सिडकोनं प्रत्यक्ष घरांच्या किमती जाहीर केल्या तेव्हा 55 हजारांहून अधिक अर्जदारांनी नोंदणी शुल्क भरलं. हा टप्पा पार झाल्यानंतर बुकिंग शुल्क जमा करण्याचा पर्याय देण्यात आला. 31 जानेवारीपर्यंत बुकिंग शुल्क भरणाऱ्यांची संख्या 21399 इतकी झाली. म्हणजेच जितकी घरं विक्रीसाठी काढली त्यापेक्षा कमी अर्जदारांनी बुकिंग शुल्क भरलं. याचं प्रमुख कारण घरांच्या किमती हे आहे. सिडकोनं घरांच्या किमती जाहीर केल्यानंतर अर्जदारांनी घरांच्या किमती कमी करण्याची मागणी केली होती. मात्र, सिडकोच्या अधिकाऱ्यांनी जी किंमत निश्चित करण्यात आली होती त्याचं समर्थन करत घरांच्या किमती कमी होणार नाही असं म्हटलं होतं. त्यामुळं अर्जदारांनी सिडकोच्या घराच्या सोडतीकडे पाठ फिरवली. 

सिडकोच्या लॉटरीत किती घरांची सोडत निघाली? 

सिडकोच्या सोडतीसाठी सुरुवातीला 1 लाख 60 हजारांहून अधिक अर्जदारांनी नोंदणी केली. मात्र, किंमत आणि ठिकाण यामुळं केवळ 21399 अर्जदारांनी बुकिंग शुल्क भरलं. सिडकोनं काढलेल्या लॉटरीच्या पहिल्या राऊंडमध्ये 12420 अर्जदारांना घरं लागली. यानंतर दुसऱ्या फेरीत 613 , तिसऱ्या फेरीत 404 आणि चौथ्या फेरीत 6081 अर्जदारांना घरं लागली. 

या योजनेसाठी अर्ज मागण्याची सुरुवात पहिल्यांदा ऑक्टोबर महिन्यात झाली होती. त्यानंतर सिडकोडनं 31 जानेवारीपर्यंत मुदत वाढवण्यात आली होती. सिडकोनं ज्या प्रकारे प्रसिद्धी दिली त्या तुलनेत प्रतिसाद मिळाला नसला तरी 19518 घरांची सोडत ही आतापर्यंतची मोठी सोडत ठरली आहे. 

इतर बातम्या : 

शेअर बाजारातील घसरणीचा धसका, 61 लाख एसआयपी खाती बंद, गुंतवणूकदारांनी नेमकं काय करावं?
एबीपी माझा वेब टीममध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत | राजकारण,क्रीडा, राष्ट्रीय, आंतराराष्ट्रीय ते गाव खेड्यातल्या शेती क्षेत्रातल्या बातम्यांची आवड | यापूर्वी महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन | टीव्ही 9 मराठी डिजीटल | ईटीव्ही भारत महाराष्ट्र मध्ये काम 
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 05 जानेवारी 2026 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 05 जानेवारी 2026 | सोमवार
Pune NCP : अजितदादांच्या राष्ट्रवादीचे पुण्यातील कार्यालय बळकावलेल्या जागेवर, 300 कोटींच्या व्यवहाराशी पार्थ पवारांचा थेट संबंध; विजय कुंभार यांचा दावा
अजितदादांच्या राष्ट्रवादीचे पुण्यातील कार्यालय बळकावलेल्या जागेवर, 300 कोटींच्या व्यवहाराशी पार्थ पवारांचा थेट संबंध; विजय कुंभार यांचा दावा
शिवशाही बस अन् दुचाकीचा भीषण अपघात; तीन युवक जागीच ठार, हायवेवर मोठी गर्दी
शिवशाही बस अन् दुचाकीचा भीषण अपघात; तीन युवक जागीच ठार, हायवेवर मोठी गर्दी
माझी तब्येत ठीक, शुगर वाढली होती; नारायण राणेंनी दिली माहिती, राजकीय निवृत्तीबाबतही स्पष्टच सांगितलं
माझी तब्येत ठीक, शुगर वाढली होती; नारायण राणेंनी दिली माहिती, राजकीय निवृत्तीबाबतही स्पष्टच सांगितलं

व्हिडीओ

CM Devendra Fadnavis Parbhani : लाडक्या बहणींना लखपती बनवणार, देवाभाऊची मोठी घोषणा
Aaditya Thackeray Mumbai : आदित्य ठाकरे यांची भाजपवर सडकून टीका
Kishori Pednekar Mumbai : 'भाजप आणि सेनेने धमक्या दिल्या नाहीत आजूबाजूला चाय कम किटली गरम असता'
Amit Thackeray Solapur : अमित ठाकरेंकडून बाळासाहेब सरवदेयांच्या कुटुंबियांचं सांत्वन
Gulabrao Patil Jalgaon : मला सर्वांसोबत आय लव यू करावं लागतं गुलाबराव पाटलांची तुफान फटकेबाजी

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 05 जानेवारी 2026 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 05 जानेवारी 2026 | सोमवार
Pune NCP : अजितदादांच्या राष्ट्रवादीचे पुण्यातील कार्यालय बळकावलेल्या जागेवर, 300 कोटींच्या व्यवहाराशी पार्थ पवारांचा थेट संबंध; विजय कुंभार यांचा दावा
अजितदादांच्या राष्ट्रवादीचे पुण्यातील कार्यालय बळकावलेल्या जागेवर, 300 कोटींच्या व्यवहाराशी पार्थ पवारांचा थेट संबंध; विजय कुंभार यांचा दावा
शिवशाही बस अन् दुचाकीचा भीषण अपघात; तीन युवक जागीच ठार, हायवेवर मोठी गर्दी
शिवशाही बस अन् दुचाकीचा भीषण अपघात; तीन युवक जागीच ठार, हायवेवर मोठी गर्दी
माझी तब्येत ठीक, शुगर वाढली होती; नारायण राणेंनी दिली माहिती, राजकीय निवृत्तीबाबतही स्पष्टच सांगितलं
माझी तब्येत ठीक, शुगर वाढली होती; नारायण राणेंनी दिली माहिती, राजकीय निवृत्तीबाबतही स्पष्टच सांगितलं
Nashik Municipal Election 2026 : नाशिक महानगरपालिका: प्रभाग निहाय पक्षीय उमेदवारांची 'अशी' होणार लढत, उमेदवारांची यादी एका क्लिकवर
नाशिक महानगरपालिका: प्रभाग निहाय पक्षीय उमेदवारांची 'अशी' होणार लढत, उमेदवारांची यादी एका क्लिकवर
Tanaji Sawant : तुळजाभवानीच्या भक्तांना आता प्रसाद म्हणून ड्रग्जची पुडी दिली जाईल; तानाजी सावंत यांचा भाजपवर घणाघात
तुळजाभवानीच्या भक्तांना आता प्रसाद म्हणून ड्रग्जची पुडी दिली जाईल; तानाजी सावंत यांचा भाजपवर घणाघात
Gold Silver Price : ट्रम्प यांच्या एका कृतीनं चांदीच्या दरात 8000 रुपयांची वाढ, सोनं किती महागलं? जाणून घ्या 
ट्रम्प यांच्या एका निर्णयानं गुंतवणूकदारांची स्टॉक्स क्रिप्टोकडे पाठ, सोने चांदीचे दर किती वाढले?
Zomato Deepinder Goyal brain device: झोमॅटोच्या मालकाने डोक्यावर हायफाय टेक्नॉलॉजी असलेलं डिव्हाईस लावलं, नेमकं काय काम करतं?
झोमॅटोच्या मालकाने डोक्यावर हायफाय टेक्नॉलॉजी असलेलं डिव्हाईस लावलं, नेमकं काय काम करतं?
Embed widget