Lowest Air Fare : फक्त 100 रुपयांत करा विमान प्रवास, बाईक राईडपेक्षाही स्वस्तात फ्लाईट तिकीट
Alliance Air : वेगवेगळ्या वेबसाईटवर 100 ते 400 रुपयांपर्यंत विमानाचे तिकीट उपलब्ध आहेत. या बुकींगसाठी महिनाभर वाट पाहण्याचीही गरज नसून तुम्हाला लगेच तिकीट बूक करता येईल.
Cheapest Flight Ticket : हवाई प्रवासाचा आनंद घेण्याची अनेकांची इच्छा असते, पण विमान प्रवास सर्वांनाच परवडतो असं नाही. दरम्यान, हवाई सफर करण्याची इच्छा असणाऱ्यांसाठी चांगली बातमी आहे. आता तुम्हाला स्वस्तात विमान प्रवास उपलब्ध आहे. तुम्ही अगदी बाईक राईडपेक्षाही कमी खर्चात विमान प्रवास करु शकता. हो, आता तुम्ही फक्त 100 रुपयांमध्ये विमान प्रवास करु शकता. अलायंस एअर (Alliance Air) एअरलाईन्सकडून खास ऑफर देण्यात येत आहे. ज्यामध्ये तुम्ही अगदी 100 ते 400 रुपयांमध्ये विमान प्रवास करु शकता. विविध वेबसाईटवर या स्वस्त फ्लाईट तिकीट उपलब्ध आहेत.
लगेच विमान तिकीट बुक करा
अलायंस एअरने (Alliance Air) प्रवाशांसाठी ही भन्नाट ऑफर दिली आहे. या खास ऑफरमध्ये तुम्हाला 100 रुपयांपासून विमान तिकिटे उपलब्ध आहेत. अलायन्स एअरची स्वस्त तिकिटे वेगवेगळ्या वेबसाइटवर उपलब्ध आहेत. महत्त्वाचं म्हणजे, तुम्हाला ही स्वस्त तिकीटे बूक करण्यासाठी महिनाभर वाट पाहण्याची गरज नाही. एक-दोन दिवसांनंतरही तुम्ही विमान प्रवास करण्याचा विचार करत असाल, तर तुम्ही ही तिकीटे सहज खरेदी करु शकता. अलायंस एअरच्या शिलाँग ते गुवाहाटी या विमान प्रवासाचं तिकिट फक्त 100 रुपयांमध्ये उपलब्ध आहेत. या दोन शहरांमधील अंतर सुमारे 90 किमी आहे. या सुंदर पर्वतीय मार्गावर तुम्ही तुमच्या दुचाकीने गेलात तरी तुम्हाला 100 रुपयांपेक्षाही जास्त खर्च येईल.
400 रुपयांपर्यंत विमान तिकीट उपलब्ध
शिलाँग ते गुवाहाटी या दोन शहरांमधील अलायन्स एअरची तिकिटे यात्रेच्या वेबसाइटवर अवघ्या 400 रुपयांमध्ये उपलब्ध आहेत. पण, त्यात 300 रुपयांची सूट दिली जात असल्याने त्याची किंमत केवळ 100 रुपये आहे. हे तिकीट अलायन्स एअरच्या वेबसाइटवर 400 रुपयांना उपलब्ध आहे. हेच तिकीट Goibibo वेबसाइटवर 400 रुपयांना उपलब्ध आहे. त्याशिवाय, हेच तिकीट Happyfares वेबसाइटवर 285 रुपयांना उपलब्ध आहे.
अलायन्स एअरबाबत अधिक माहिती
अलायन्स एअर (Alliance Air) एअरलाईन्सची संपूर्ण मालकी AI असेट्स होल्डिंग लिमिटेड (AIAHL) आहे. एअर इंडिया लिमिटेडच्या निर्गुंतवणुकीनंतर भारत सरकारने याची निर्मिती केली. देशातील छोट्या शहरांना जोडण्याच्या उद्देशाने केंद्र सरकारच्या प्रादेशिक कनेक्टिव्हिटी योजनेंतर्गत याची स्थापना करण्यात आली आहे. अलायन्स एअर सुमारे 75 ठिकाणांना जोडते. अलायन्स एअर दिल्ली, मुंबई, कोलकाता, हैदराबाद आणि बेंगळुरू येथून प्रादेशिक सेवादेते. अलायन्स एअरने जाफना येथे पहिले आंतरराष्ट्रीय उड्डाण सुरू केलं आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :