एक्स्प्लोर

ELI Scheme: पहिली नोकरी लागलेल्यांना केंद्र सरकार 15000 रुपये देणार, 1 ऑगस्टपासून नवी योजना सुरु, कुणाला फायदा होणार? 

ELI Scheme: केंद्र सरकारनं एम्प्लॉयमेंट लिंक्ड इन्सेन्टिवह स्कीमला मंजुरी दिली आहे. या योजनेसाठी केंद्र सरकारनं 99446 कोटी रुपयांच्या बजेटला मंजुरी दिली आहे.  

ELI Scheme नवी दिल्ली: केंद्र सरकारनं  एम्प्लॉयमेंट लिंक्ड इन्सेन्टिवह स्कीमला 1 ऑगस्टपासून सुरु करण्यास मंजुरी दिली आहे. या योजनेनुसार पहिल्यांदा नोकरी करणाऱ्या तरुणांना केंद्र सरकारकडून प्रोत्साहन भत्ता म्हणून 15000 रुपये दिले जाणार आहेत. या योजनेचा हेतू देशात आगामी काळासाठी कौशल्यपूर्ण मनुष्यबळ तयार करणे, नोकरी निर्मितची गरज पूर्ण करणे आणि उत्पादन उद्योगाला प्रोत्साहन देणे हा आहे.  

सरकारच्या या योजनेचा कार्यकाळ 1 ऑगस्ट 2025 ते 31 जुलै 2027 असेल. या दरम्यान पहिल्यांदा नोकरी करणाऱ्यांना याचा फायदा मिळेल. 1 ऑगस्ट पूर्वी किंवा 31 जुलै 2027 नंतर पहिली नोकरी सुरु करतील त्यांना याचा लाभ मिळणार नाही. केंद्रानं 99446 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. या योजनेचा फायदा कर्मचाऱ्यांसह कंपन्यांना देखील मिळणार आहे. कंपन्यांना प्रत्येक नव्या कर्मचाऱ्यामागं दरमहा 3000 रुपये मिळतील. सरकारचा या योजनेच्या माध्यमातून अधिक लोकांना नोकरी मिळावी, असा उद्देश आहे. सरकारचा उद्देश रोजगाराच्या संधी वाढवणे असा आहे.  

पहिली नोकरी कशी ओळखणार?

या योजनेत पहिल्यांदा 1 लाख रुपयांपर्यंतच्या मासिक पगार मिळणाऱ्या कर्मचाऱ्यांना एका महिन्याच्या ईपीएफ पगारासोबत भत्ता दिला जाणार आहे. याची कमाल मर्यादा 15000 रुपये असेल. पहिल्यांदा पीएफ खातं उघडलं जाईल तेव्हा पहिली नोकरी समजली जाईल. 1 ऑगस्टपासून योजना सुरु झाल्यानंतर तुम्ही पीएफ च्या कक्षेत आल्यास तुम्ही योजनेला पात्र व्हाल. ही रक्कम दोन टप्प्यात मिळणार आहे. पहिला हप्ता सहा महिन्यानंतर आणि दुसरा हप्ता 12 महिन्यांनंतर आर्थिक साक्षरतेचा कार्यक्रम पूर्ण केल्यानंतर मिळेल. सरकार कंपनीला देखील प्रति कर्मचारी पैसे देणार आहे.  

कंपन्यांसाठी अटी

सरकार 1 लाख रुपयांपर्यंतच्या पगारापर्यंतच्या प्रत्येक नव्या कर्मचाऱ्यासाठी दरमहा 3000 रुपये देणार आहे. जर एखाद्या कर्मचाऱ्याचा पगार 10 हजार किंवा त्यापेक्षा कमी असेल तर त्याच्या प्रमाणात पैसे दिले जातील. कर्मचाऱ्याचा पगार 20 हजार ते 1 लाख रुपयांदरम्यान असेल तर प्रति कर्मचारी 3000 रुपये मिळतील.  

दरम्यान, कंपनी ईपीएफओनुसार नोंदणीकृत असली पाहिजे. कंपनीत 50 पेक्षा कमी कर्मचारी असतील तर या योजनेनुसार दोन नव्या कर्मचाऱ्यांची नियुक्ती करावी लागेल. जर कर्मचाऱ्यांची संख्या 50 पेक्षा अधिक असेल तर 5 नव्या कर्मचाऱ्यांची नियुक्ती करावी लागेल. त्यांना किमान सहा महिने त्या कंपनीत काम करावं लागेल.  

योजनेची  एक आणखी एक विशेष बाब म्हणजे यासाठी कुठं अर्ज करावा लागणार नाही. पीएफ खातं उघडल्यानंतर तुमचा डेटा सरकारकडे जाईल. सलग 6 महिने पीएफचे पैसे कपात झाल्यानंतरच तुमच्या खात्यात इन्सेन्टिव्हची रक्कम येईल.  

एबीपी माझा वेब टीममध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत | राजकारण,क्रीडा, राष्ट्रीय, आंतराराष्ट्रीय ते गाव खेड्यातल्या शेती क्षेत्रातल्या बातम्यांची आवड | यापूर्वी महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन | टीव्ही 9 मराठी डिजीटल | ईटीव्ही भारत महाराष्ट्र मध्ये काम 
Read More

महत्त्वाच्या बातम्या

Russian Crude Oil :  मध्य पूर्वेत तणाव वाढला, भारतानं घेतला मोठा निर्णय, रशियाकडून तब्बल 49 हजार कोटी रुपयांच्या तेलाची आयात 
Russian Crude Oil :  मध्य पूर्वेत तणाव वाढला, भारतानं घेतला मोठा निर्णय, रशियाकडून तब्बल 49 हजार कोटी रुपयांच्या तेलाची आयात 
बँकांचे व्यवहार करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! पुढील आठवड्यात चार दिवस बँका राहणार बंद, जाणून घ्या सविस्तर माहिती 
बँकांचे व्यवहार करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! पुढील आठवड्यात चार दिवस बँका राहणार बंद, जाणून घ्या सविस्तर माहिती 
Vidyadhar Joshi: Old Monk अचानक बाजारातून गायब, मराठी अभिनेत्यासह सोशल मीडियावर अनेकांचे सवाल, नेमकं कारण काय?
Old Monk अचानक बाजारातून गायब, मराठी अभिनेत्यासह सोशल मीडियावर अनेकांचे सवाल, नेमकं कारण काय?
Investment Plan : फक्त 15 वर्षांत गुंतवणूक करा, तब्बल 2 कोटी रुपयांचा निधी उभारा, नेमकी काय आहे योजना? 
Investment Plan : फक्त 15 वर्षांत गुंतवणूक करा, तब्बल 2 कोटी रुपयांचा निधी उभारा, नेमकी काय आहे योजना? 

व्हिडीओ

Majha Sanman Award 2026: अरुण फिरोदिया यांचा उद्योगक्षेत्रातील अतुलनीय कामगिरीबद्दल ‘माझा सन्मान’ पुरस्काराने गौरव
Majha Sanman Award 2026: भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार सुनील गावस्कर यांचा एबीपी माझा कडून सन्मान
Majha Sanman Award 2026 : नितीन गडकरी, आशा पारेख अन् जॅकी श्रॉफ; माझा सन्मानमध्ये उलगडले रंजक किस्से
Girija Raut PC : मारहाण, फसवणूक, अघोरी कृत्य ते राजकीय दबाव, विनायक राऊतांच्या सुनेचे खळबळजनक आरोप
Vinayak raut PC : मुलावर सुनेचे गंभीर आरोप, विनायक राऊत काय म्हणाले?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Friends Story : जिंकलस मित्रा! 35 वर्षांपूर्वी सौदीत घेतले होते 25 हजार रुपये, गुगलचा वापर करत घर शोधून पैसे परत, मन जिंकणारी स्टोरी
जिंकलस मित्रा! 35 वर्षांपूर्वी सौदीत घेतले होते 25 हजार रुपये, गुगलचा वापर करत घर शोधून पैसे परत, मन जिंकणारी स्टोरी
मुंबईत अवघ्या सात वर्षाच्या चिमुरडीवर सुरक्षारक्षकाचा वॉशरूममध्ये घुसून अत्याचार; मुलगी वॉशरूमला गेली असता बदमाशाचे हैवानी कृत्य, संतप्त नागरिकांचा पोलिस स्टेशनला घेराव, राहुल नार्वेकरही पोहोचले
मुंबईत अवघ्या सात वर्षाच्या चिमुरडीवर सुरक्षारक्षकाचा वॉशरूममध्ये घुसून अत्याचार; मुलगी वॉशरूमला गेली असता बदमाशाचे हैवानी कृत्य, संतप्त नागरिकांचा पोलिस स्टेशनला घेराव, राहुल नार्वेकरही पोहोचले
खरे हिंदूद्रोही, देशद्रोही भाजपवालेच, सीसीटीव्हीला धोतर लावून राम मंदिरात दानपेटीतून चोरी, सीबीआय, आयटी भाजपचे पोपट, ईडीला चंपत राय दिसत नाही, आता शेखर सुमन दिसतील; आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल
खरे हिंदूद्रोही, देशद्रोही भाजपवालेच, सीसीटीव्हीला धोतर लावून राम मंदिरात दानपेटीतून चोरी, सीबीआय, आयटी भाजपचे पोपट, ईडीला चंपत राय दिसत नाही, आता शेखर सुमन दिसतील; आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल
पहलगाममध्ये ढगफुटीने थरकाप, शेती, रस्ते वाहून गेले, उत्तराखंडमध्ये जलविद्युत प्रकल्पाजवळ भूस्खलन; देशाच्या सुमारे 70 टक्के भागातून मान्सूनचे ढग गायब
पहलगाममध्ये ढगफुटीने थरकाप, शेती, रस्ते वाहून गेले, उत्तराखंडमध्ये जलविद्युत प्रकल्पाजवळ भूस्खलन; देशाच्या सुमारे 70 टक्के भागातून मान्सूनचे ढग गायब
Dhanashree Verma: 'लग्नाच्या अवघ्या दुसऱ्याच महिन्यात...', घटस्फोटीत पत्नी धनश्री वर्माचे युझवेंद्र चहलवर गंभीर आरोप
'लग्नाच्या अवघ्या दुसऱ्याच महिन्यात...', घटस्फोटीत पत्नी धनश्री वर्माचे युझवेंद्र चहलवर गंभीर आरोप
'सध्या राम मंदिर आरएसएस-भाजपचं कार्यालय झालंय, ट्रस्ट सरकारनेच केला, SIT त्यांनीच केली, चोर पण तेच आणि पोलिस सुद्धा तेच असल्याने काय निर्णय होणार? शंकराचार्यांचा हल्लाबोल
'सध्या राम मंदिर आरएसएस-भाजपचं कार्यालय झालंय, ट्रस्ट सरकारनेच केला, SIT त्यांनीच केली, चोर पण तेच आणि पोलिस सुद्धा तेच असल्याने काय निर्णय होणार? शंकराचार्यांचा हल्लाबोल
Goa Fort Ratnagiri: संवर्धनाच्या नावावर कोट्यवधींचा खर्च, अन् एका पावसात शिवरायांच्या किल्ल्याची तटबंदी पुन्हा ढासळली, कामाच्या गुणवत्तेबाबत गंभीर प्रश्न
संवर्धनासाठी कोट्यवधींचा खर्च, अन् एका पावसात शिवरायांच्या किल्ल्याची तटबंदी पुन्हा ढासळली, कामाच्या गुणवत्तेबाबत गंभीर प्रश्न
Pune News: पुणेकरांना मोठा दिलासा! तूर्त पाणीकपात नाही, धरण साखळीत समाधानकारक साठा; पुढील आठवड्यात होणार अंतिम निर्णय
पुणेकरांना मोठा दिलासा! तूर्त पाणीकपात नाही, धरण साखळीत समाधानकारक साठा; पुढील आठवड्यात होणार अंतिम निर्णय
Embed widget