खुशखबर! कोरोना लस घेणाऱ्यांसाठी सेंट्रल बँक ऑफ इंडियाची खास योजना
सेंट्रल बॅंक ऑफ इंडिया देखील एक योजना आणली आहे. ज्या नागरिकांनी कोरोनाची लस घेतली आहेत त्यांना एफडीवर ०.25 टक्के जास्तीचे व्याज मिळणार आहे.

मुंबई : कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. देशात लसीकरणाची मोहिम देखील जोरात सुरू आहे. जास्तीत जास्त नागरिकांनी कोरोना लसीकरणात भाग घ्यावा यासाठी अनेक प्रयत्न केले जात आहेत. सेंट्रल बँक ऑफ इंडिया देखील या मोहिमेत सहभागी झाली असून लसीकरणासाला प्रोत्साहन देण्यासाठी एक योजना आणली आहे.
सेंट्रल बॅंक ऑफ इंडिया देखील एक योजना आणली आहे. ज्या नागरिकांनी कोरोनाची लस घेतली आहेत त्यांना एफडीवर ०.25 टक्के जास्तीचे व्याज मिळणार आहे. या योजनेचे नाव इम्यून इंडिया डिपॉजिट आहे.
कोणाला मिळणार योजनेचा फायदा?
बॅंकेच्या या योजनेचा लाभ ज्या नागरिकांनी कोरोना लसचा पहिलाचा डोस घेतला आहे अशा नागरिकांनादेखील मिळणार आहे. या योजनेचे वैशिष्टये असे की ज्येष्ठ नागरिकांनादेखील त्यांच्या एफडीवर मिळत असलेल्या व्याजापेक्षा 0.50 टक्के अधिक व्याजदर मिळणार आहे.
बँकने सोशल मीडियावर पोस्ट करत या योजनेची माहिती दिली आहे. या योजनेची मॅच्युरिटी मुदत 1,111 दिवसांची आहे. ही योजना मर्यादित काळासाठी असणार आहे.या योजनेंतर्गत वॅक्सीन घेणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांना 0.50 टक्के व्याज मिळणार आहे. जास्तीत जास्त नागरिकांनी कोरोना लसीकरणात भाग घ्यावा तसेच लसीकरणाला प्रोत्साहन देण्यासाठी ही योजना आणली आहे.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
