मुंबई : सरकारकडून सध्या प्राप्तिकर (आयटीआर) (ITR Filing) भरण्याचे आवाहन केले जात आहे. आयटीआर भरण्याची शेवटची तारीख 31 जुलै 2024 आहे. आतापर्यंत कोट्यवधी करदात्यांनी आपला आयटीआर भरला आहे. तर अनेक करदाते असे आहेत, ज्यांनी अद्याप आयटीआर दाखल केलेला नाही. काही करदाते तर असे आहेत, ज्यांनी गेल्या वर्षाचादेखील आयटीआर भरलेला नाही. दरम्यान, गेल्या वर्षांचा आयटीआर भरण्याची मुदत निघूल गेलली आहे. त्यामुळे करदाते मागच्या वर्षाचा आयटीआर दाखल करू शकतात का? असे विचारले जात आहे. जुना आयटीआर भरण्याची प्रक्रिया काय आहे? त्यासाठी काही दंड आकारला जातो का? हे जाणून घेऊ या...
गेल्या वर्षाचा आयटीआर भरला नसेल तर?
निश्चित तारखेला आयटीआर न भरू शकणाऱ्यांना आयकर अधिनियमाच्या कलम 234AF नुसार एक संधी दिली जाते. या कलमानुसार जी व्यक्ती निश्चित मुदतीत आपला आयटीआर दाखल करू शकलेली नाही, त्यांना पाच हजार रुपयांचा दंड भरून आयटीआर भरता येतो. ज्या लोकांचे एकूण उत्त्पन्न हे पाच लाख रुपयांपेक्षा कमी आहे, त्यांना 1000 रुपये दंड देऊन राहून गेलेल्या आर्थिक वर्षाचा आयटीआर भरता येतो. करदात्यांना गेल्या दोन वर्षांपर्यंतचा आयटीआर भरता येतो. ठरवून दिलेला दंड भरून करदाते राहिलेल्या वर्षाचा आयटीआर भरू शकतात.
आयटीआर भरण्याचा फायदा काय?
आयटीआर भरण्याचे अनेक फायदे आहेत. तुमचे प्राप्तिकर विवरणपत्र हा अधिवासाचा पुरावा म्हणून ग्राह्य धरला जातो. तुम्हाला एखाद्या ठिकाणी घर घ्यायचे असेल तर तुम्ही भरलेला आयटीआर फार महत्त्वाचा दस्तावेज ठरतो. सीबील स्कोअर आणि आयटीआर याचा अभ्यास करूनच तुम्हाला कर्ज मंजूर करायचे की नाही, याचा विचार बँक करते.
लोन देण्याआधी बँक तुमच्या आयटीआर माहिती काढते, चौकशी करते. अगोदरच आयटीआर भरलेला असेल तर तुम्हाला कर्ज मिळणे अधिक सोपे होऊन जाते. व्यापारात नुकसान झाल्यानंतरही तुम्हाला आयटीआर भरावा लागतो. कारण अशा स्थितीत आयटीआरच्या माध्यमातूनच मला तोटा झाला आहे, असे तुम्ही सरकारला सांगू शकतो. जेव्हा तुमचे उत्पन्न घटते तेव्हा तर आयटीआरची गरज अधिक असते.
हेही वाचा :
घरासाठी कर्ज घेण्याचा विचार करताय? 'या' बँकांचा आहे सर्वांत कमी व्याजदर!
शेतकऱ्यांनो 'या' तीन योजनांचा घ्या फायदा, आर्थिक अडचण हमखास होईल दूर!
1 मे पासून ICICI बँकेचे नियम बदणार, 'या' सेवांसाठी द्यावे लागणार पैसे!