पुणे : बारामती लोकसभा मतदार संघाच्या महाविकास (Baramati Loksabhe election) आघाडीच्या उमेदवार सुप्रिया सुळे (Supriya Sule) आणि उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar)यांच्यात आरोप प्रत्यारोप सुरुच असल्याचं दिसत आहे. कधी पाणी प्रश्नावरुन तर कधी बारामातीच्या विकासावरुन निशाणा साधताना दिसत आहे. त्यातच मी केलेले विकास काम सुप्रिया सुळेंनी आपल्या प्रचार पत्रात छापला. मी केलेल्या विकास कामांचं श्रेय सुप्रिया सुळे घेत असल्याचा घणाघात अजित पवारांनी सुप्रिया सुळेवर केला. त्यावर आता सुप्रिया सुळेंनी  पलटवार केला आहे. अजित पवारांनी माझा प्रचार अहवाल पूर्ण वाचला नसेल आणि आम्ही टीम वर्क केलं आहे. त्यात सगळ्यांचा सहभाग आहे, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या आहेत. 


सुप्रिया सुळे म्हणाल्या की, आम्ही सगळे एकत्र काम करत होतो. एकाच पक्षात होतो. 17 वर्ष आम्ही एकत्र काम केलं होतं. आतापर्यंत झालेले विकास कामं म्हणजे टीम वर्क आहे. अजित पवारांनी माझ्यावर टीका केली. पण दादा माझ्या पेक्षा पदाने, वयाने, नात्याने खूप मोठे आहेत आपण मोठ्यांना आदर सन्मान द्यायचा असतो ते मी देते. दादांनी MIDC आणण्याचं आश्वासन दिलं आहे. आज सगळीकडे MIDC आहे. तशी माझ्याही मतदारसंघात यावी, यासाठी आम्ही सगळेच प्रयत्न करत आहोत. यामुळे तरुणांना नोकऱ्या मिळतील, बेरोजगारी कमी होईल. 


महायुतीचा मुंबई उत्तर मध्य मतदारसंघात भाजपनं विद्यमान खासदार पूनम महाजन याचं तिकीट कापलं आहे. पूनम महाजन यांच्याऐवजी भाजपनं उज्जल निकम यांना उमेदवारी दिली आहे, यावर बोलताना सुप्रिया सुळे म्हणाल्या की, पूनमने अनेक वर्षे चांगलं काम केलं आहे. प्रमोद महाजन हे खूप मोठं नाव भाजपमध्येच नाही तर  देशाच्या राजकारणात होतं. पूनमने युवा मोर्चाच काम केलं आहे.  तिकीट का कापलं मला माहिती नाही. पण माझ्यासाठी पुनमचं तिकीट कापणं  आश्चर्यकारक असल्याचं त्या म्हणाल्या. दुष्काळ ,महागाई बेरोजगारी ही आव्हानं समोर आहेत. माझ्यासाठी देश आधी नंतर राज्य आणि मतदार संघ मला काम करायचं आहे. या सगळ्या प्रश्नांवरुन लक्ष भरकटवण्यासाठी सध्या माझ्यावर टीका केली जात असल्याचं सुप्रिया सुळे म्हणाल्या. 


इतर महत्वाची बातमी-


Eknath Shinde: मोदींच्या सभेनंतर एकनाथ शिंदे कोल्हापूरमध्येच थांबले, समरजितसिंह घाटगेंसोबत बंद खोलीत चर्चा, कागलमधून रेकॉर्डब्रेक मताधिक्याची हमी


Madha Lok Sabha: माढा जिंकण्यासाठी आता PM मोदी मैदानात, मोहिते-पाटलांच्या बालेकिल्ल्यात 28 एकरावर जंगी सभा, वारं फिरणार?