मुंबई : आयसीआयसीआय (ICICI) बँकेने आपल्या अनेक नियमांत बदल केला आहे. ग्राहकांना द्यावयाच्या अनेक सेवांच्या फी मध्येही बँकेने बदल केला आहे. हे नवे नियम येत्या एक मे रोजीपासून लागू होणार आहे. एटीएमचा उपयोग, डेबीट कार्ड, चेक बुक, आयपएमपीएस, स्पॉट पेमेंट अशा अनेक नियमांत आयसीआयसीआयने बदल केला आहे. हे बदल खालीलप्रमाणे आहेत.
1 मे पासून बदलणार हे नियम
ग्रामीण भागात राहणाऱ्या ग्राहकांना डेबिट कार्डवर 99 (वार्षिक फी) तर शहरी भागात राहणाऱ्या ग्राहकांकडून 200 रुपये द्यावे लागणार आहेत.
आयसीआयसीआय बँक पहिल्या 25 चेकवर कोणतीही फी आकारणार नाही. त्यानंतर चेक हवे असतील तर ग्राहकांना प्रतिपेज 4 रुपये मोजावे लागतील.
एखाद्या विशेष चेकसाठी 100 रुपये फी आकारली जाईल.
तुम्हाला तुमच्या पासबुकची नक्कल प्रत हवी असेल तर 100 रुपये जमा करावी लागतील. तर याच पासबुकवर अपडेट घ्यायच्या असतील तर प्रतिपेज 25 रुपये आकारले जातील.
तुमचे डेबिट किंवा क्रेटिड कार्ड हरवले असेल तर नवे कार्ड घेण्यासाठी तुम्हाला 200 रुपये मोजावे लागतील.
बचत खात्यावरील हस्ताक्षर व्हेरिफिकेशनसाठी आयसीआयसीआय बँक 100 रुपयांची फी आकारू शकते.
सुट्टीच्या दिवशी किंवा संध्याकाळी सहा वाजेनंतर कॅश डिपॉझिट मशिनमध्ये जमा केलेल्या रकमेच्या प्रत्येक ट्रान्झिशनवर 50 रुपये फी आकारणार आहे.
बँकेचे खाते बंद करण्यासाठी ग्राहकांना आता कोणतीही अतिरिक्त फी द्यावी लागणार नाही.
बॅलेन्स सर्टिफिकेट, इंटरेस्ट सर्टिफिकेट मिळवायचे असेल तर त्याला कोणतेही अतिरिक्त पैसे द्यावे लागणार नाही.
अॅड्रेस व्हेरिफिकेशनसाठीदेखील पैसे देण्याची गरज नाही.
पत्ता बदलण्यासाठी अतिरिक्त फी देण्याची गरज नाही.
हेही वाचा :
डी-मॅट अकाऊंटवर आकारले जातात 'हे' चार्जेस, नीट समजून घ्या अन्यथा खिसा होईल खाली!
चमकीलाला प्रसिद्धी देणारी रेकॉर्डिंग कंपनी सध्या काय करते? कोट्यवधी रुपये कसे कमवते?
पगार तब्बल 24 कोटी! कोण आहेत निखील मेसवानी जे मुकेश अंबानींचे आहेत खास!