घरासाठी कर्ज घेण्याचा विचार करताय? 'या' बँकांचा आहे सर्वांत कमी व्याजदर!

गृहकर्जासाठी सर्वांत कमी व्यजदर घेणाऱ्या बँकेचा आपण शोध घेतो. सध्या या पाच बँका गृहकर्जावर सर्वांत कमी व्याज घेत आहेत.

banks for home loan (सांकेतिक फोटो)

1/5
घर बांधण्यासाठी आपण बँकांकडून कर्ज घेतो. कमी व्याजदर असणाऱ्या बँकेचा आपण शोध घेतो. याच पार्श्वभूमीवर कमी व्याजदराने गृहकर्ज देणाऱ्या पाच बँकांची माहिती जाणून घेऊ या. एचडीएफसी बँक ही खासगी क्षेत्रातील सर्वांत मोठी बँक आहे. ही बँक सध्या गृहकर्जावर 9.4 ते 9.95 टक्के प्रतिवर्ष या दराने व्याज देते.
2/5
भारतीय स्टेट बँकदेखील गृहकर्ज देण्यासाठी सीबील स्कोअरच्या आधारावर 9.15 ते 9.75 टक्क्यांपर्यंत व्याज घेते. हा नवा दर एक मे 2023 रोजी लागू झालेला आहे.
3/5
आयसीआयसीआय बँक घर बांधण्यासाठी 9.40 टक्के ते 10.05 टक्के दराने व्याज घेते.
4/5
कोटक महिंद्र ही बँकदेखील पगारदार व्यक्तीला 8.टक्के दराने तर उद्योग असणाऱ्या व्यक्तीला 8.75 टक्के दराने गृहकर्ज देते.
5/5
पीएनबी ही बँक सीबील स्कोअर, घ्यावयाचे कर्ज, कर्जफेडीचा कालावधी या बाबी लक्षात घेऊन गृहकर्जावर 9.4 ते 11.6 टक्के व्याज घेते.
Sponsored Links by Taboola