सांगली : ओबीसी बहुजन पार्टीचे सांगली लोकसभा उमेदवार प्रकाश अण्णा शेंडगे यांच्या गाडीला अज्ञातांकडून चप्पलचा हार घालण्यात आला. तसेच गाडीवर शाई सुद्धा फेकण्यात आली. गाडीच्या बोनेटवर काळी शाई फेकण्यात आली. पुढे चप्पलचा हार घालण्यात आला. प्रकाश शेंडगे हे स्वतः सांगली लोकसभा उमेदवार आहेत. 


हॉटेल समोर त्यांची गाडी उभी असताना रात्री अज्ञातांकडून हा प्रकार करण्यात आला. गाडीच्या काचेवर धमकीवजा इशारा देण्यात आला होता. प्रकाश शेंडगे तुला मराठा समाज पाडल्याशिवाय गप्प बसणार नाही, भुजबळाने जशी नाशिकमध्ये माघार घेतली तशी तू घे वेड्या. धनगर आणि मराठ्यांच्या नादी लागू नका, नाहीतर तुला महाराष्ट्रात फिरू देणार नाही. मराठ्याला विरोध केला तर पुढीलवेळी चपलेला हार गळ्यात घालू. एक मराठा लाख मराठा असे पत्रक काचेवर चिकटवलं  आहे. 


 इतर महत्वाच्या बातम्या