Budget 2020 : बजेटमध्ये फिनटेक आणि डिजिटलायझेशनवर स्पष्ट भर देण्यात आला आहे. डिजिटलायझेशन, फिनटेक आणि व्यवहार खर्च कमी करण्यावर स्पष्ट भर आहे. एटीएम, नेटबँकिंग, पेमेंट अॅप्सद्वारे टपाल बचत इंटरऑपरेबल करून ज्येष्ठ नागरिक आणि ग्रामीण लोकांची सोय केली जाईल. RuPay आणि UPI द्वारे MDR फी मध्ये सबसिडी देण्याचा निर्णय एक सकारात्मक पाऊल आहे.


पोस्ट ऑफिसमध्येही आता ऑनलाइन हस्तांतरण शक्य 
"पोस्ट ऑफिसमध्येही ऑनलाइन हस्तांतरण शक्य होणार असून पोस्ट ऑफिस कोअर बँकिंग सेवेअंतर्गत येणार आहे. 75 जिल्ह्यांमध्ये डिजिटल बँकिंग सुरू करण्यात येणार आहे. 2022 पासून पोस्ट ऑफिसमध्ये डिजिटल बँकिंगवर काम केले जाईल. पोस्ट ऑफिसमध्ये एटीएम सुविधा उपलब्ध होणार आहे.", अशी माहिती अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी दिली. 


यावर्षीपासून ई-पासपोर्ट : अर्थमंत्री 
Union Budget 2022 LIVE : यंदाच्या वर्षापासून देशात ई-पासपोर्ट उपलब्ध होतील आणि त्यात चिप्स असतील, अशी घोषणा अर्थमंत्र्यांनी केली आहे. पासपोर्ट सेवा केंद्रे ई-पासपोर्टसाठी अपग्रेड केली जातील आणि नवीन तंत्रज्ञानावर आधारित पासपोर्ट सेवा प्रदान करण्यासाठी वाटप केलं जाईल.


जागांचं रजिस्ट्रेशन कुठूनही करता येईल यासाठी प्रयत्न
जमिनीची कागदपत्रं डिजिटल स्वरुपात उपलब्ध करुन दिले जातील. तसंच जागांचं रजिस्ट्रेशन कागदपत्रांच्या आधारे कार्यालयात न जाता कुठूनही करता येईल यासाठी प्रयत्न सुरु असल्याचं अर्थमंत्र्यांनी सांगितलं आहे.


किसान ड्रोन्सचा वापर शेतीमध्ये केला जाणार
किसान ड्रोन्सचा वापर आता शेतीमध्ये केला जाणार असल्याची घोषणा अर्थमंत्र्यांनी अर्थसंकल्प सादर करताना केली. हे कृषी ड्रोन्स पिकांची पहाणी करणे, जमीनीच्या नोंदी ठेवणे तसेच किटकनाशकांच्या फवारणीसाठी वापरले जाणारे आहेत. कृषी आणि पिक उत्पादनासाठी तंत्रज्ञानाचा जास्तीत जास्त वापर करण्यात येणार आहे.


आरबीआयचं डिजिटल चलन येणार
केंद्र सरकारने अर्थसंकल्पामध्ये डिजिटल करन्सीसंदर्भात मोठी घोषणा केली आहे. यंदाच्या आर्थिक वर्षापासून केंद्रीय बँकेच्या माध्यमातून भारत स्वत:ची डिजिटल करन्सी जारी करणार आहे.सीतारामन यांनी अर्थसंकल्प सादर करताना आज डिजिटल रुपीची घोषणा केली. हे चलन रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या माध्यमातून जारी केलं जाणार आहे. डिजीटल रुपीच्या माध्यमातून कमी खर्चामध्ये आणि अधिक सक्षमपणे चलन नियंत्रण करता येईल असा विश्वास अर्थमंत्र्यांनी व्यक्त केलाय.


2022 मध्ये देशात 5G सर्व्हिस सुरु होणार : अर्थमंत्री 
2022 मध्ये 5G सेवा सुरू केली जाईल आणि गावांमध्ये ब्रॉडबँड सेवा देण्यासाठी पायाभूत सुविधा विकसित केल्या जातील. दूरसंचार क्षेत्रात नोकरीच्या नवीन संधी शोधल्या जातील, असं अर्थमंत्र्यांनी सांगितलं.  


बजेटमधील आतापर्यंतचे महत्त्वाचे मुद्दे 


आत्मनिर्भर भारत योजनेमुळे 16 लाख रोजगाराच्या संधी
तर मेक इन इंडिया अंतर्गत 60 लाख रोजगार उपलब्ध
पुढील आर्थिक वर्षात 9.2% विकास दर अपेक्षित आहे 
ऊर्जा, वाहतूक, विपणन यावर भर दिला जाईल
पुढील आर्थिक वर्षात 25 हजार किमी राष्ट्रीय महामार्ग बनवणार
येत्या 3 वर्षात 400 नव्या वंदे भारत ट्रेन धावणार 
गतीशक्ती मास्टर प्लॅनद्वारे पायाभूत सुविधांना  प्रोत्साहन देणार
शहरी वाहतूक रेल्वे मार्गाशी जोडणार


संबंधित बातम्या


Union Budget 2022: '60 लाख नवे रोजगार निर्माण करणार', अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांच्याकडून अर्थसंकल्प सादर


Budget 2022: अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांच्या भाषणातील आतापर्यंतचे प्रमुख मुद्दे


Education Sector Budget 2022 : शालेय विद्यार्थ्यांसाठी नवीन 100 चॅनेलची घोषणा, मातृभाषेत शिक्षण मिळणार


Nirmal Sitharaman LIVE : सिंचन-पिण्याचे पाणी वाढवण्यावर भर देणार, देशातील 5 मोठ्या नद्या जोडण्याचे काम करणार : अर्थमंत्री


Budget 2022: रेल्वे प्रवास सुस्साट होणार! तीन वर्षात 400 'वंदे भारत' ट्रेन धावणार; निर्मला सीतारमण यांची घोषणा


Budget 2022 Housing: घरांसाठी 48 हजार कोटींचे पॅकेज, 2023 पर्यंत 80 लाख नवी घरं बांधणार