Budget 2022 : आज केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी संसदेत अर्थसंकल्प सादर केला. यात त्यांनी अनेक महत्वाच्या घोषणा केल्या आहेत. यात महत्वाचं म्हणजे शालेय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी 200 चॅनेल्सची घोषणा केली आहे. या चॅनेल्सच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना त्यांच्या भाषेत शिक्षण मिळणार आहे. कोरोनाकाळात अनेक विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहिले आहेत. त्यांच्यासाठी ही दिलासादायक बातमी आहे. विद्यार्थ्यांना ई लर्निंगसाठी टीव्ही, रेडियो आणि डिजिटल मीडियाचा वापर केला जाणार आहे, असं देखील अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी म्हटलं आहे. PM E Vidya अंतर्गत वन क्लास-वन चॅनेल उपक्रम राबवला जाणार आहे.  


अर्थमंत्री शिक्षण क्षेत्राबाबत बोलताना म्हणाल्या की, "शिक्षण क्षेत्राबाबत बोलायचे झाले तर डिजिटल विद्यापीठांची निर्मिती करण्यात येणार असून शाळांमधील प्रत्येक वर्गात टीव्ही लावण्यात येणार आहे. स्किल इंडिया मिशनच्या माध्यमातून आणि सरकारी योजनांतर्गत कुशल कामगार तयार करण्यासाठी युवाशक्ती बनविण्याचे काम केलं जाईल. लोकांच्या उदरनिर्वाहाचे साधन वाढवण्यासाठी सरकारी प्रकल्पांची संख्या वाढवण्यात येणार आहे"


अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी म्हटलं की, भारतीय अर्थव्यवस्था ग्लोबल स्तरावर परेशानीचा सामना करत आहे मात्र या परिस्थितीत देखील भारतानं कोरोनो महामारीशी चांगला मुकाबला केला आहे.  अर्थसंकल्प सादर करताना सीतारमण यांनी सांगितलं की, भारत जगातील सर्वात वेगाने वाढत असलेल्या एका अर्थव्यवस्थेपैकी एक आहे. या वर्षीच्या बजेटमध्ये पुढील 25 वर्षाची ब्ल्यू प्रिंट असेल. देशात आर्थिक रिकव्हरीला बळकट करण्यावर फोकस केला जाणार आहे, असंही त्यांनी म्हटलं.  


या अर्थसंकल्पातून भारताला पुढील 25 वर्षांचा पाया मिळेल, असे अर्थमंत्री सीतारमण म्हणाल्या. पुढील आर्थिक वर्षात विकास दर 9.2% राहण्याची अपेक्षा आहे. देशाची अर्थव्यवस्था हळूहळू सावरतेय.  आत्मनिर्भर भारताला प्रोत्साहन देत 60 लाख नवे रोजगार निर्माण करणार आहोत, असं त्या म्हणाल्या. 30 लाख अतिरिक्त नोकऱ्या देण्याची क्षमता आहे. सर्वसमावेशक विकास हेच सरकारचं ध्येय असेल, असं त्यांनी म्हटलं. 


या बजेटमध्ये पुढच्या 25 वर्षांची ब्लू प्रिंट असणार आहे असं निर्मला सीतारमण यांनी सांगितलं. एलआयसीचा आयपीओ लवकरच बाजारात आणणार आहोत. पायाभूत सुविधांसाठी 20 हजार कोटी रुपये देणार आहोत, असं त्यांनी म्हटलं.


बजेटमधील आतापर्यंतचे महत्त्वाचे मुद्दे 


आत्मनिर्भर भारत योजनेमुळे 16 लाख रोजगाराच्या संधी
तर मेक इन इंडिया अंतर्गत 60 लाख रोजगार उपलब्ध
पुढील आर्थिक वर्षात 9.2% विकास दर अपेक्षित आहे 
ऊर्जा, वाहतूक, विपणन यावर भर दिला जाईल
पुढील आर्थिक वर्षात 25 हजार किमी राष्ट्रीय महामार्ग बनवणार
येत्या 3 वर्षात 400 नव्या वंदे भारत ट्रेन धावणार 
गतीशक्ती मास्टर प्लॅनद्वारे पायाभूत सुविधांना  प्रोत्साहन देणार
शहरी वाहतूक रेल्वे मार्गाशी जोडणार


महत्त्वाच्या इतर बातम्या :



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह | ABP Majha



Education Loan Information:

Calculate Education Loan EMI