Budget 2022 Key Points :  केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण लोकसभेत अर्थसंकल्प सादर करत आहेत. त्यांनी आपल्या अर्थसंकल्पीय भाषणात भविष्यातील भारताच्या दृष्टीने अर्थसंकल्प असल्याचे म्हटले. त्यांच्या भाषणातील आतापर्यंतचे महत्त्वाचे 10 मुद्दे 


अर्थसंकल्पीय भाषणातील प्रमुख मुद्दे 


 



  • मोठी बातमी: इनकम टॅक्स स्लॅबमध्ये कोणताही बदल नाही

  • आयकर रिटर्न फाईल करताना चूक झाल्यास दिलासा

  • करचुकवेगिरी प्रकरणात छापा मारल्यास सर्व संपत्ती जप्त

  • क्रिप्टो करन्सीच्या (virtual digital assets) व्यवहारातून मिळवलेल्या उत्पन्नावर 30 टक्के कर

  • ITR मधील चूक सुधारण्यासाठी 2 वर्षांचा कालावधी 

  • कॉर्पोरेट टॅक्स 18 टक्क्यांवरून 15 टक्के करण्याची घोषणा

  • डिजीटल रुपींची घोषणा, रिझर्व्ह बँकेकडून आगामी वर्षात डिजीटल रुपी सुरू होणार 

  • राज्यांच्या अर्थव्यवस्थेसाठी १ लाख कोटींची तरतूद 

  • इलेक्ट्रीक वाहनांसाठी  बॅटरी अदलाबदली (Battery swapping policy)धोरण लागू करणार, मोठ्या प्रमाणावर चार्जिंग स्टेशन नसल्याने वाहन चालकांची होणारी गैरसोय दूर होणार

  • सौर ऊर्जा निर्मितीसाठी १९,५०० कोटी

  • ई-पासपोर्ट 2022-2023 पासून लागू केले जातील

  • पोस्ट ऑफिसमध्ये एटीएम सुविधा उपलब्ध होणार

  • 2022 मध्ये 5G सेवा सुरू होईल

  • पोस्ट ऑफिसमध्येही आता ऑनलाइन ट्रान्सफर करता येणार

  • शेतकऱ्यांना डिजिटल सेवा दिली जाईल, शेतकऱ्यांकडून विक्रमी खरेदी केली जाईल

  • नाबार्डच्या माध्यमातून स्टार्टअपना मदत करणार

  • जलसिंचन योजनेच्या माध्यमातून 9 लाख हेक्टर जमीन पाण्याखाली येणार

  • पंतप्रधान आवास योजनेसाठी 48 हजार कोटींची नव्याने तरतूद

  • शालेय शिक्षणासाठी 100 टीव्ही चॅनेलची घोषणा, स्थानिक भाषेतून शिक्षण देणार

  • लघु आणि सुक्ष्म उद्योगांना दोन लाख कोटींचे अर्थसहाय्य

  • तेलबिया निर्मितीला प्राधान्य देणार, पिकांवर लक्ष ठेवण्यासाठी ड्रोनचा वापर करणार

  • हा अर्थसंकल्प 2047 पर्यंतचा हा ब्लूप्रिंट

  • पुढील आर्थिक वर्षात 9.2% विकास दर अपेक्षित आहे

  • ऊर्जा, वाहतूक, विपणन यावर भर दिला जाईल

  • विविध शहरांची गरज ओळखून मेट्रोचे जाळं उभारणार 

  • 'पंतप्रधान गती योजने'तंर्गत पायाभूत सुविधा उभारणार, पायाभूत सुविधांसाठी 20 हजार कोटींचा निधी

  • आत्मनिर्भर भारताला प्रोत्साहन देत 60 लाख नवे रोजगार निर्माण करणार

  • 2023 पर्यंत  25 हजार किमीचा महामार्ग उभारणार 

  • एलआयसीचा आयपीओ लवकरच बाजारात आणणार

  •