Union Budget, Economic Survey 2022 LIVE Updates : आजपासून संसदेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन; पाहा प्रत्येक अपडेट एका क्लिकवर...

Economic Survey 2022 LIVE Updates : आजपासून संसदेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होणार आहे. महागाईने त्रस्त नागरिकांना दिलासा देणारा यंदाचा अर्थसंकल्प असणार का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

abp majha web team Last Updated: 31 Jan 2022 11:10 AM
अर्थसंकल्पाआधी देशाचं आर्थिक सर्व्हेक्षण लोकसभेत सादर

LIVE : अर्थसंकल्पाआधी देशाचं आर्थिक सर्व्हेक्षण लोकसभेत सादर; नव्या आर्थिक वर्षात जीडीपी 8 ते 8.5 टक्के राहण्याचा अंदाज, कृषी क्षेत्रात ३.९ टक्के,तर उद्योग क्षेत्रात ११.८ टक्क्यांची वाढ

आर्थिक सर्वेक्षण अहवाल: पुढील आर्थिक वर्षात भारताचा जीडीपी 8-8.5% टक्के राहण्याचा अंदाज

पुढील आर्थिक वर्षात भारताचा विकास दर (जीडीपी) 8-8.5% टक्के राहण्याचा अंदाज आर्थिक सर्वेक्षण अहवालात व्यक्त करण्यात आला आहे. 

अर्थसंकल्प 2022 : लोकसभेत आर्थिक सर्वेक्षण अहवाल सादर

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी आर्थिक अहवाल लोकसभेतील पटलावर ठेवला.

President Ram Nath Kovind : आज देशात 90 टक्क्यांहून अधिक ज्येष्ठ नागरिकांचा लसीचा एक डोस झालाय

GDP म्हणजे काय रे भाऊ?

What is GDP : जीडीपी म्हणजे काय रे भाऊ? हा प्रश्न आताच विचारायचं कारण म्हणजे अर्थसंकल्प आणि दर तीन महिन्यांनी सतत कानावर पडणारी ही अक्षरं जीडीपी. याच जीडीपीनुसार कोणताही देश श्रीमंत असो किंवा गरीब असो, त्याची आर्थिक स्थिती आपल्याला जाणून घ्यायला मदत होते. अशा स्थितीत हे जाणून घेणे फार महत्त्वाचे ठरते की, जीडीपी म्हणजे काय? आणि त्याची गणना कशी केली जाते


जीडीपीचा इतिहास


जीडीपी हा शब्द पहिल्यांदा अमेरिकन अर्थशास्त्रज्ञ सायमन यांनी 1935-44 मध्ये वापरला होता. सायमनने अमेरिकेला ही संज्ञा दिली होती. हा तो काळ होता जेव्हा जगातील बँकिंग संस्था आर्थिक विकासाचा अंदाज बांधण्याचे काम हाताळत होत्या, त्यापैकी बहुतेकांना त्यासाठी शब्द सापडत नव्हता. जेव्हा सायमनने यूएस काँग्रेसमध्ये जीडीपी या शब्दाची व्याख्या या शब्दासह केली तेव्हा IMF म्हणजेच आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने हा शब्द वापरण्यास सुरुवात केली.


सविस्तर वाचण्यासाठी येथे क्लिक करा 

निवडणुका होत राहतील, पण Budget session महत्त्वाचं, मुक्त चर्चा व्हावी : मोदी

ग्रामीण अर्थव्यवस्थेला गती देण्यात महिलांची भूमिका अत्यंत महत्त्वाची : राष्ट्रपती



राष्ट्रपतींच्या भाषणातील महत्वाचे मुद्दे





सशक्त भारत तयार करण्यामध्ये केंद्राचं महत्वाचं योगदान : राष्ट्रपतींकडून केंद्र सरकारचं कौतुक

https://marathi.abplive.com/business/budget/praise-of-central-government-by-president-ramnath-kovind-in-his-speech-at-the-budget-session-1029541

सशक्त भारत तयार करण्यामध्ये केंद्राचं महत्वाचं योगदान- राष्ट्रपती रामनाथ कोविंद

नवी दिल्ली : आजपासून संसदेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होत आहे. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या अभिभाषणानं या अधिवेशनाची सुरूवात झाली. यावेळी बोलताना राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी केंद्र सरकारचं कौतुक केलं. "देशात आज 90 टक्क्यांपेक्षा जास्त लोकांचा कोरोना लसीचा एक डोस पूर्ण झाला आहे तर 70 टक्के लोकांचे दोन्ही डोस पूर्ण झाले आहेत.  लसीकरणात देश जगात अव्वल आहे. 'सबका साथ, सबका विकास' हा सरकारचा मंत्र असून सशक्त भारत तयार करण्यामध्ये केंद्राचं महत्वाचं योगदान आहे, असे मत रामनाथ कोविंद यांनी व्यक्त केले.

सर्व राजकीय पक्षातील सदस्य खुल्या मनानं उत्तम चर्चा करुन देशाला पुढं नेण्यासाठी नक्कीच मदत- पंतप्रधान मोदी

पंतप्रधान मोदी म्हणाले की, सर्व राजकीय पक्षातील सदस्य खुल्या मनानं उत्तम चर्चा करुन देशाला पुढं नेण्यासाठी नक्कीच मदत करतील. ही गोष्ट खरी आहे की वारंवार निवडणुकांमुळं अधिवेशनं प्रभावित होतात. मात्र मी सर्व सदस्यांना विनंती करतो की निवडणुका आपल्या जागी त्या चालत राहतील मात्र आपण अधिवेशनात फलदायी चर्चा करावी. 

आज वैश्विक स्तरावर भारतासाठी खूप संधी - पंतप्रधान मोदी

Budget Session 2022 PM Narendra Modi LIVE : आजपासून संसदेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु झालं आहे. अशातच विरोधकांनी मोदी सरकारला घेरण्याची तयारी केली आहे. दुसरीकडे पंतप्रधान मोदींनी अधिवेशनात सर्वांनी चर्चा करावी आणि देशाला प्रगतीच्या दिशेने नेण्यासाठी उत्तम चर्चा व्हावी असं आवाहन केलं आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशन आजपासून सुरु होत आहे. मी या अधिवेशनात सर्वांचं स्वागत करतो. आज वैश्विक स्तरावर भारतासाठी खूप संधी आहेत.  देशाची आर्थिक प्रगती, लसीकरण कार्यक्रम, मेड इन इंडिया वॅक्सिनबाबत जगात एक विश्वास तयार झाला आहे. या अधिवेशनातही यावर मुक्त चर्चा होईल जेणेकरुन जगभरात एक विश्वास तयार होईल अशी चर्चा व्हावी, असं मोदी म्हणाले.  

Budget 5 State Election : पाच राज्यांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बजेटमध्ये काय आश्वासनं?

Economic Survey 2022 LIVE Updates: यंदा एकाच खंडात सादर होणार आर्थिक सर्वेक्षण?

आर्थिक सर्वेक्षणात धोरणात्मक विचार, आर्थिक मापदंडांचे प्रमुख आकडे, व्यापक आर्थिक संशोधन आणि क्षेत्रनिहाय आर्थिक कल यांचे विश्लेषण करण्यात येते. वर्ष 2015 नंतर आर्थिक सर्वेक्षण दोन भागात विभागण्यात येत आहे. सर्वेक्षणाच्या पहिल्या भागात अर्थव्यवस्थेच्या स्थितीबाबत माहिती दिली जाते. हा भाग अर्थसंकल्पाआधी सादर केला जातो. सर्वेक्षणाच्या दुसऱ्या भागात महत्त्वाची आकडेवारी आणि पुढील आर्थिक वाटचालीबाबत अंदाज व्यक्त करण्यात येतो. मात्र, यंदा अर्थ मंत्रालय 2021-22 साठीचे आर्थिक सर्वेक्षण एकाच भागात प्रसिद्ध करू शकतात. 





 


आर्थिक सर्वेक्षण अहवाल कोण तयार करतं?

आर्थिक सर्वेक्षण अहवाल हा मुख्य आर्थिक सल्लागार (CEA) यांच्या नेतृत्वातील एक टीम तयार करते. यामध्ये CEA यांच्यासोबत आर्थिक बाबींच्या तज्ज्ञांचा समावेश असतो. केंद्र सरकारने अर्थ तज्ज्ञ व्ही. अनंत नागेश्वरन यांची नुकतीच मुख्य आर्थिक सल्लागार म्हणून नियुक्ती केली. त्यांच्या आधी के. व्ही. सुब्रम्हण्यम हे मुख्य आर्थिक सल्लागार होते. त्यांचा कार्यकाळ डिसेंबर 2021 मध्ये पूर्ण झाला. 

आर्थिक सर्वेक्षण म्हणजे काय?

आर्थिक सर्वेक्षण म्हणजे देशाच्या अर्थव्यवस्थेचा लेखा-जोखा असतो. या आर्थिक सर्वेक्षणाच्या दस्ताऐवजातून सरकार देशाची आर्थिक स्थिती कशी आहे, याची माहिती देते. सरकारच्या योजनांची अंमलबजावणी कशा प्रकारे सुरू आहे. संपूर्ण आर्थिक वर्षात विकासाची काय दिशा राहिली. कोणत्या क्षेत्रात किती गुंतवणूक झाली आदींबाबत माहिती असते. अर्थसंकल्पाआधी सादर होणाऱ्या आर्थिक सर्वेक्षणात आगामी आर्थिक वर्षांसाठी जीडीपीचा अंदाज वर्तवण्यात येतो. 

संसदेत आज सादर होणार आर्थिक सर्वेक्षण

Budget 2022 : आजपासून संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशनाची सुरुवात होत आहे. मंगळवारी 1 फेब्रुवारी रोजी अर्थसंकल्प मांडला जाणार आहे. तर, आज आर्थिक सर्वेक्षण (Economic Survey 2021-22)  सादर केले जाणार आहे. संसदेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणानंतर अर्थमंत्री निर्मला सीतारमण (Nirmala Sitharaman) आर्थिक वर्ष 2021-22 करीता आर्थिक सर्वेक्षण लोकसभेत मांडणार आहेत. देशाच्या अर्थव्यवस्थेची माहिती देण्यासाठी आणि काही धोरणात्मक बाबी सुचवण्यासाठी केंद्रीय अर्थसंकल्प सादर होण्याआधी आर्थिक सर्वेक्षण सादर केले जाते. 


अर्थसंकल्पीय अधिवेशनात 'या' मुद्द्यांवरून होऊ शकतो गदारोळ 

अर्थसंकल्पीय अधिवेशनात कोरोनाबाधित कुटुंबांना मदत पॅकेज, महागाई, बेरोजगारी, शेतकऱ्यांचे प्रश्न, सीमेवर चीनसोबतची अडवणूक आणि अन्य काही मुद्द्यांवर सरकारला घेरण्याचा निर्णय प्रमुख विरोधी पक्ष काँग्रेसने घेतला आहे. "सीमेवर चीनची वाढती आक्रमकता आणि त्यामुळे सुरू असलेली अडवणूक, महागाई, बेरोजगारी, अर्थव्यवस्थेची स्थिती, एअर इंडियाचे खासगीकरण आणि इतर सरकारी कंपन्यांसह शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरून सरकारला जाब विचारला जाईल.


राज्यसभेचे अध्यक्ष आणि उपराष्ट्रपती एम व्यंकय्या नायडू आणि संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी संसदेचे अधिवेशन सुरळीत चालावे यासाठी सोमवारी सभागृहातील राजकीय पक्षांच्या नेत्यांची बैठक घेणार आहेत. लोकसभा सचिवालयाच्या बुलेटिननुसार, 31 जानेवारी रोजी व्यवसाय सल्लागार समितीची बैठक होणार आहे.

Union Budget 2022 : मोदी सरकारचा दुसऱ्या टर्ममधला चौथा अर्थसंकल्प उद्या सादर होणार

मोदी सरकारचा दुसऱ्या टर्ममधला चौथा अर्थसंकल्प उद्या सादर होणार आहे. 1 फेबुवारीला सकाळी 11 वाजता अर्थमंत्री निर्मला सीतारामन अर्थसंकल्प सादर करतील. 2019 पासून ब्रीफेकसऐवजी बहीखात्याचा बदल मोदी सरकारनं केला. त्यामुळे निर्मला आपल्या बहीखात्यातून कुणाला दिलासा, कुणाला करवाढीचा फटका देणार? याची उत्सुकता सर्वांना आहेच. उत्तर प्रदेशसह पाच राज्यांची रणधुमाळी ऐन भरात असतानाच हा अर्थसंकल्प सादर होणार आहे. त्यामुळे निवडणुकांची छाया या बजेटमध्ये दिसणार असल्याचं सर्व स्तरांतून बोललं जात आहे. कोरोनाच्या सावटात अर्थव्यवस्थेचं हे तिसरं वर्ष आहे. त्यामुळे त्यातून अर्थव्यवस्थेला उभारी देण्यासाठी काय पावलं टाकली जातायत हेही पाहणंही महत्वाचं असेल.



 

Union Budget 2022 : आज आर्थिक सर्वेक्षण अहवाल सादर होणार

संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन 31 जानेवारीपासून म्हणजेच, आजपासून सुरू होत आहे. आज राष्ट्रपती रामनाथ कोविंद संसदेच्या दोन्ही सभागृहांच्या संयुक्त बैठकीला संबोधित करतील. तसेच, अर्थमंत्री निर्मला सीतारामण 2021-22 साठी आर्थिक सर्वेक्षण अहवाल सादर करतील. त्यानंतर उद्या म्हणजेच, अर्थमंत्री निर्मला सीतारमण 1 फेब्रुवारी रोजी 2022-23 या आर्थिक वर्षाचा केंद्रीय अर्थसंकल्प सादर करतील. 

Union Budget 2022 : आजपासून संसदेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन

Union Budget 2022 : आजपासून म्हणजेच, सोमवारपासून संसदेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु होत आहे. अशातच विरोधकांनी मोदी सरकारला घेरण्याची तयारी केली आहे. कोरोनाचं सावट आणि निवडणुकांची रणधुमाळी यात यावेळचा अर्थसंकल्प सादर होणार आहे. अशातच संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात गदारोळ होण्याची शक्यता आहे. पेगासस हेरगिरी प्रकरण, पूर्व लडाखमधील चीनची घुसखोरी, शेतकऱ्यांचे प्रश्न आणि बेरोजगारी यासह अनेक मुद्द्यांवर विरोधी पक्षांनी सरकारला घेरण्याची तयारी केली आहे. 

पार्श्वभूमी

Budget Session 2022 | Union Budget 2022 | Economic Survey 2022 LIVE Updates : आजपासून संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात होत आहे. प्रथेप्रमाणे, वर्षाचं पहिलं अधिवेशन असल्यामुळं याची सुरुवात राष्ट्रपती रामनाथ कोविंद (President Ram Nath Kovind) यांच्या अभिभाषणानं होणार आहे. राष्ट्रपती सेंट्रल हॉलमध्ये दोन्ही सभागृहांच्या संयुक्त अधिवेशनाला संबोधित करतील. राष्ट्रपतींच्या अभिभाषणातून सहसा सरकारच्या उपलब्धी आणि भविष्यातील योजनांचा तपशील दिला जाईल. तसेच, राष्ट्रपतींच्या अभिभाषणानंतर अर्थमंत्री निर्मला सीतारमण आर्थिक सर्वेक्षण अहवाल (Economic Survey 2022 LIVE Updates) 2021-22 (Economic Survey) सादर करतील. ज्यामध्ये देशाच्या आर्थिक स्थितीचे तपशीलवार वर्णन सादर करण्याबरोबरच आर्थिक-सामाजिक धोरणं आणि कार्यक्रमांची भविष्यातील दिशा दर्शविली जाईल.


संसद भवनाचं आजचं शेड्यूल : 



  • सकाळी 10 वाजता पंतप्रधान मोदींची पत्रकार परिषद 

  • सकाळी 10.55 मिनिटांनी राष्ट्रपती संसदेत पोहोचतील

  • सकाळी 11 वाजता राष्ट्रपतींचं अभिभाषण 

  • राष्ट्रपतींचे भाषण संपल्यानंतर अर्ध्या तासाने लोकसभेचं कामकाज सुरू होईल

  • आर्थिक सर्वेक्षण आधी लोकसभेत मांडणार

  • आर्थिक सर्वेक्षण सादर झाल्यानंतर लोकसभेचे कामकाज आजसाठी तहकूब करण्यात आले

  • दुपारी 2.30 मिनिटांनी राज्यसभेचं कामकाज सुरु होईल

  • आर्थिक सर्वेक्षण राज्यसभेत सादर होईल 

  • त्यानंतर राज्यसभा तहकूब केली जाईल

  • संध्याकाळी 3.45 वाजता मुख्य आर्थिक सल्लागार माध्यमांसमोर हजर होतील


आर्थिक सर्वेक्षण अहवाल म्हणजे काय? 


आर्थिक सर्वेक्षण अहवालात गेल्या एका वर्षातील देशातील आर्थिक गोष्टींचा लेखा-जोगा असतो. आर्थिक सर्वेक्षणात देशाच्या जीडीपीचाही अंदाज लावला आहे. गेल्या एका वर्षात झालेल्या देशाचा विकासाची समिक्षाही केली जाते. आर्थिक सर्वेक्षण भविष्यासाठी सूचना देखील देतं. अर्थसंकल्पापूर्वी संसदेच्या दोन्ही सभागृहात आर्थिक सर्वेक्षण सादर केले जाते. मुख्य आर्थिक सल्लागारांच्या नेतृत्त्वात आर्थिक सर्वेक्षण अहवाल तयार केला जातो. 


उद्या सादर होणार अर्थसंकल्प 


मोदी सरकारचा दुसऱ्या टर्ममधला चौथा अर्थसंकल्प उद्या सादर होणार आहे. 1 फेबुवारीला सकाळी 11 वाजता अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Nirmala Sitharaman) अर्थसंकल्प सादर करतील. 2019 पासून ब्रीफेकसऐवजी बहीखात्याचा बदल मोदी सरकारनं केला. त्यामुळे निर्मला आपल्या बहीखात्यातून कुणाला दिलासा, कुणाला करवाढीचा फटका देणार? याची उत्सुकता सर्वांना आहेच. उत्तर प्रदेशसह पाच राज्यांची रणधुमाळी ऐन भरात असतानाच हा अर्थसंकल्प सादर होणार आहे. त्यामुळे निवडणुकांची छाया या बजेटमध्ये दिसणार असल्याचं सर्व स्तरांतून बोललं जात आहे. कोरोनाच्या सावटात अर्थव्यवस्थेचं हे तिसरं वर्ष आहे. त्यामुळे त्यातून अर्थव्यवस्थेला उभारी देण्यासाठी काय पावलं टाकली जातायत हेही पाहणंही महत्वाचं असेल.


अर्थसंकल्पीय अधिवेशनात 'या' मुद्द्यांवरून होऊ शकतो गदारोळ 


अर्थसंकल्पीय अधिवेशनात कोरोनाबाधित कुटुंबांना मदत पॅकेज, महागाई, बेरोजगारी, शेतकऱ्यांचे प्रश्न, सीमेवर चीनसोबतची अडवणूक आणि अन्य काही मुद्द्यांवर सरकारला घेरण्याचा निर्णय प्रमुख विरोधी पक्ष काँग्रेसने घेतला आहे. "सीमेवर चीनची वाढती आक्रमकता आणि त्यामुळे सुरू असलेली अडवणूक, महागाई, बेरोजगारी, अर्थव्यवस्थेची स्थिती, एअर इंडियाचे खासगीकरण आणि इतर सरकारी कंपन्यांसह शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरून सरकारला जाब विचारला जाईल.

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.