मुंबई : नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी शेअर मार्केटमध्ये असलेली तेजी आजच्या दुसऱ्या दिवशीही कामय राहिली आहे. मंगळवारी शेअर बाजार बंद होताना सेन्सेक्समध्ये 672.71 अंकांनी वाढ झाली. ही वाढ कालच्या तुलनेत 1.14 टक्क्यांची असून सेन्सेक्स आता 59,855.93 वर पोहोचला आहे. निफ्टीमध्येही आज 179.55 अंकांची उसळी पाहायला मिळाली असून ती 1.02 टक्के इतकी वाढ आहे. आज निफ्टी 17,805.25 अंकांवर बंद झाला आहे. 


आज शेअर बाजारात मेटल आणि फार्मा शेअर्स सोडले तर सर्व शेअर्स सकारात्मक राहिले. उर्जा, बँक, ऑईल अॅन्ड गॅस सेक्टरमध्ये 1 टक्क्यांची वाढ नोंदवली गेली. 


शेअर मार्केट बंद होताना काही कंपन्यांचे शेअर्स वधारले. त्यामध्ये NTPC, ONGC, SBI, Power Grid आणि Titan Company निफ्टी मध्ये टॉप गेनर आहेत. तर Tata Motors, Coal India, Sun Pharma, Tata Consumer Products आणि  Shree Cements टॉप लूजर राहिले. 


आज शेअर बाजाराची सुरुवात सकारात्मक झाली. सुरुवातीच्या काही मिनिटांतच सेन्सेक्स 200 अंकांनी तर निफ्टी 62 अंकांनी वधारला. निफ्टीने 17700 चा टप्पा सुरुवातीच्या काही मिनिटांत ओलांडला. निफ्टीने 17700 चा टप्पा 11 डिसेंबरनंतर पुन्हा ओलांडला आहे. शेअर बाजार सुरू झाल्यानंतर 97.48 अंक म्हणजे जवळपास 0.16 टक्क्यांनी वधारला. तर, निफ्टी 65 अंकांनी वधारला आणि 17681 अंकावर ट्रेड करत होता. आज शेअर बाजार सुरू होताच सुरुवातीच्या 15 मिनिटात निफ्टी 50 पैकी 35 शेअर्स वधारले होते.  


या कंपन्यांचे शेअर वधारले


NTPC - 5.48 टक्के
ONGC - 3.32 टक्के
Power Grid - 2.73 टक्के
SBI - 2.73 टक्के
Titan Company - 2.34 टक्के


या कंपन्यांचे शेअर्स घसरले


Tata Motors - 1.61 टक्के
Coal India - 1.48 टक्के
Sun Pharma - 1.33 टक्के
Tata Consumer Products - 1.22 टक्के
Shree Cements - 1.08 टक्के


महत्त्वाच्या बातम्या :