मुंबई : शेअर मार्केटसाठी नवीन वर्षाचं स्वागत हे धमाक्यानं झालं असून मुंबई शेअर बाजारात आज सेन्सेक्स 929 अंकानी तर निफ्टी 272 अंकांनी वधारला आहे. मार्केट बंद होताना सेन्सेक्स 1.6 टक्क्यांनी वधारून तो 59, 183.22 अंकांवर पोहोचला आहे. निफ्टी 1.57 टक्क्यांनी वधारून तो 17, 625.70 अंकांवर पोहोचला आहे. देशातील कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ, आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या दरात वाढ आणि परदेशी बाजारातून कोणतेही सकारात्मक संकेत नसतानाही सेन्सेक्स आणि निफ्टीमध्ये झालेली वाढ ही सकारात्मक आहे. 


ऑस्ट्रेलिया, चीन, जपान, न्यूझिलंड आणि थायलंडमध्ये सुट्टीमुळे शेअर बाजार बंद राहिला. देशातील काही राज्यांमध्ये कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी निर्बंध लागू केले आहेत. काही विशेष क्षेत्रातील कंपन्यांना वगळले तर इतर कंपन्यांच्या व्यवसायावर किंचित परिणाम झाला आहे. 


या कंपन्यांचे शेअर वधारले



  • कोल इंडिया - 6.33 टक्के

  •  फेडरल बँक - 5.06 टक्के

  • आयशर  मोटर्स - 4.9 टक्के

  • आरबीएल बँक - 4.4 टक्के

  • अशोक लेलॅन्ड - 4.29


या कंपन्यांचे शेअर्स घसरले



  • लॉरस लॅब - 1.88 टक्के

  • युनायटेड ब्रेविअर - 1.5 टक्के

  • सिपला - 1.44 टक्के

  • सिनजिन इंटेल- 1.27 टक्के

  • कार्डिला हेल्थ - 1.22 टक्के


बजाज फिनसर्वच्या शेअर आज चांगलाच वधारला.  Bajaj Finserv चा शेअर 3.32 टक्क्यांनी वधारला होता. त्याशिवाय अॅक्सिक बँक, एचडीएफसी बँक, आयसीआयसीआय बँक हे स्टॉकदेखील वधारले आहेत. ऑटो क्षेत्रातील दिग्गज कंपनी मारूती सुझुकीचाही शेअरही वधारला. बॅक निफ्टीमध्ये चांगली तेजी दिसून आली. तसेच आयटी क्षेत्रातही तेजी दिसून आली आहे. 


त्याशिवाय, विप्रो, लार्सन अॅण्ड ट्रुबो, एशियन पेंट्स आणि टेक महिंद्राच्या शेअर दरात वाढ झाली. एनटीपीसी, टीसीएस, पॉवर ग्रीड, एचसीएल टेक, इन्फोसिसच्या शेअरमध्ये एक टक्क्यांनी वाढ झाली. तर, पीव्हीआर आणि आयनॉक्सच्या शेअर दरात मोठी घट झाली. . 


महत्त्वाच्या बातम्या :