बुडत्याचा पाय खोलात, अनिल अंबानींना मोठा झटका, 'या' कंपनीचं मोठं नुकसान
Anil Ambani : उद्योगपती अनिल अंबानी (Anil Amban) यांच्या कंपन्यांचे सतत नुकसान होत आहे. याचा मोठा आर्थिक फटका त्यांना सहन करावा लागत आहे.
Anil Ambani : बुडत्याचा पाया खोलात अशी मराठीत एक म्हण आहे. अगदी असाच काहीसा प्रकार उद्योगपती अनिल अंबानी (Anil Amban) यांच्या बाबतीत होत आहे. कारण, त्यांच्या कंपन्यांचे सतत नुकसान होत आहे. याचा मोठा आर्थिक फटका त्यांना सहन करावा लागत आहे. अनिल अंबानी यांच्या रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड (Reliance Infrastructure Ltd) या कंपनीला तिच्या उच्च खर्चामुळं डिसेंबर तिमाहीत 421.17 कोटी रुपयांचा तोटा झाला आहे. वर्षभरापूर्वी याच काळात 267.46 कोटी रुपयांचा निव्वळ तोटा या कंपनीला झाला होता.
अनिल अंबानींसाठी सध्याचा काळ चांगला नसल्याचे चित्र दिसत आहे. त्यांच्या कंपन्यांचे सतत नुकसान होत आहे. दिवसेंदिवस या कंपनीचा तोटा वाढत असल्याचं चित्र दिसत आहे. रिलायन्स इन्फ्राच्या तिमाही निकालातही असेच काहीसे आकडे पाहायला मिळत आहेत. गेल्या आर्थिक वर्षाच्या याच तिमाहीच्या तुलनेत तिसऱ्या तिमाहीत कंपनीचा तोटा जवळपास दुप्पट झाला आहे. शुक्रवारी कंपनीच्या शेअर्समध्येही घसरण पाहायला मिळाली.
रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीला झाला मोठा तोटा
रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेडने दिलेल्या माहितीनुसार, उच्च खर्चामुळे डिसेंबरच्या तिमाहीत तिचा एकत्रित निव्वळ तोटा 421.17 कोटी रुपये झाला आहे. कंपनीने शेअर बाजाराला सांगितले की, वर्षभरापूर्वी याच काळात 267.46 कोटी रुपयांचा निव्वळ तोटा झाला होता. याचाच अर्थ गेल्या वर्षभरात कंपनीचा तोटा 100 टक्क्यांनी वाढला आहे. जो कंपनीसाठी चिंतेचा विषय बनला आहे. दरम्यान, मिळालेल्या माहितीनुसार कंपनीचे एकूण उत्पन्न मागील वर्षीच्या याच कालावधीत 4224.64 कोटी रुपयांवरून 4717. 09 कोटी रुपये झाले. तर या तिमाहीत कंपनीचा खर्च वाढून 5,068.71 कोटी झाला आहे. रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर वीज, रस्ते, मेट्रो रेल्वे आणि इतर पायाभूत सुविधा क्षेत्रांसाठी अभियांत्रिकी आणि बांधकाम सेवा प्रदान करण्याच्या व्यवसायात गुंतलेली आहे.
रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीच्या शेअर्समध्ये घसरण
शेअर बाजारातील कंपनीच्या शेअर्समध्ये थोडीशी घसरण दिसून आली आहे. आकडेवारीनुसार, कंपनीचे शेअर्स 0.30 टक्क्यांच्या घसरणीसह बॉम्बे स्टॉक एक्सचेंजमध्ये 212.90 रुपयांवर बंद झाले आहेत. मात्र, कंपनीच्या समभागांनीही दिवसभरातील 205.65 रुपयांची खालची पातळी गाठली. मात्र, कंपनीचे मार्केट कॅप 8433 कोटी रुपये झाले आहे. दरम्यान, रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर या कंपनीला मोठा तोटा सहन करावा लागला आहे. या कंपनीचे एकूण उत्पन्न मागील वर्षीच्या याच कालावधीत 4224.64 कोटी रुपयांवरून 4717. 09 कोटी रुपये झाले. तर या तिमाहीत कंपनीचा खर्च वाढून 5,068.71 कोटी झाला आहे.
महत्वाच्या बातम्या:
रिलायन्सचा नवा आरोग्य विमा, जगात कुठेही घ्या उपचार; कंपनी देणार 8.3 कोटी रुपयांचा विमा