एक्स्प्लोर

Bank Holidays in September : सप्टेंबरमध्ये बँका 12 दिवस बंद; RBI च्या सुट्ट्यांच्या यादीनुसार संपूर्ण यादी

Bank Holidays : RBI बँकेच्या सुट्ट्यांच्या यादीनुसार, सप्टेंबर महिन्यात बँका सात दिवस बंद राहतील. सोबतच चार रविवार आणि दुसरा, चौथा शनिवार या दिवसांच्या सुट्टीसह एकूण 12 दिवस सुट्ट्या असतील.

Bank Holidays : ऑगस्टच्या तुलनेत सप्टेंबरमध्ये बँकेची कामं कोणत्याही घाईगडबडीशिवाय अगदी सहज करु शकता. कारण सप्टेंबरमध्ये ऑगस्टच्या तुलनेत बँकांना कमी दिवस सुट्ट्या असणार आहेत. भारतीय रिझर्व्ह बँकेच्या (RBI) हॉलिडे कॅलेंडरनुसार, सप्टेंबरमध्ये तब्बल 12 दिवसांसाठी बँकांना सुट्टी असणार आहे. RBI च्या अधिकृत यादीनुसार, सप्टेंबर महिन्यात सात दिवस बँका बंद राहणार आहेत. त्यासोबतच चार रविवार आणि दुसरा, चौथा शनिवार मिळून सप्टेंबरमध्ये एकूण 12 दिवसांसाठी बँका बंद राहणार आहेत. 

RBI नं 'Holiday under Negotiable Instruments Act' कॅटेगरी अंतर्गत सप्टेंबर महिन्यातील बँक हॉलिडे ठरवले आहेत. या सात दिवसांत वेगवेगळ्या राज्यांतील सण-उत्सव, धार्मिक समारंभांचा विचार करुन सुट्ट्यांचा समावेश केला आहे. त्यासोबतच ही माहितीही देण्यात आली आहे की, आठवडा सुट्ट्या वगळून RBI च्या सुट्ट्यांची यादी ही सर्वच बँकांसाठी लागू नसते. म्हणजेच, जर एखाद्या बँकेला सुट्टी असेल, तर आवश्यक नाही की, दुसऱ्या बँकेलाही ती सुट्टी असेल. दरम्यान, देशभरातील बँकांना त्या-त्या राज्यांतील सणावारांनुसार सुट्ट्या दिल्या जातात. 

10 सप्टेंबरला गणेश चतुर्थीची सुट्टी 

5 सप्टेंबरला रविवार असल्यामुळे सप्टेंबर महिन्यातील बँकांची ही पहिली सुट्टी असले. तर 10 सप्टेंबरला गणेश चतुर्थीची सुट्टी असेल. आरबीआयच्या अधिकृत आठवड्यातील सुट्ट्या वगळता 8 सप्टेंबरला श्रीमंत शंकरदेव तिथीनिमित्त गुवाहाटीमध्ये या दिवशी बँका बंद राहतील. तर या महिन्याची शेवटची बँक सुट्टी ही 21 सप्टेंबरला असेल. श्री नारायण गुरु समाधी दिनानिमित्त  कोची आणि तिरुअनंतपुरम येथील बँका या दिवशी बंद राहतील. तर 25 सप्टेंबरला चौथा शनिवार आणि 26 सप्टेंबर रोजी रविवार असल्याने देशभरातील बँका बंद राहतील. 

RBI हॉलिडे कॅलेंडरनुसार सप्टेंबर 2021 मधील बँकांच्या सुट्ट्यांची यादी खालीलप्रमाणे :

5 सप्टेंबर : रविवार
8 सप्टेंबर : श्रीमंत शंकरदेव तिथी (गुवाहाटी)
9 सप्टेंबर : तीज (हरितालिका) - (गंगटोक)
10 सप्टेंबर : गणेश चतुर्थी / संवत्सरी (चतुर्थी प्रकाशयोजना) / विनायक चतुर्थी / वर्षासिद्धी विनायक व्रत - (अहमदाबाद, बेलापूर, बंगलोर, भुवनेश्वर, चेन्नई, हैदराबाद, मुंबई, नागपूर, पणजी)
11 सप्टेंबर : दुसरा शनिवार / गणेश चतुर्थी (दुसरा दिवस) - (पणजी)
12 सप्टेंबर : रविवार
17 सप्टेंबर : कर्म पूजा - (रांची)
19 सप्टेंबर : रविवार
20 सप्टेंबर : इंद्रजत्रा - (गंगटोक)
21 सप्टेंबर : श्री नारायण गुरु समाधी दिवस - (कोची आणि तिरुअनंतपुरम)
25 सप्टेंबर : चौथा शनिवार
26 सप्टेंबर : रविवार

महाराष्ट्रात 5, 10, 11, 12, 19, 25 आणि 26 सप्टेंबर या दिवशी बँका बंद रहाणार आहेत. या शिवाय चार रविवार आणि दुसरा, चौथा शनिवार या दिवसांची सुट्टी कायम असेल.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

विधानसभेची खडाजंगी: बीड मतदारसंघात कोण बाजी मारणार, संदीप क्षीरसागर तुतारी फुंकणार की घड्याळ चालणार, ज्योती मेटेही मैदानात
विधानसभेची खडाजंगी: बीड मतदारसंघात कोण बाजी मारणार, संदीप क्षीरसागर तुतारी फुंकणार की घड्याळ चालणार, ज्योती मेटेही मैदानात
बंद सम्राटांना बंद करण्याची वेळ आलीय, धारावी बंद करु, रिफायनरी बंद करु, अरे काय सुरु करणार ते सांगा, मुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
बंद सम्राटांना बंद करण्याची वेळ आलीय, धारावी बंद करु, रिफायनरी बंद करु, अरे काय सुरु करणार ते सांगा, मुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
मुंबई बाळासाहेंबाच्या सिद्धांतांचे शहर, उद्धव ठाकरेंना चॅलेंज; शिवाजी पार्कवरील शेवटच्या सभेत काय म्हणाले मोदी
मुंबई बाळासाहेंबाच्या सिद्धांतांचे शहर, उद्धव ठाकरेंना चॅलेंज; शिवाजी पार्कवरील शेवटच्या सभेत काय म्हणाले मोदी
कारखाने विकत घ्यायला मी काही महाराष्ट्रभर हिंडलो नाही, जयंत पाटलांचा अजित पवारांवर हल्लाबोल
कारखाने विकत घ्यायला मी काही महाराष्ट्रभर हिंडलो नाही, जयंत पाटलांचा अजित पवारांवर हल्लाबोल
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Vinod Tawde EXCLUSIVE : पुढचा मुख्यमंत्री कोण होणार? विनोद तावडेंची स्फोटक मुलाखतDilip Walse Patil : शरद पवार म्हणाले गद्दार, सुट्टी नाही! दिलीप वळसे-पाटलांची पहिली प्रतिक्रियाMahesh Sawant : नरेंद्र मोदींचा इफेक्ट संपला;त्यांची सभा आमच्यासाठी शुभ शकुनPrakash Mahajan on Amit Thackeray : भाजपचा अमित ठाकरेंना पाठिंबा , मोदींच्या सभेचा मनसेला फायदा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
विधानसभेची खडाजंगी: बीड मतदारसंघात कोण बाजी मारणार, संदीप क्षीरसागर तुतारी फुंकणार की घड्याळ चालणार, ज्योती मेटेही मैदानात
विधानसभेची खडाजंगी: बीड मतदारसंघात कोण बाजी मारणार, संदीप क्षीरसागर तुतारी फुंकणार की घड्याळ चालणार, ज्योती मेटेही मैदानात
बंद सम्राटांना बंद करण्याची वेळ आलीय, धारावी बंद करु, रिफायनरी बंद करु, अरे काय सुरु करणार ते सांगा, मुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
बंद सम्राटांना बंद करण्याची वेळ आलीय, धारावी बंद करु, रिफायनरी बंद करु, अरे काय सुरु करणार ते सांगा, मुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
मुंबई बाळासाहेंबाच्या सिद्धांतांचे शहर, उद्धव ठाकरेंना चॅलेंज; शिवाजी पार्कवरील शेवटच्या सभेत काय म्हणाले मोदी
मुंबई बाळासाहेंबाच्या सिद्धांतांचे शहर, उद्धव ठाकरेंना चॅलेंज; शिवाजी पार्कवरील शेवटच्या सभेत काय म्हणाले मोदी
कारखाने विकत घ्यायला मी काही महाराष्ट्रभर हिंडलो नाही, जयंत पाटलांचा अजित पवारांवर हल्लाबोल
कारखाने विकत घ्यायला मी काही महाराष्ट्रभर हिंडलो नाही, जयंत पाटलांचा अजित पवारांवर हल्लाबोल
तुमच्या आमदाराने मला पाणी पाजलं; अजित पवारांच्या वक्तव्याने सभेत हशा पिकला; नेमका काय किस्सा घडला?
तुमच्या आमदाराने मला पाणी पाजलं; अजित पवारांच्या वक्तव्याने सभेत हशा पिकला; नेमका काय किस्सा घडला?
Video: 'राहुल गांधींनीच राष्ट्रवादीत जाण्याचा प्रस्ताव दिला'; माझा कट्टावर राधाकृष्ण विखे पाटलांचा गौप्यस्फोट
Video: 'राहुल गांधींनीच राष्ट्रवादीत जाण्याचा प्रस्ताव दिला'; माझा कट्टावर राधाकृष्ण विखे पाटलांचा गौप्यस्फोट
Rohit Pawar on Devendra Fadnavis : गुंड, धमक्यांनी निवडणुका जिंकता येत नाही, फडणवीस आणि त्यांच्या चेल्याचपाट्यांनी लक्षात घ्यावं; रोहित पवारांची सडकून टीका
गुंड, धमक्यांनी निवडणुका जिंकता येत नाही, फडणवीस आणि त्यांच्या चेल्याचपाट्यांनी लक्षात घ्यावं; रोहित पवारांची सडकून टीका
मोठी बातमी! राज्यात 18 ते 20 नोव्हेंबर शाळांना सुट्टी; शिक्षकांच्या गैरहजेरीमुळे शासनाचा मोठा निर्णय
मोठी बातमी! राज्यात 18 ते 20 नोव्हेंबर शाळांना सुट्टी; शिक्षकांच्या गैरहजेरीमुळे शासनाचा मोठा निर्णय
Embed widget