एक्स्प्लोर

Share Market: बुधवारी शेअर बाजारील व्यवहार सुरू राहणार; मग ईदची सुट्टी कधी असणार?

Share Market: बुधवारी शेअर बाजारील व्यवहार सुरू राहणार आहेत. बकरी ईदची सुट्टी एक दिवस पुढे ढकलण्यात आली आहे.

Share Market:  बकरी ईदमुळे भारतीय शेअर बाजार (Indian Share Market) आता बुधवारऐवजी गुरुवारी बंद (Share Market Holiday) राहणार आहे. गुरुवारी शेअर बाजारात कोणताही व्यवहार होणार नाही. नॅशनल स्टॉक एक्सचेंजने (NSE) मंगळवारी एक परिपत्रक जारी करून ही माहिती दिली आहे. महाराष्ट्र सरकारने सोमवारी बकर ईदच्या सुट्टीत बदल जाहीर केला होता. यानंतर NSE ने देखील बकर ईदची सुट्टी बुधवार ऐवजी गुरुवारी केली आहे. साप्ताहिक आणि मासिक डेरिव्हेटिव्ह कॉन्ट्रॅक्ट आता बुधवारी संपणार असून बकरी ईदची सुट्टी गुरुवारी असणार आहे. राष्ट्रीय शेअर बाजारने (NSE) याबाबतची माहिती दिली. 

एक दिवस आधीच एक्सपायरी

राष्ट्रीय शेअर बाजारने (NSE) दिलेल्या माहितीनुसार, सिंगापूर एक्सचेंचवर ट्रेड होणारे निफ्टी आणि निफ्टी बँक डेरिवेटिव्हस कॉन्ट्रॅक्ट एक्सपायरी आता गुरुवार ऐवजी बुधवारी संपणार आहे. भारतात डेरिवेटिव्हस कॉन्ट्रॅक्ट प्रत्येक महिन्याच्या शेवटच्या गुरुवारी संपतात. आता, गुरुवारी सार्वजनिक सुट्टी असल्याने एक्सपायरी एक दिवस आधीच संपणार आहे. 

निफ्टी बँकसाठी एक्सपायरी दिवस बदलला

या महिन्याच्या सुरुवातीला एनएसईने निफ्टी बँक डेरिवेटिव्हस कॉन्ट्रॅक्ट एक्सपायरी गुरुवारऐवजी शुक्रवारी करण्याचा निर्णय घेतला आहे. जुलै महिन्यापासून हा नवीन निर्णय अंमलात येणार आहे. 

शेअर बाजारात आज तेजी

मंगळवारी भारतीय शेअर बाजार तेजीसह बंद झाले. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स 0.71 टक्क्यांनी वाढून 446.03 अंकांनी 63,416.03 अंकांवर बंद झाला. त्याच वेळी, राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी 0.68 टक्के किंवा 126.20 अंकांनी वाढून 18,817.40 वर बंद झाला. एचडीएफसी लाइफ, अपोलो हॉस्पिटल्स, एसबीआय आणि एसबीआय लाईफ निफ्टी-50 मध्ये सर्वाधिक वाढले.

एचडीएफसी आणि HDFC बँकेचं होणार विलीनीकरण

देशातील सर्वात मोठी हाऊसिंग कंपनी एचडीएफसी (HDFC) आणि एचडीएफसी बँकेच्या (HDFC Bank) विलिनीकरणाचा मार्ग मोकळा झाला आहे. एचडीएफसी बँक आणि एचडीएफसीचे 1 जुलैपासून विलिनीकरण होणार आहे, अशी माहिती एचडीएफसीचे अध्यक्ष दीपक पारेख यांनी दिली. या विलिनीकरणानंतर एचडीएफसी फायनान्स एचडीएफसी बँकेचा एक भाग बनेल. विलिनीकरणासाठी लागणारी सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्या असून 30 जून रोजी बाजार बंद झाल्यानंतर एचडीएफसी बोर्डाची या प्रक्रियेसाठीची अखेरची बैठक पार पडणार आहे.

शेअरहोल्डर्सना मिळणार संपूर्ण हिस्सा

एचडीएफसी बँकेने (HDFC Bank) गेल्या वर्षी HDFC लिमिटेड ताब्यात घेण्यास आपली सहमती दर्शवली होती. हा करार 40 अब्ज डॉलर्सचा असून याची प्रस्तावित एकत्रित मालमत्ता सुमारे 18 लाख कोटी रुपयांची असेल. यानंतर, एचडीएफसी बँकेचे भागधारक बँकेतील 41 टक्के समभाग धारण करतील. HDFC लिमिटेडच्या प्रत्येक भागधारकाला त्याच्याकडे असलेल्या प्रत्येक 25 समभागांमागे HDFC बँकेचे 42 शेअर्स मिळणार आहेत.

महत्त्वाच्या बातम्या

तुम्ही कोणतं कार्ड वापरता? Airtel  चा ग्राहकांना मोठा दणका! सर्वात स्वस्त प्लॅन टाकला काढून, आता नवीन प्लॅन कोणता?
तुम्ही कोणतं कार्ड वापरता? Airtel  चा ग्राहकांना मोठा दणका! सर्वात स्वस्त प्लॅन टाकला काढून, आता नवीन प्लॅन कोणता?
दररोज संपत्तीत 4 हजार कोटींची वाढ, देशातील सर्वात श्रीमंत व्यावसायिकांकडे किती पैसा? जाणून घ्या कमाईबद्दल माहिती 
दररोज संपत्तीत 4 हजार कोटींची वाढ, देशातील सर्वात श्रीमंत व्यावसायिकांकडे किती पैसा? जाणून घ्या कमाईबद्दल माहिती 
राज्यात 36 हजार कंपन्या बंद, केंद्र सरकारची माहिती, मंत्री उदय सामंत म्हणाले, एक दिवस द्या, मी तपासून सांगतो 
राज्यात 36 हजार कंपन्या बंद, केंद्र सरकारची माहिती, मंत्री उदय सामंत म्हणाले, एक दिवस द्या, मी तपासून सांगतो 
पॉपकॉर्न विकून कमावले 2000 कोटी रुपये, चित्रपट हिट असो वा नसो, PVR आयनॉक्सची मात्र जोरदार कमाई
पॉपकॉर्न विकून कमावले 2000 कोटी रुपये, चित्रपट हिट असो वा नसो, PVR आयनॉक्सची मात्र जोरदार कमाई

व्हिडीओ

Sanjay Raut Vs Naresh Mhaske Special Report : नरेश म्हस्केंची पत्रं, संजय राऊतांच्या बैठका, कोण खरं?
Sanjay Raut PC : शिवसेना सुनावणी, शिंदेंवर हल्लाबोल ते गडचिरोली प्रकरण; संजय राऊतांचा हल्लाबोल!
Sanjay Kute On Manoj Jarange : जरांगेंच्या मागणीवर भाजप आमदार संजय कुटेंचं भाष्य, भाषेवरुन सुनावलं!
Gatari Pune News: आधी मटण घेणार, मगच ऑफिसला जाणार...; गटारी स्पेशल पुणेकरांचा बेत
Manoj Jarange Mumbai Protest : मनोज जरांगेंची पुन्हा मुंबईकडे कूच? भगवं वादळ मुंबईत घडकणार?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sunetra Pawar : महिला नेतृत्वावर टीका करणाऱ्यांना कामातून उत्तर देणार; देवेंद्र फडणवीसांच्या पाठिंब्याबद्दल सुनेत्रा पवारांचे आभार
महिला नेतृत्वावर टीका करणाऱ्यांना कामातून उत्तर देणार; देवेंद्र फडणवीसांच्या पाठिंब्याबद्दल सुनेत्रा पवारांचे आभार
कुंभमेळा बनावट वर्क ऑर्डर, 70 कोटींचे कंत्राट; गिरीश महाजन म्हणाले, आरोपी नातेवाईक असला तरी कडक कारवाई
कुंभमेळा बनावट वर्क ऑर्डर, 70 कोटींचे कंत्राट; गिरीश महाजन म्हणाले, आरोपी नातेवाईक असला तरी कडक कारवाई
अखेर रायगडमध्ये भरत गोगावले झेंडावंदन करणार; सुनेत्रा पवारांच्याहस्ते बीडमध्ये ध्वजारोहण, पुण्यात कोण?
अखेर रायगडमध्ये भरत गोगावले झेंडावंदन करणार; सुनेत्रा पवारांच्याहस्ते बीडमध्ये ध्वजारोहण, पुण्यात कोण?
राष्ट्रवादीच्या महिला नेत्याचा वेगळाच अंदाज; शेतात 'धामण' साप पकडल्यानंतर रोहिणी खडसेंचं आवाहन
राष्ट्रवादीच्या महिला नेत्याचा वेगळाच अंदाज; शेतात 'धामण' साप पकडल्यानंतर रोहिणी खडसेंचं आवाहन
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 ऑगस्ट 2026 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 ऑगस्ट 2026 | बुधवार
B.Tech इंजिनिअरने ड्रायव्हर बनून चोरली लक्झरी कार; व्हर्च्युअल व्हॉट्सअप मोबाईल नंबर बनवून पसार, अखेर पुण्यात बेड्या
B.Tech इंजिनिअरने ड्रायव्हर बनून चोरली लक्झरी कार; व्हर्च्युअल व्हॉट्सअप मोबाईल नंबर बनवून पसार, अखेर पुण्यात बेड्या
Video: अन् क्रेटा कार दुभाजकाला धडकून तब्बल 10 फुट हवेत उडाली; गँगस्टर अतीक अहमदच्या लेकाच्या भीषण अपघाताचा भयावह Live व्हिडिओ समोर
Video: अन् क्रेटा कार दुभाजकाला धडकून तब्बल 10 फुट हवेत उडाली; गँगस्टर अतीक अहमदच्या लेकाच्या भीषण अपघाताचा भयावह Live व्हिडिओ समोर
अशा पद्धतीने कोणतेही सरकार पाडू शकता, एखाद्या विधीमंडळ पक्षाची सत्ताधारी पक्षाला विक्री कशी होऊ शकते? कायद्याला लोकशाहीची विटंबना करू देऊ नका, कपिल सिब्बलांची कोर्टात 'सर्वोच्च' साद
अशा पद्धतीने कोणतेही सरकार पाडू शकता, एखाद्या विधीमंडळ पक्षाची सत्ताधारी पक्षाला विक्री कशी होऊ शकते? कायद्याला लोकशाहीची विटंबना करू देऊ नका, कपिल सिब्बलांची कोर्टात 'सर्वोच्च' साद
Embed widget