Bank Holidays in April 2022 : एप्रिल महिन्यात 'या' दिवशी बँका राहणार बंद! ही आहे सुट्ट्यांची यादी
Bank Holidays in April 2022 : एप्रिल महिन्यात सलग नऊ दिवस बॅंका बंद राहणार आहेत. या सुट्ट्या संपूर्ण देशभरात लागू होणार आहेत.
Bank Holidays in April 2022 : मार्च महिना संपून उद्यापासून एप्रिल महिना सुरु होणार आहे. अशा वेळी, तुमची बॅंकेत काही महत्वाची कामे असतील तर आताच उरकून घ्या. कारण एप्रिल महिन्यात सलग नऊ दिवस बॅंका बंद राहणार आहेत. या सुट्ट्या संपूर्ण देशभरात लागू होणार आहेत. नुकत्याच, रिझर्व्ह बॅंक ऑफ इंडियाने (RBI) जाहीर केलेल्या परिपत्रकानुसार एप्रिल महिन्यात कोणत्या दिवशी बॅंका बंद असणार आहेत याची यादी जाहीर केली आहे.
एप्रिल 2022 मधील बँक सुट्ट्यांची यादी :
1 एप्रिल - वार्षिक बँक खाते बंद करणे. आयझॉल, चंदीगड, शिलाँग आणि शिमला वगळता बहुतांश ठिकाणच्या बँका या दिवशी बंद राहतील.
2 एप्रिल - गुढी पाडवा / उगाडी सण / पहिली नवरात्र / तेलुगु नववर्ष दिन / साजिबू नोंगमापनबा (चेराओबा). बेलापूर, बेंगळुरू, चेन्नई, हैदराबाद, इंफाळ, जम्मू, मुंबई, नागपूर, पणजी आणि श्रीनगर येथील बँका बंद राहतील.
4 एप्रिल - सरहुल. रांची भागातील बँका बंद राहतील.
5 एप्रिल - बाबू जगजीवन राम यांच्या जन्मदिनानिमित्त हैदराबाद भागातील बँका बंद राहतील.
14 एप्रिल - डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती/महावीर जयंती/बैसाखी/वैसाखी/तमिळ नववर्ष दिन/चेराओबा/बिजू उत्सव/बोहाग बिहू. शिलाँग आणि शिमला वगळता बहुतांश ठिकाणच्या बँका बंद राहतील.
15 एप्रिल - गुड फ्रायडे/बंगाली नवीन वर्षाचा दिवस (नबावर्षा)/हिमाचल दिवस/विशू/बोहाग बिहू. जयपूर, जम्मू आणि श्रीनगर वगळता बहुतांश ठिकाणच्या बँका बंद राहतील.
16 एप्रिल - बोहाग बिहू. गुवाहाटी भागातील बँका बंद राहतील.
21 एप्रिल - गरिया पूजा. आगरतळा येथील बँका बंद राहतील.
29 एप्रिल - शब-ए-कदर/जुमत-उल-विदा. जम्मू आणि श्रीनगर भागातील बँका बंद राहतील.
वरील सुट्ट्यांव्यतिरिक्त दुसऱ्या आणि चौथ्या शनिवारी आणि सर्व रविवारी बँका बंद राहतील. या बॅंकेच्या सुट्ट्या असल्या तरी खातेधारकांनी बॅंकेचे काही काम करण्यासाठी नेट बँकिंग आणि मोबाईल बँकिंग वापरू शकतात.
महत्वाच्या बातम्या :
- औषधं महागणार, बँकेचे नियमही बदलणार; जाणून घ्या उद्यापासून काय बदल होणार?
- Income Tax : उद्यापासून आयकर नियमांमध्ये होणार मोठे बदल! आज तुमची रिटर्न फाइल पूर्ण करण्यासाठी शेवटची संधी
- PAN Aadhaar Link : 'या' व्यक्तींना पॅन-आधार लिंक करणे बंधनकारक नाही, जाणून घ्या काय आहे कारण?
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह | ABP Majha