एक्स्प्लोर

8th Pay Commission : आठव्या वेतन आयोगात पगार 30 ते 34 टक्क्यांनी वाढण्याची शक्यता, पगारवाढीचा फायदा किती कर्मचाऱ्यांना होणार?

8th Pay Commission : आठव्या वेतन आयोगाची अंमलबजावणी जानेवारी 2026 पासून होणं अपेक्षित आहे. सातव्या वेतन आयोगाचा कालावधी 31 डिसेंबर 2025 ला संपणार आहे.

नवी दिल्ली : केंद्र सरकारचे कर्मचारी आणि पेन्शनधारक यांना आठव्या वेतन आयोगाची प्रतीक्षा आहे. रिपोर्टनुसार आठव्या वेतन आयोगाच्या अंमलबजावणीनंतर कर्मचाऱ्यांचा पगार आणि पेन्शनमध्ये 30 ते 34 टक्क्यांनी वाढण्याची शक्यता आहे. द इकोनॉमिक्स टाईम्सच्या वृत्तानुसार अम्बित कॅपिटलच्या रिपोर्टनुसार आठव्या वेतन आयोगाच्या अंमलबजावणीचा फायदा जवळपास 1 कोटी 10 लाख जणांना होणार आहे.

आठव्या वेतन आयोगानुसार बदलणाऱ्या वेतनश्रेणीची अंमलबजावणी जानेवारी 2026 पासून होणं अपेक्षित आहे. मात्र, त्यासाठी वेतन आयोगाचा अहवाल तयार होण्याची गरज आहे. त्यानंतर वेतन आयोगाचा अहवाल केंद्र सरकारकडे पाठवला जाईल. त्यानंतर केंद्र सरकारकडून त्याला मंजुरी मिळणं अपेक्षित आहे. केंद्र सरकारनं सध्या फक्त आठव्या वेतन आयोगाची घोषणा केली आहे. आयोगाचं नेतृत्व कोण करणार किंवा कोणत्या अटी असतील यासंदर्भातील निर्णय घेण्यात आलेले नाहीत.

आठव्या वेतन आयोगाचा फायदा केंद्र सरकारचे कर्मचारी आणि पेन्शनधारकांना होणार आहे. यामध्ये 44 लाख केंद्र सरकारचे कर्मचारी आणि 68 लाख पेन्शधारकांना होणार आहे. आठवा वेतन आयोग मंजूर झाल्यानंतर मूळ वेतनात, भत्त्यांमध्ये आणि निवृत्तीनंतर मिळणाऱ्या फायद्यांमध्ये वाढ होईल.

महत्त्वाची बाब म्हणजे आठव्या वेतन आयोगाला मान्यता दिल्यानंतर फिटमेंट फॅक्टर प्रमाणं पगारात बदल होतील. फिटमेंट फॅक्टरचा वापर सध्याच्या मूळ वेतनाशी गुणाकार करुन नवं मूळ वेतनं काढलं जाईल. सातव्या वेतन आयोगाच्या अंमलबजावणी वेळी फिटमेंट फॅक्टर 2.57 इतका होता. त्यामुळं मूळ वेतन 7000 हजार रुपयांवरुन 18000 रुपयांपर्यंत वाढलं होतं. संशोधन अहवालानुसार फिटमेंट फॅक्टर 1.83 ते 2.46 असू शकतो. यावरुन आठव्या वेतन आयोगात मूळ वेतन आणि पेन्शन कितीनं वाढणार हे निश्चि होऊ शकतं.

यापूर्वीच्या वेतन आयोगांच्या अंमलबजावणीचा विचार केला असता सहाव्या वेतन आयोगाच्या अंमलबजावणीनंतर एकूण पगार आणि भत्त्यांमध्ये जवळपास 54 टक्के वाढ झाली होती. त्यानंतर सातव्या वेतन आयोगात मूळ वेतनात 14.3 टक्के वाढ झाली होती. तर, पहिल्या वर्षी इतर भत्त्यांमध्ये 23 टक्के वाढ झाली होती. आता आठव्या वेतन आयोगात पगार किती वाढणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

केंद्र सरकारकडून कर्मचाऱ्यांना पगार देताना विविध गोष्टींचा विचार केला जातो. त्यामध्ये मूळ वेतन, महागाई भत्ता, घरभाडे भत्ता, प्रवास भत्ता आणि इतर लाभांचा समावेश असतो. काही वर्षांपूर्वी मूळ वेतन 65 टक्क्यांवरुन 50 टक्क्यांपर्यंत आणलं गेलं आणि इतर भत्त्यांमध्ये वाढ करण्यात आली. पेन्शन धारकांना केवळ घरभाडे भत्ता आणि प्रवास भत्ता दिला जात नाही

एबीपी माझा वेब टीममध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत | राजकारण,क्रीडा, राष्ट्रीय, आंतराराष्ट्रीय ते गाव खेड्यातल्या शेती क्षेत्रातल्या बातम्यांची आवड | यापूर्वी महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन | टीव्ही 9 मराठी डिजीटल | ईटीव्ही भारत महाराष्ट्र मध्ये काम 
Read More

महत्त्वाच्या बातम्या

पायलट नशेत होता, एअर इंडियाच्या दिल्ली-फुकेट विमानातील कॅप्टन इन कमांडची दुसरी डोप टेस्टही पॉझिटीव्ह
पायलट नशेत होता, एअर इंडियाच्या दिल्ली-फुकेट विमानातील कॅप्टन इन कमांडची दुसरी डोप टेस्टही पॉझिटीव्ह
Closing Auction Session : शेअर बाजारातील बंद भाव ठरवण्याच्या पद्धतीत मोठा बदल; गुंतवणूकदारांवर काय परिणाम होणार?
शेअर बाजारातील बंद भाव ठरवण्याच्या पद्धतीत मोठा बदल; गुंतवणूकदारांवर काय परिणाम होणार?
ED Chief Rahul Navin : ईडीचे प्रमुख राहुल नवीन यांचा कार्यकाळ एका वर्षानं वाढवला, मोदी सरकारचा मोठा निर्णय
ईडीचे प्रमुख राहुल नवीन यांचा कार्यकाळ एका वर्षानं वाढवला, मोदी सरकारचा मोठा निर्णय
देशातील सर्वात मोठ्या बँकेत नोकरीची संधी, 1 हजार 538 जागांसाठी भरती प्रक्रिया सुरु, कसा कुठे कराल अर्ज? 
देशातील सर्वात मोठ्या बँकेत नोकरीची संधी, 1 हजार 538 जागांसाठी भरती प्रक्रिया सुरु, कसा कुठे कराल अर्ज? 

व्हिडीओ

Manoj Jarange Patil Defender Car : 2 कोटींची आलिशान डिफेंडर गाडी कोणाची? मनोज जरांगे काय म्हणाले...
Manoj Jarange Patil Sangli : मराठा आमदार-खासदारांचे फोन; गुपचूप पाठिंबा असल्याचा जरांगेंचा दावा
Manoj Jarange On Maratha Protest: मराठा समाजाचा पुन्हा एकदा मुंबईकडे कूच करण्याचा विचार; मनोज जरांगे काय काय म्हणाले?
Parbhani Police on MD case : अमली पदार्थाचं जाळं भेदलं, मराठवाड्यात मोठं रॅकेट उद्ध्वस्त
Sharad Pawar NCP MP Meet PM Modi : मोदींच्या दरबारी कोणती 'तुतारी'? Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Bharat Gogawale : रायगडच्या पालकमंत्रिपदी भरत गोगावलेंची बाजी? आजच नाव जाहीर होणार, गोगावलेंचा मोठा दावा
रायगडच्या पालकमंत्रिपदी भरत गोगावलेंची बाजी? आजच नाव जाहीर होणार, गोगावलेंचा मोठा दावा
तुकाराम मुंढेंचा मोर्चा बस स्थानकांकडे; संभाजीनगर जिल्ह्यात FDA ची कारवाई, सिल्लोडमधील कँटीन सील
तुकाराम मुंढेंचा मोर्चा बस स्थानकांकडे; संभाजीनगर जिल्ह्यात FDA ची कारवाई, सिल्लोडमधील कँटीन सील
पायलट नशेत होता, एअर इंडियाच्या दिल्ली-फुकेट विमानातील कॅप्टन इन कमांडची दुसरी डोप टेस्टही पॉझिटीव्ह
पायलट नशेत होता, एअर इंडियाच्या दिल्ली-फुकेट विमानातील कॅप्टन इन कमांडची दुसरी डोप टेस्टही पॉझिटीव्ह
देवेंद्र फडणवीसांच्या ड्रीम प्रोजेक्टला सुब्रमण्यम स्वामींचा विरोध; म्हणाले, मी हात जोडून नमस्कार करणारा नाही
देवेंद्र फडणवीसांच्या ड्रीम प्रोजेक्टला सुब्रमण्यम स्वामींचा विरोध; म्हणाले, मी हात जोडून नमस्कार करणारा नाही
Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना 'डिफेंडर' देणारे सुभाष भोसले कोण, कारची किंमत किती? मराठा कार्यकर्त्याने सगळं सांगितलं
मनोज जरांगेंना 'डिफेंडर' देणारे सुभाष भोसले कोण, कारची किंमत किती? मराठा कार्यकर्त्याने सगळं सांगितलं
धक्कादायक! मित्रांसोबत कालव्यावर अंघोळीला जाणं भोवलं, चंद्रपूरमध्ये 10 वीत शिकणारा विद्यार्थी गेला वाहून, शोधकार्य सुरु
धक्कादायक! मित्रांसोबत कालव्यावर अंघोळीला जाणं भोवलं, चंद्रपूरमध्ये 10 वीत शिकणारा विद्यार्थी गेला वाहून, शोधकार्य सुरु
शॉकिंग! महावितरणचा 'स्मार्ट' झटका; हिंगोलीत रोजंदारीवरील महिलेला 2 लाख 18 हजार लाईट बिल, कुठून आणणार पैसे?
शॉकिंग! महावितरणचा 'स्मार्ट' झटका; हिंगोलीत रोजंदारीवरील महिलेला 2 लाख 18 हजार लाईट बिल, कुठून आणणार पैसे?
संतापजनक! मित्रासोबत हायवेवर थांबलेल्या तरुणीला डाक बंगल्यावर नेलं; 6 जणांकडून सामूहिक अत्याचार, तिघांना अटक
संतापजनक! मित्रासोबत हायवेवर थांबलेल्या तरुणीला डाक बंगल्यावर नेलं; 6 जणांकडून सामूहिक अत्याचार, तिघांना अटक
Embed widget