एक्स्प्लोर

रवींद्र चव्हाणांची सोशल मीडियावर 'मोदी मॅजिक'

सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांनी स्वतः इन्स्टाग्राम हॅण्डलवरून "मोदी मॅजिक" या मथळ्याखाली मोदींनी गेल्या १० वर्षात केलेल्या कामाची शृंखला सुरु केल्याचं दिसतंय.

निवडणूक प्रचारात सोशल मीडियाचा वापर करण्यात सर्व पक्षांमध्ये चढाओढ लागली असताना काही पक्ष विशेषतः भाजपा एक पाऊल पुढे राहिल्याचे दिसत आहे. नरेंद्र मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्याचं आवाहन करताना 400 पारची साद घातली जात आहे. महाराष्ट्राचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांनी स्वतः इन्स्टाग्राम हॅण्डलवरून "मोदी मॅजिक" या मथळ्याखाली मोदींनी गेल्या 10 वर्षात केलेल्या कामाची शृंखला सुरु केल्याचं दिसतंय. त्याला यूजर्सचाची प्रतिसाद मिळत असल्याचं दिसत आहे. 

2014 पूर्वीच्या काँग्रेस सरकारने केलेली कामे विरुद्ध गेल्या 10 वर्षात मोदी सरकारने केलेल्या कामांची तुलना लोकांसमोर रविंद्र चव्हाण मांडताना दिसत आहेत. त्यात प्रामुख्याने मोदी सरकारच्या सर्वश्रुत असलेल्या आवास योजना, पेयजल योजना, मेक इन इंडिया योजनांबाबत रील्स स्वरूपात माहिती दिली जात आहेच पण या व्यतिरिक्त शहर विकास, वीज पर्याप्तता, खादी ब्रॅण्डिंग, दूध क्रांती, निर्यातदार  भारत, रेल्वे स्थित्यंतर, ब्रॉडबँड, स्वस्थ भारत, पॉवर ऑफ मोदी अशा वेगवेगळ्या विषयांवर रविंद्र चव्हाण रील्सच्या माध्यमातून मोदी सरकारचे महत्त्व विशद करून सांगत आहेत. 

खरंतर रविंद्र चव्हाण यांना महाराष्ट्र सरकारमधील सार्वजनिक बांधकाम विभागाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. यासोबतच ते महाराष्ट्र भाजपाचे प्रदेश महामंत्री आहेत आणि कोकण विभागातील ६ लोकसभा मतदारसंघांवर त्यांचा प्रत्यक्ष प्रभाव आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या डोंबिवलीतून सलग तीन वेळा विधानसभा निवडणूक जिंकून ते विधानसभेत गेले आहेत. त्यामुळे भाजपाच्या विचारधारेची नस त्यांना बरोबर माहिती आहे. सोशल मिडियाचा उत्तम वापर करणाऱ्या नेत्यांमध्ये त्यांचे नाव आहे. त्यामुळे सोशल मीडियाचा प्रभावी वापर करताना मोदी मॅजिकच्या माध्यमातून मोदी सरकारने गेल्या 10 वर्षात केलेल्या लोकोपयोगी कामाची तपशीलवार आकडेवारीसह जंत्रीच चव्हाण सोशल मीडियावर रील्स आणि व्हिडीओ स्वरूपात मतदारांसमोर आणताना दिसत आहेत. 

लोकसभा जागांच्या बाबतीत दुसऱ्या स्थानी असल्याने राज्यातून भाजपा आणि महायुतीच्या वतीने जास्तीत जास्त खासदार जिंकून आणण्याचे ध्येय असल्याने मोदी मॅजिक ही विशेष शृंखला चव्हाण यांनी सुरु केली.  काँग्रेसच्या धोरणांवर प्रहार करताना भाजपातील आणि विशेषतः मोदींना केंद्रस्थानी ठेवून मोदी मॅजिकमुळे भाजपाने थेट डिजिटल प्रचार सुरु केल्याचं दिसतय. 

पारदर्शक सरकार म्हणून भाजपने थेट लोकहिताचे काम केलं आहे आणि पंतप्रधान मोदी यांची आंतरराष्ट्रीय नेता ही प्रतिमा जगात होत असल्याचे अधोरेखित करण्याचा प्रचार भाजपकडून होत आहे.  
यासोबतच काँग्रेस सरकारने केलेल्या घोटाळ्यांचा देखील यात उल्लेख करून विरोधकांवर निशाणा साधण्यात आला आहे.  

महाराष्ट्रात जेव्हा राजकीय भूकंप होऊन सत्तांतर घडले, तेव्हा रविंद्र चव्हाण यांच्यावर प्रत्यक्षपणे राजकीय त्या आखाड्यात अत्यंत महत्त्वाची जबाबदारी देण्यात आली होती ती त्यांनी यशस्वीरित्या पार पडली आणि भाजप महाराष्ट्रात पुन्हा सत्तेत सहभागी झाला. आज पुन्हा एकदा रविंद्र चव्हाण "सोशल मीडिया इन्फ्लूएन्सर" च्या अंदाजात मोदी मॅजिकच्या गोष्टी सांगत आहेत.

(Disclaimer: ABP Network Pvt. Ltd. and/or ABP Live does not in any manner whatsoever endorse/subscribe to the contents of this article and/or views expressed herein. Reader discretion is advised.)

आणखी वाचा

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Donald Trump : आमच्या तेल कंपन्यांना त्यांनी बाहेर फेकलं, अमेरिकेच्या व्हेनेझुएलावरील हल्ल्यानंतर ट्रम्प यांचा व्हिडिओ व्हायरल 
आमच्या तेल कंपन्यांना त्यांनी बाहेर फेकलं,व्हेनेझुएलावरील हल्ल्यानंतर ट्रम्प यांचा व्हिडिओ व्हायरल 
सदानंद दातेंनी स्वीकारला पोलीस महासंचालकपदाचा पदभार; 26/11 मध्ये दहशतवाद्यांशी लढणारे डॅशिंग अधिकारी
सदानंद दातेंनी स्वीकारला पोलीस महासंचालकपदाचा पदभार; 26/11 मध्ये दहशतवाद्यांशी लढणारे डॅशिंग अधिकारी
एबी फॉर्म गिळलेल्या उमेदवाराची माघार, मग मच्छिंद्र ढवळेंचा अर्ज मंजूर कसा? निवडणूक आयोगानेच सांगितलं
एबी फॉर्म गिळलेल्या उमेदवाराची माघार, मग मच्छिंद्र ढवळेंचा अर्ज मंजूर कसा? निवडणूक आयोगानेच सांगितलं
पोलीस बंदोबस्तात मनसे पदाधिकाऱ्याची अंत्ययात्रा, मोठी गर्दी; शहरात तणाव, राजकीय वादातून हत्या
पोलीस बंदोबस्तात मनसे पदाधिकाऱ्याची अंत्ययात्रा, मोठी गर्दी; शहरात तणाव, राजकीय वादातून हत्या
Venezuela : राष्ट्रपती निकोलस मादुरो अमेरिकेच्या ताब्यात, व्हेनेझुएलाचं नेतृत्त्व कोण करणार? नाव आघाडीवर असलेल्या डेल्सी रॉड्रिग्ज नेमक्या कोण?
राष्ट्रपती निकोलस मादुरो अमेरिकेच्या ताब्यात, व्हेनेझुएलाचं नेतृत्त्व कोण करणार? डेल्सी रॉड्रिग्ज यांचं नाव आघाडीवर
बीडमध्ये सह्याद्री वनराईला दुसऱ्यांदा आग, सयाजी शिंदेंचा संताप; अजित पवारांना भेटणार, काय म्हणाले शिंदे
बीडमध्ये सह्याद्री वनराईला दुसऱ्यांदा आग, सयाजी शिंदेंचा संताप; अजित पवारांना भेटणार, काय म्हणाले शिंदे
Team India Squad Against New Zealand ODI: न्यूझीलंडविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेसाठी टीम इंडिया जाहीर; दोघांची घरवापसी, पण मोहम्मद शमीकडे पुन्हा दुर्लक्ष!
न्यूझीलंडविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेसाठी टीम इंडिया जाहीर; दोघांची घरवापसी, पण मोहम्मद शमीकडे पुन्हा दुर्लक्ष!
Mutual Fund : 2025 मध्ये इक्विटी म्युच्युअल फंडमधील गुंतवणूक घटली, घसरणीची कारणं समोर, SIP मुळं बाजाराला दिलासा
2025 मध्ये इक्विटी म्युच्युअल फंडमधील गुंतवणूक घटली, घसरणीची कारणं समोर, SIP मुळं बाजाराला दिलासा
Embed widget