एक्स्प्लोर

पर्यावरण व वातावरणीय बदल विभाग आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित; पर्यावरण पूरक गणेश मूर्ती प्रदर्शन 2023; संकल्पनेला गणेशभक्तांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

5 व 6 सप्टेंबरला मंत्रालयाच्या इमारतीतील त्रिमूर्ती प्रांगण येथे 'पर्यावरणपूरक गणेश मूर्ती प्रदर्शन 2023' ह्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. 

महाराष्ट्र शासन अंतर्गत पर्यावरण व वातावरणीय बदल विभाग आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने 5 व 6 सप्टेंबरला मंत्रालयाच्या इमारतीतील त्रिमूर्ती प्रांगण येथे 'पर्यावरणपूरक गणेश मूर्ती प्रदर्शन 2023' ह्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. 

ह्या प्रदर्शनाचे उद्घाटन श्री मनोज सैनिक (भा.प्र.से.) मुख्य सचिव महाराष्ट्र शासन यांच्या हस्ते करण्यात आले. तसेच श्री प्रवीण दारडे (भा.प्र.से.) प्रधान सचिव पर्यावरण व वातावरणीय बदल विभाग आणि डॉ. अविनाश धाकणे (भा.प्र.से.) सदस्य सचिव महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ हे देखील उपस्थित होते.

या दोन दिवशी पर्यावरणपूरक गणेश मूर्ती प्रदर्शनामध्ये फक्त शाडू मातीच्याच गणेश मूर्ती नव्हे तर लाल माती, लाकडाचा भुसा, गाईचं शेण, कागदाचा लगदा ह्यांपासून तयार करण्यात आलेल्या मुर्त्या तसेच पुनर्वापर करुन शाडूची माती तसेच वेगवेगळ्या प्रांतातील वेगवेगळ्या रंगांच्या मातीचा वापर करुन बनविलेल्या विविध आकर्षक मूर्ती साऱ्यांचे लक्ष वेधून घेत होत्या. गणपतीसाठी कागदी मखर, कागदी सजावटीच्या वस्तू, पुठ्ठ्यापासून बनविलेल्या विविध वस्तू, शेणी पासून बनविलेल्या विविध वस्तू आणि लाकडापासून व लाकडाच्या भुशापासून बनवलेल्या विविध वस्तूंचे स्टॉल्स मांडण्यात आले होते. ह्या साऱ्यांमध्ये पुठ्ठ्यापासून बनवलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीने हक्काचा अग्रक्रम मिळवला होता.

या दोन दिवसात प्रदर्शनास भेट द्यायला आलेल्यांच्या वर्दळीमुळे साऱ्या स्टॉल धारकांच्या चेहऱ्यावर आनंद आणि समाधान दिसून आले. कार्यक्रमाला मंत्रालयातील पोलीस प्रशासन अधिकारी आणि मंत्री महोदय ह्यांनी विशेष हजेरी लावून कार्यक्रमाची शोभा वाढवली.

(Disclaimer: ABP Network Pvt. Ltd. and/or ABP Live does not in any manner whatsoever endorse/subscribe to the contents of this article and/or views expressed herein. Reader discretion is advised.)

 
 
अधिक पाहा..

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
उपमुख्यमंत्री नाराज होऊन कोणत्या गावाला गेले ते शोधा, आदित्य ठाकरेंचा एकनाथ शिंदेंना टोला
उपमुख्यमंत्री नाराज होऊन कोणत्या गावाला गेले ते शोधा, आदित्य ठाकरेंचा एकनाथ शिंदेंना टोला
दोस्तीत कुस्ती... किरकोळ वादातून मित्रानेच केला मित्राचा खून; पोलिसांकडून फरार आरोपीचा शोध सुरू
दोस्तीत कुस्ती... किरकोळ वादातून मित्रानेच केला मित्राचा खून; पोलिसांकडून फरार आरोपीचा शोध सुरू
मुंबईत मॉलमधील महिलेचा फोटो काढून विनयभंग; मनसैनिकांनी चोप देताच मागितली कान धरुन माफी
मुंबईत मॉलमधील महिलेचा फोटो काढून विनयभंग; मनसैनिकांनी चोप देताच मागितली कान धरुन माफी
Raigad And Nashik Guardian Minister : रायगड अन् नाशिकच्या पालकमंत्रिपदाला स्थगिती, पण झेंडावंदन अदिती तटकरे अन् गिरीश महाजनच करणार
रायगड अन् नाशिकच्या पालकमंत्रिपदाला स्थगिती, पण झेंडावंदन अदिती तटकरे अन् गिरीश महाजनच करणार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 20 जानेवारी 2025 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 20 जानेवारी 2025 | सोमवार
विधानसभा निवडणुकांचा गृहविक्रीवर परिणाम; तीन महिन्यांत 31 टक्के घट, पुण्यात किती घरांची विक्री?
विधानसभा निवडणुकांचा गृहविक्रीवर परिणाम; तीन महिन्यांत 31 टक्के घट, पुण्यात किती घरांची विक्री?
गोपीनाथ मुंडे आज असते तर धनंजय मुंडेंना जिल्ह्यातून लाथ मारुन हाकललं असतं; ठाकरेंचा आमदार संतापला
गोपीनाथ मुंडे आज असते तर धनंजय मुंडेंना जिल्ह्यातून लाथ मारुन हाकललं असतं; ठाकरेंचा आमदार संतापला
Malegaon Bajar Samiti :  विधानसभेपाठोपाठ दादा भुसेंचा अद्वय हिरेंना मोठा धक्का; मालेगाव बाजार समितीतील सत्ता खेचली!
विधानसभेपाठोपाठ दादा भुसेंचा अद्वय हिरेंना मोठा धक्का; मालेगाव बाजार समितीतील सत्ता खेचली!
Embed widget