एक्स्प्लोर

पालघर पोलीस दलाच्या API मंजुषा शिरसाट यांना वेस्ट इंडिया क्लासिक पॉवरलिफ्टिंग स्पर्धेत कांस्यपदक

पोलीस सेवा ही त्यांची लहानपणापासूनची स्वप्नपूर्ती असून, समाजाला न्याय मिळवून देणे, कायद्याचा सन्मान राखणे आणि नागरिकांच्या सुरक्षेसाठी काम करणे हेच त्यांचे जीवनध्येय राहिले आहे. सध्या त्या आर्थिक फसवणूक, गुंतवणूक घोटाळे, ऑनलाइन फ्रॉड यांसारख्या गंभीर गुन्ह्यांचा तपास करीत आहेत.

पालघर (महाराष्ट्र) [भारत], 27 डिसेंबर : पालघर जिल्हा पोलीस दलाच्या आर्थिक गुन्हे शाखेत (Economic Offences Wing – EOW) सहाय्यक पोलीस निरीक्षक म्हणून कार्यरत असलेल्या श्रीमती मंजुषा सुखदेव शिरसाट यांनी West India Classic Powerlifting Championship 2025, इंदूर (मध्य प्रदेश) येथे झालेल्या प्रतिष्ठित स्पर्धेत कांस्यपदक (Bronze Medal) पटकावत पालघर जिल्ह्याचा गौरव वाढवला आहे.

पोलीस सेवा ही त्यांची लहानपणापासूनची स्वप्नपूर्ती असून, समाजाला न्याय मिळवून देणे, कायद्याचा सन्मान राखणे आणि नागरिकांच्या सुरक्षेसाठी काम करणे हेच त्यांचे जीवनध्येय राहिले आहे. सध्या त्या आर्थिक फसवणूक, गुंतवणूक घोटाळे, ऑनलाइन फ्रॉड यांसारख्या गंभीर गुन्ह्यांचा तपास करीत आहेत.

कामाच्या ताणतणावामुळे काही काळ शुगर व कोलेस्ट्रॉलच्या समस्यांना सामोरे जावे लागल्यानंतर सुमारे दोनवर्षांपूर्वी त्यांनी फिटनेसकडे पुन्हा लक्ष केंद्रित केले. सुजितसिंग फिटनेस जिम येथे गुरु सुजित सिंग यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी पॉवरलिफ्टिंग खेळाची सुरुवात केली. जिल्हास्तरीय स्पर्धेत पहिल्याच सहभागात पदक मिळाल्यानंतर त्यांनी या खेळात स्पर्धात्मक पातळीवर उतरायचा ठाम निर्णय घेतला.

आजवर त्यांनी जिल्हा, राज्य, राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर उल्लेखनीय कामगिरी केली असून, इंदूर येथे झालेल्या वेस्ट इंडिया क्लासिक पॉवरलिफ्टिंग चॅम्पियनशिप 2025 मधील कांस्यपदक हा त्यांच्या सातत्यपूर्ण मेहनतीचा महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे.

ड्युटी आणि ट्रेनिंग यांचा समतोल राखताना पहाटे व्यायाम, दिवसभर कर्तव्य आणि संध्याकाळी पुन्हा प्रशिक्षण असा अत्यंत शिस्तबद्ध दिनक्रम त्या पाळतात. योग्य आहार, पुरेशी विश्रांती आणि मानसिक स्थैर्य यावर त्याविशेष भर देतात. या यशस्वी वाटचालीत पालघर जिल्हा पोलीस अधीक्षक श्री. यतीश देशमुख (भा.पो.से.), अप्पर पोलीस अधीक्षक श्री. विनायक नरळे आणि पोलीस निरीक्षक श्री. शिरीष पवार यांचे मोलाचे मार्गदर्शन व प्रोत्साहन लाभले आहे.

तसेच, आपल्या क्रीडा यशामागे भाऊ दिनेश, वहिनी साधना आणि आई यांचा वेळोवेळी मिळालेला भावनिक व मानसिक पाठिंबा अत्यंत महत्त्वाचा असल्याचे मंजुषा शिरसाट यांनी नमूद केले आहे. तरुण महिला अधिकारी व गणवेशात राहून खेळात करिअर करू इच्छिणाऱ्यांना संदेश देताना त्या म्हणतात, “गणवेश म्हणजे मर्यादा नाही—तोच शिस्त, आत्मविश्वास आणि उंच भरारीचा मजबूत पाया आहे.”

एकाच वाक्यात प्रेरणा देताना त्या सांगतात,“दररोज स्वतःला मागील दिवसापेक्षा अधिक सक्षम सिद्ध करण्याची जिद्द—हीच माझी खरी ताकद आहे.” 

Disclaimer : This is a sponsored article. ABP Network Pvt. Ltd. and/or ABP Live does not in any manner whatsoever endorse/subscribe to the contents of this article and/or views expressed herein. Reader discretion is advised.

आणखी वाचा

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
BMC Election 2026: मोठी बातमी : नील सोमय्याविरुद्ध दोन्ही ठाकरेंचा एकही उमेदवार नाही, भाजपचा विजय जवळपास निश्चित, किरीट सोमय्या म्हणाले, God is Great!
मोठी बातमी : नील सोमय्याविरुद्ध दोन्ही ठाकरेंचा एकही उमेदवार नाही, भाजपचा विजय जवळपास निश्चित, किरीट सोमय्या म्हणाले, God is Great!
टीआरपीचा फटका! अवघ्या 8 महिन्यांत प्रेक्षकांची लाडकी मालिका बंद होणार? अभिनेत्रीची पोस्ट चर्चेत
टीआरपीचा फटका! अवघ्या 8 महिन्यांत प्रेक्षकांची लाडकी मालिका बंद होणार? अभिनेत्रीची पोस्ट चर्चेत
मोठी बातमी : शिंदेंच्या उमेदवाराविरुद्ध ठाकरेंच्या उमेदवाराची माघार, आमदारपुत्राची बिनविरोध निवड
मोठी बातमी : शिंदेंच्या उमेदवाराविरुद्ध ठाकरेंच्या उमेदवाराची माघार, आमदारपुत्राची बिनविरोध निवड
मुंबईचा महापौर उत्तर भारतीय करण्यासाठी भाजपचे कृपाशंकर सिंह जिद्दीला पेटले; संजय राऊत म्हणाले, भाजपचं ठरलं, मुंबईचा महापौर उपराच! मराठी माणसा…जागा हो!
मुंबईचा महापौर उत्तर भारतीय करण्यासाठी भाजपचे कृपाशंकर सिंह जिद्दीला पेटले; संजय राऊत म्हणाले, भाजपचं ठरलं, मुंबईचा महापौर उपराच! मराठी माणसा…जागा हो!
Nanded Crime News: 'लवकर या, मी वाट बघतोय…'; आई वडिलांसाठी भावनिक पोस्ट लिहिली अन् दोन तासातच 20 वर्षीय युवकाने उचललं टोकाचं पाऊल
'लवकर या, मी वाट बघतोय…'; आई वडिलांसाठी भावनिक पोस्ट लिहिली अन् दोन तासातच 20 वर्षीय युवकाने उचललं टोकाचं पाऊल
'आमच्या शेंबड्या बाब्याला नेता करा आणि प्रामाणिक कार्यकर्त्यांनो तुम्ही पाणी भरा' भाजपचे निष्ठावंत संतरंज्या उचलत असतानाच आता राष्ट्रवादीमधील खदखद समोर आली!
'आमच्या शेंबड्या बाब्याला नेता करा आणि प्रामाणिक कार्यकर्त्यांनो तुम्ही पाणी भरा' भाजपचे निष्ठावंत संतरंज्या उचलत असतानाच आता राष्ट्रवादीमधील खदखद समोर आली!
Mumbai Rain Update: नववर्षाचं पहिल्याच दिवशी मुंबईत पावसाची जोरदार बॅटींग, थंडीत रेनकोट घालण्याची वेळ, मुंबईकरांची उडाली तारांबळ
नववर्षाचं पहिल्याच दिवशी मुंबईत पावसाची जोरदार बॅटींग, थंडीत रेनकोट घालण्याची वेळ, मुंबईकरांची उडाली तारांबळ
Jalgaon Municipal Corporation: युतीच्या घोळात एबी फॉर्मचा शेवटपर्यंत खेळखंडोबा; जळगावात स्वाक्षरी नसल्याने भाजपच्या थेट माजी महापौर ठरल्या अपक्ष उमेदवार, तब्बल 135 उमेदवारांचे अर्ज बाद
युतीच्या घोळात एबी फॉर्मचा शेवटपर्यंत खेळखंडोबा; जळगावात स्वाक्षरी नसल्याने भाजपच्या थेट माजी महापौर ठरल्या अपक्ष उमेदवार, तब्बल 135 उमेदवारांचे अर्ज बाद
Embed widget