एक्स्प्लोर
ऑस्करमेनिया - रोमा... एक विलक्षण समांतर प्रवास
रोमा चित्रपटात दोन स्त्रियांच्या संघर्षाची कथा आहे. एक म्हणजे क्लियो (यलिता अपारिसियो), मेक्सिकोतील एका मध्यमवर्गीय कुटुंबासाठी काम करणारी एक तरुणी.. आणि दुसरी क्लियोची मालकीण सोफिया (मरीना दे तैविरा), जी चार मुलांची आई आहे.

यंदाच्या ऑस्करमध्ये सर्वात जास्त नामांकन मिळणाऱ्या चित्रपटांपैकी एक.. एकूण 10 विभागात नामांकन मिळवणाऱ्या रोमा चित्रपटानं यंदाच्या ग्लोल्डन ग्लोब, बाफ्टांसह अनेक पुरस्कारांमध्ये बाजी मारली आहे.
सगळ्यात प्रमुख म्हणजे हा चित्रपट नेटफिक्स या ऑनलाईन व्हिडीओ प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित केला आहे. त्यामुळे यंदाच्या ऑस्करचे हे एक वैशिष्ट्यच म्हणावं लागेल.

रोमा चित्रपटात दोन स्त्रियांच्या संघर्षाची कथा आहे. एक म्हणजे क्लियो (यलिता अपारिसियो), मेक्सिकोतील एका मध्यमवर्गीय कुटुंबासाठी काम करणारी एक तरुणी.. आणि दुसरी क्लियोची मालकीण सोफिया (मरीना दे तैविरा), जी चार मुलांची आई आहे.
क्लिओ आणि तिची मैत्रिण अॅडेला या दोघी सोफियाच्या घरातच राहत असतात. सोफियाचे पती
अँटोनियो (फर्नांडो ग्रेडिआगा) हे काही या लग्नापासून फारसे खूश नसतात हे आपल्याला पहिल्या सीनपासूनच दिसते. मग काय नशीबानं आलेलं मातृत्व तेही चार मुलांचं आणि अवेळी वेगळं होण्याचं दुःख सोफिय़ा भोगत असते.
पती सोडून जाताना सोफियानं मारलेली घट्ट मिठी आणि समोर क्लिओजवळ उभा असलेला त्याचा मुलगा हे दृश्य अनेक अर्थानं बोलकं आहे.
कहाणीत दुसरा टर्न येतो तो क्लिओ आणि तिची मैत्रिण अॅडेला आपल्या मित्रांसोबत चित्रपट पाहायला जातात. यावेळी क्लिओ आणि तिचा बॉयफ्रेण्ड फर्मिन जो मार्शल आर्टसाठी खूप उत्साही असतो. तर ते दोघे चित्रपट न पाहता एकत्र वेळ घालवतात.
एखाद महिन्यानंतर क्लिओ आणि फर्मिन चित्रपट पाहालया जातात, तर त्यावेळी क्लिओ फर्मिनला तिला दिवस गेल्याची बातमी देते. एक मिनिटासाठी फर्मिन तिला विश्वासही देतो की तो तिच्यासोबत राहणार, मात्र चित्रपट संपायच्या आत तो तील सोडून जातो. क्लिओ चित्रपट संपल्यानंतर घर परतत असताना आपल्या डोळ्यात अश्रू येतील असा सिक्वेन्स दिग्दर्शकांनं आपल्या समोर मांडला आहे.
डिसेंबर 1970 चा काळ...
क्लिओ आपल्या आयुष्यात आलेले वादळ सोफियाला सांगायला जाते, तेव्हाचा हा फोटो, त्यावेळी सोफियाच्या आयुष्यातही नवं वादळ धडकलेलं असतं. त्यावेळी क्लिओचे पाणावलेले डोळे पाहून सोफियाचा लहान मुलगा क्लिओच्या गळ्याला पडतो. क्लिओबाबत समजताच आपलं दु:ख बाजूला ठेवून सोफिया तिला हॉस्पिटलला घेऊन जाते.
दोघीही त्यानंतर आयुष्य आपल्या मार्गानं जगायचं ठरवतात. मात्र आपल्या पोटातील बाळाबाबत फर्मिनला माहिती देण्यासाठी क्लिओ त्याच्या गावात जाते. मेक्सिकोपासून जवळ असलेलं गाव, सर्वत्र घाणीचं साम्राज्य आणि एका मोठ्या मैदानात सुरु असलेले मार्शल आर्टचं प्रशिक्षण. त्यामुळं फर्मिनला शोधणं काही कठीण नव्हते.
मात्र, क्लिओला भेटूनही फर्मिन तिला नकारच देतो. मध्येच एक मनाला चटका देणारी गोष्ट घडते ती म्हणजे क्लिओ आणि तिची मालकीण एका दुकानात पाळणा घेण्यासाठी जातात. त्यावेळी विद्यार्थी आंदोलननंतर उसळलेल्या हिंसाचारात क्लिओची प्रकृती बिघडते. मात्र, जेव्हा दुकानात आश्रयासाठी आलेल्या युवकाला गोळ्यामारताना फर्मिन म्हणजे तिच्या पोटातल्या बाळाच्या बापाला पाहते तेव्हा तिच्या शरीरातून रक्तस्राव सुरु होतो. शहरात गोळीबार आणि हिंसाचार मात्र त्यातही ती हॉस्पिटलमध्ये दाखल होते. तीचं बाळ जन्माआधीच दगावलं जातं, त्यावेळी आपल्या पोटच्या बाळाला हातात तेव्हा अंगावर शहारे आल्याशिवाय राहत नाहीत.
वादळानंतर पुन्हा उभं राहण्याचा संकल्प केलेल्या क्लिओ आणि सोफिया चारही मुलांसह नवीन वर्षाच्या स्वागतासाठी शहरातून बाहेर जातात. वाटेत सगळेच समुद्र किनाऱ्यावर थांबतात, त्यावेळी तिथं एक अपघात घडतो. चार पैकी दोन मुलं पाहण्याच्या लाटांसोबत वाहून जात असतात, मात्र क्लिओ त्यांना वाचवते.
चित्रपटाची सुरुवात जिथून होते तिथेच चित्रपट येऊन पोहोचतो. मात्र त्यात मोठा फरक असतो तो वर्षभराच्या संघर्षाचा.. म्हणून मी चित्रपटाला ऑस्करचा दावेदार मानतो.

View More