एक्स्प्लोर

जिभेचे चोचले : भारतीय वैविध्याचं दर्शन – 29

भारताच्या २१ राज्यांमध्ये फिरुन नेहमीच्या रेस्टॉरन्टच्या मेन्यूला फाटा देत विविध राज्यांच्या पण केवळ भारतीय असलेल्या पदार्थांची एकत्र मोट बांधणारी मुंबईतली रेस्टॉरन्टची चेन म्हणजे २९.

आम्हाला आजकाल मेक्सिकन जेवण माहितीय, परदेशी प्रसिद्ध पदार्थांची नावं, चवी सगळं काही पाठ आहे..लेबनिज, चायनिज रेसिपीज तर आता घरी करण्याच्या पदार्थांमध्ये समाविष्ट झालेत..आम्ही मोठ्या अभिमानाने सांगतो की आजकाल आमच्या घरीच आम्ही शेजवान राईस बनवतो वगैरे, पण किती लोक तितक्याच उत्साहाने भारतातल्या विविध भागात दडलेले पदार्थ शोधतात, मेघालयमध्ये किंवा सिक्कीममध्ये लोक काय खातात हे आपण कधी जाणून घेतलंय का, राजस्थानात दालबाटी सोडूनही कितीतरी चवदार पदार्थ असतात त्यांची चव इतर राज्यातले लोक कधी चाखून पाहतात का ?? हे प्रश्न विचारतोय मुंबईत सध्या चर्चैचा विषय ठरलेल्या एका रेस्टॉरन्ट चेनचा मालक निशेक जैन.. Hotel 29 - Nikesh Jain . नावच किती समर्पक आहे.. भारतात २९ राज्य म्हणून  या रेस्टॉरन्टचं नावही २९..दोन वर्षापूर्वी या २९ नावाच्या खास भारतीय रेस्टॉरन्टची पहिली शाखा थेट केम्पस कॉर्नरला सुरु झाली.. आता तर मालाड, ठाणे अशा तीन चार ब्रॅन्चेस निघाल्यात २९ च्या. याची खासियत एकच डेकोरेशन, बैठक व्यवस्था आणि स्टार्टर्सपासून डेझर्टपर्यंत सगळीकडे भारताच्या विविधतेचं सेलिब्रेशन आपल्याला दिसणार... जिभेचे चोचले : भारतीय वैविध्याचं दर्शन – 29 दक्षिण भारतीय पदार्थ म्हणून आपण नाही म्हणायला आपण इडली, डोसे खातो, पण त्याही पुढं जाऊन दक्षिणेतल्या चार राज्यांमध्येही कितीतरी पदार्थ आणि विविध खाद्यसंस्कृती दडलेल्या आहेत, त्या आपल्यापर्यंत फारशा पोहोचतच नाहीत...राजस्थानी, गुजराती आणि मराठी स्पेशालिटी रेस्टॉरन्ट आहेत आता मुंबईसारख्या शहरात, पण सगळ्या राज्यांमधले फारसे माहिती नसलेले पण अतिशय चविष्ट असलेले पदार्थ आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न तो ही अगदी स्टाईलिश पद्धतीने केला जात असेल तर खवय्यांना आवडेल यात शंका नाही.. बाहेर प्रवेशद्वारावर भारताचा मोठा नकाशा आणि आत गेल्यावर देशातल्या सगळ्या राज्यांची त्यांच्या त्यांच्या लिपीत कोरलेली नावं..यातूनच २९मध्ये शिरल्यावर आपल्याला चवींचंहीकिती वैविध्य मिळणार याची कल्पना येते...बरं, या रेस्टॉरन्टच्या मालकानेच जी कल्पना दिलीय त्यानुसार त्यांनी देशभर फिरुन चांगले ७०० पदार्थ एकत्र केलेत, काही ठिकाणहून तर चक्क पैसे देऊन स्वयंपाकघरातला तो सिक्रेट खजिना विकत घेतलाय, पण एखाद्या रेस्टॉरन्टला ७०० पदार्थांचा मेन्यू ठेवणं आणि त्यातलं जे मागवलं जाईल ते तयार करुन खवय्यांना वाढणं प्रॅक्टीकली शक्य नसल्यानं या हॉटेलनं एक अनोखी संकल्पना राबवलीय.. दर सहा महिन्यांनी सगळ्या २९ नावाच्या रेस्टॉरन्टसचा मेन्यू पूर्णपणे बदलला जातो. म्हणजे सहा महिन्यानी एखादा आवडलेला पदार्थ परत खायला गेलात, तर तो नक्कीच मिळणार नाही, पण नविन काहीतरी नक्की मिळेल. आपण कधीही नावदेखील ऐकलं नाही असे मात्र अनेक पदार्थ चाखायला मिळतील याची खात्री..रेस्टॉरन्टच्या मालकानी तर आणखी रंजक माहिती दिली की सहा महिन्यानी मेन्यू बदलला की आधीच्या मेन्यूतल्या सगळ्या पदार्थांच्या पाककृतींच्या प्रिंटआऊट्स रेस्टरन्टच्या बाहेर ठेवल्या जातात..हव्या त्या उचला आणि घरी जाऊन करुन बघा असा हा प्रकार.. Hotel 29 - Map इथलं २९ चं मेन्यूकार्ड उघडल्याबरोबरच काही ओळखीच्या आणि काही अत्यंत अनोळखी पदार्थांची नावं वाचणंही खूप रंजक ठरतं..स्टार्टर्सच्या यादीत ‘मरोई नकुप्पी बोरा’ नावाचा एक मणिपुरी पदार्थ दिसतो, अर्थातच हे नाव आपल्यापैकी कुणी ऐकलं असण्याचीही शक्यता नाही.. किंवा काश्मिरी हरिसा रोलही सगळीकडे न मिळणारा पदार्थ, पानकी चटणी नावाचा गुजराती पदार्थ यांच्याकडे मिळतो, एरव्ही गुजराती थाली आपण मोठ्या चवीनं खातो पण पानकीसारखा करायला किचकट पदार्थ क्वचितच रेस्टॉरन्टच्या मेन्यूत आढळतो. Hotel 29 - Panki Chatni पुंगलु नावाचं आंध्रप्रदेशातलं स्नॅक्स या चित्रविचित्र नावांच्या पदार्थांबरोबर दिल्ली टोकरी चाट, सिक्कीमचे व्हेज डम्पलिंग्ज,उत्तरप्रदेशचे सिख कबाब, प्याज कचोरी असेही माहितीतले आणि विविध राज्यांचं प्रतिनिधित्व करणारे पदार्थ दिसतात.. म्हणजे नविन कधीही न ऐकलेल्या पदार्थाबरोबर माहितीतला एखादा पदार्थ अशी ऑर्डर देण्याची खवय्यांची सोय होते.. गंमत म्हणजे पुणेरी मिसळ पाव बरोबर चंद्रपुरी बोंडाही या मेन्यूकार्डमध्ये पाहून आणखीच मजा वाटते..खरं तर नाव २९ असलं तरी प्रत्येक राज्यातही कितीतरी वेगवेगळ्या खाण्याच्या सवयी आण पदार्थ आहेत, त्याचा धावता समावेश २९ च्या मेन्यूत केलेला दिसतो. Hotel 29 - Harisa मेनकोर्सच्या बाबतीतही तेच खास मराठी डाळिंबी उसळ, बिहारी लिट्टी चोखा, इंदोरी पालक पुऱ्या, धनबादी सालन काश्मिरी श्रीमालपासून गुजराती शेवसब्जीपर्यंत हवा त्या भागातला पदार्थ एकाचवेळी इथे चाखता येतो..  गंमत म्हणजे काश्मिरी श्रीमाल आणि केरळी पराठा एकाचवेळी खाता येईल अशी कदाचित इकमेव जागा म्हणजे २९ नावाचं हे रेस्टॉरन्ट... Hotel 29 - Kerla Paratha झारखंड, मणिपूर, उत्तराखंड अशा फुडमॅपवर फेवरेटच्या यादीत नसलेल्या राज्यातले कितीतरी पदार्थ इथे चाखता येतात.. झारखंडचा घुगनी विथ धुसका..उत्तराखंडच्या कुमाऊ भागातील मांडवे की रोटी, गोव्याचा ड़ोली थॉय असे किती किती नविन पदार्थांची तोंडओळख होते या रेस्टॉरन्टच्या निमित्ताने...अर्थात सगळे पदार्थ अगदी पारंपरिक पद्धतीने सर्व करण्यापेक्षा ते सर्व मात्र अतिशय आकर्षक आणि मॉडर्न पद्धतीने सादर केले जातात, त्यामुळेच ते खायला आणखीच मजा येते.. अगदी डेझर्टसमध्येही आईस्क्रीम,केक असलं काहीही इथे २९ मध्ये मिळणार नाही, त्याऐवजी फिरनी, कुल्फी, बंगाली मिष्टी दोही, रबडी जिलेबी असे खास भारतीय मिष्ठान्न आपलं तोंड गोड करायला सर्व केले जातात. Hotel 29 - Decoration चायनिज, मेक्सिकन, इटालियन, थाय अशा विविध देशातल्या खाद्यसंस्कृतीतील पदार्थांचा आपण मोठमोठ्या रेस्टॉरन्टसमध्ये जाऊन कायम फडशा पाडत असतो..आपल्या संस्कृतीचा कधीही भाग नसलेले सोया सॉस,चिजसारख्या पदार्थांना आपण आपल्या खाद्यसंस्कृतीत आता सामावूनही घेतलंय.. मग आपले खऱ्या अर्थाने शेजारी असलेल्या राज्यांच्या खाद्यपदार्थांचा आस्वाद घ्यायला हरकतच नाही..प्रत्येक राज्यात भटकंती करत फिरताना वेगवेगळ्या पदार्थांशी ओळख नक्कीच होईल पण वेळेअभावी जर भटकंती करणं लगेच शक्य नसेल तर मुंबईतल्या एखद्या २९ च्या शाखेला भट देऊन खाद्यभ्रमंतीचा आनंद घेता येणं शक्य आहे.
संबंधित ब्लॉग
जिभेचे चोचले : मुलुंडचं केक्स एन केमिस्ट्री
जिभेचे चोचले : पारंपरिक चायनीजचा स्वाद – मेनलॅण्ड चायना जिभेचे चोचले : स्पेशालिटी ट्रिपल ट्रिट जिभेचे चोचले : जिवाची मुंबई – पंचतारांकित रेनेसॉंचा संडे ब्रंच जिभेचे चोचले : वाह ताज !– मसाला क्राफ्ट जिभेचे चोचले : पारंपरिक जेवणाचा थाट – भगत ताराचंद

जिभेचे चोचले: बोटीच्या थीमचं हार्बर ओ फोर

जिभेचे चोचले : डोशासारख्या क्रेप्ससाठी ‘डी क्रेप्स’ कॅफे जिभेचे चोचले : लिजेंडरी क्रिम सेंटर जिभेचे चोचले : तरुणाईचा ‘चिजी’ अड्डा, प्युअर मिल्क सेंटर जिभेचे चोचले: उडुपी संस्कृतीचा पारंपारिक थाट जिभेचे चोचले : आस्वादचा ‘आस्वाद’ जिभेचे चोचले : स्पेशल सिझलरसाठी ‘फुड स्टुडियो’ जिभेचे चोचले : ‘फ’ से फ्यूजन… ‘फ’ से फूड जिभेचे चोचले : ढाब्याची आठवण – चौबारा 601 जिभेचे चोचले : ग्लोबल एशियन फ्युजन जिभेचे चोचले : हम काले है मगर… आईस्क्रीमचा भन्नाट फ्लेवर जिभेचे चोचले : महाराष्ट्राचा काठ आणि घाट जिभेचे चोचले: केक चॉकलेट पेस्ट्रीचं रोलिंग पिन जिभेचे चोचले : पाणीपुरी – ‘तोंडभर’ आनंद जिभेचे चोचले: पावभाजी – विथ लव्ह फ्रॉम मुंबई  जिभेचे चोचले: इराणी हॉटेलांचा मॉडर्न अवतार जिभेचे चोचले : मुंबईतलं मिनी दक्षिण भारत : इडली-डोशाचं गाव जिभेचे चोचले : मुंबईचं मॉडर्न कॅन्टीन जिभेचे चोचले : कुटुंबसंस्थेचं सेलिब्रेशन जिभेचे चोचले : सफर विस्मरणातल्या खाद्यसंस्कृतीची जिभेचे चोचले : हवाहवासा प्रवास जिभेचे चोचले : गल्लीतला ‘खाऊ’ जिभेचे चोचले : पंचतारांकित रसनातृप्ती जिभेचे चोचले : चमचमीत ग्रील आणि बार्बेक्यू जिभेचे चोचले : तरुणाईची हँगआऊट प्लेस जिभेचे चोचले : टूमदार, चटकदार घराची ‘स्टोरी’ जिभेचे चोचले: विलक्षण पाहुणचार जिभेचे चोचले – खाद्यपदार्थांची न्यारी दुनिया !  जिभेचे चोचले : मुंबईतला नवा ट्रेण्ड- मॉडर्न फुड विथ ट्विस्ट
View More

ओपिनियन

Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Prithviraj Chavan: संजय राऊत एकनाथ शिंदेंच्या भेटीनंतर शरद पवारांवर संतापले, आता पृथ्वीराज चव्हाण थेट बोलले, 'ठाकरेंसाठी एकनाथ शिंदे हा विषय त्यामुळे..'
संजय राऊत एकनाथ शिंदेंच्या भेटीनंतर शरद पवारांवर संतापले, आता पृथ्वीराज चव्हाण थेट बोलले, 'ठाकरेंसाठी एकनाथ शिंदे हा विषय त्यामुळे..'
Shashikant Shinde :  शरद पवार आणि एकनाथ शिंदेंची भेट राजकीय नव्हती, शशिकांत शिंदेंचे स्पष्टीकरण; एनडीएत जाण्याच्या चर्चा फेटाळल्या
शरद पवार आणि एकनाथ शिंदे यांच्या भेटीचा राजकीय अर्थ काढू नये, शशिकांत शिंदेंचं मविआच्या नेत्यांना आवाहन
शरद पवारांच्या भेटीनंतर संजय राऊत संतापले, गद्दार म्हणाले; आता, एकनाथ शिंदेंचा पलटवार, राष्ट्रवादीचेही उत्तर
शरद पवारांच्या भेटीनंतर संजय राऊत संतापले, गद्दार म्हणाले; आता, एकनाथ शिंदेंचा पलटवार, राष्ट्रवादीचेही उत्तर
Ali Khamenei Home Video: ना राजेशाही थाट, ना टोलेजंग वाडा! इराणने अयातुल्ला खामेनींच्या अंत्यविधीपूर्वी उद्ध्वस्त निवासस्थानाचा व्हिडिओ दाखवला, अमेरिका- इस्रायलने तिथंच तब्बल 35 क्षेपणास्त्रे डागली
Video: ना राजेशाही थाट, ना टोलेजंग वाडा! इराणने अयातुल्ला खामेनींच्या अंत्यविधीपूर्वी उद्ध्वस्त निवासस्थानाचा व्हिडिओ दाखवला, अमेरिका- इस्रायलने तिथंच तब्बल 35 क्षेपणास्त्रे डागली

व्हिडीओ

Sanjay Raut PC : गद्दाराच्या छताखाली जाऊन बैठका.. संजय राऊतांची थेट शरद पवारांवर टीका
Hingoli Earthquake : भूकंपामुळे हिंगोलीकर भयभीत, मोकळ्या मैदानावर रात्र काढली जागून
Ramesh Mhatre Special Report : महिला डॉक्टर मारहाण प्रकरणी रमेश म्हात्रेला अटक, माज उतरणार?
Sudhir Mungantiwar on Doctors Nurses Assaults : डॉक्टर,नर्सेसवरील मारहाणीचे समर्थन नाही
Sharad Pawar NCP Special Report : भेटीगाठी कशासाठी? शरद पवारांच्या निर्णयाकडे लक्ष

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Prithviraj Chavan: संजय राऊत एकनाथ शिंदेंच्या भेटीनंतर शरद पवारांवर संतापले, आता पृथ्वीराज चव्हाण थेट बोलले, 'ठाकरेंसाठी एकनाथ शिंदे हा विषय त्यामुळे..'
संजय राऊत एकनाथ शिंदेंच्या भेटीनंतर शरद पवारांवर संतापले, आता पृथ्वीराज चव्हाण थेट बोलले, 'ठाकरेंसाठी एकनाथ शिंदे हा विषय त्यामुळे..'
Shashikant Shinde :  शरद पवार आणि एकनाथ शिंदेंची भेट राजकीय नव्हती, शशिकांत शिंदेंचे स्पष्टीकरण; एनडीएत जाण्याच्या चर्चा फेटाळल्या
शरद पवार आणि एकनाथ शिंदे यांच्या भेटीचा राजकीय अर्थ काढू नये, शशिकांत शिंदेंचं मविआच्या नेत्यांना आवाहन
शरद पवारांच्या भेटीनंतर संजय राऊत संतापले, गद्दार म्हणाले; आता, एकनाथ शिंदेंचा पलटवार, राष्ट्रवादीचेही उत्तर
शरद पवारांच्या भेटीनंतर संजय राऊत संतापले, गद्दार म्हणाले; आता, एकनाथ शिंदेंचा पलटवार, राष्ट्रवादीचेही उत्तर
Ali Khamenei Home Video: ना राजेशाही थाट, ना टोलेजंग वाडा! इराणने अयातुल्ला खामेनींच्या अंत्यविधीपूर्वी उद्ध्वस्त निवासस्थानाचा व्हिडिओ दाखवला, अमेरिका- इस्रायलने तिथंच तब्बल 35 क्षेपणास्त्रे डागली
Video: ना राजेशाही थाट, ना टोलेजंग वाडा! इराणने अयातुल्ला खामेनींच्या अंत्यविधीपूर्वी उद्ध्वस्त निवासस्थानाचा व्हिडिओ दाखवला, अमेरिका- इस्रायलने तिथंच तब्बल 35 क्षेपणास्त्रे डागली
रक्षकच बनले भक्षक, महिलेवर अत्याचार; पोलीस भरतीत अधिक गुण देण्याचे आमिष, PSI सह कॉन्स्टेबलवर गुन्हा दाखल
रक्षकच बनले भक्षक, महिलेवर अत्याचार; पोलीस भरतीत अधिक गुण देण्याचे आमिष, PSI सह कॉन्स्टेबलवर गुन्हा दाखल
Omraje Nimbalkar: धाराशिवमध्ये ओमराजे निंबाळकरांच्या राजकारणाला 'उजवं' वळण, संघाच्या नेत्यांच्या भेटीगाठी पण राणा जगजितसिंहांना विरोधच
धाराशिवमध्ये ओमराजे निंबाळकरांच्या राजकारणाला 'उजवं' वळण, संघाच्या नेत्यांच्या भेटीगाठी पण राणा जगजितसिंहांना विरोधच
राम मंदिराच्या चोरीबद्दल बोललो तर तो धर्माचा अपमान कसा? चोरीचा आणि धर्माचा काय संबंध?? केंद्राने नेमलेल्या 15 पैकी 12 ट्रस्टी RSS, विश्व हिंदू परिषद आणि भाजपशी संबंधित, बाकी कोणीच नाही; राज ठाकरेंचा हल्लाबोल
राम मंदिराच्या चोरीबद्दल बोललो तर तो धर्माचा अपमान कसा? चोरीचा आणि धर्माचा काय संबंध?? केंद्राने नेमलेल्या 15 पैकी 12 ट्रस्टी RSS, विश्व हिंदू परिषद आणि भाजपशी संबंधित, बाकी कोणीच नाही; राज ठाकरेंचा हल्लाबोल
मोठी बातमी! समान नागरी कायदा लवकरच विधिमंडळात; 7 जणांची समिती गठीत, मुख्यमंत्र्यांची विधानसभेत घोषणा
मोठी बातमी! समान नागरी कायदा लवकरच विधिमंडळात; 7 जणांची समिती गठीत, मुख्यमंत्र्यांची विधानसभेत घोषणा
Embed widget